श्रीरामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोग व पोलीस महासंचालक मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नाशिक परिक्षेत्रांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस विभागात ३ वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच जिल्हा बाहेर बदल्यांचा झाल्या आहेत. श्रीरामपूर शहरात पुन्हा पोलिसिंग काय असते हे दाखवून देत अनेक गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींच्या मुसक्या आवळणारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची धुळे येथे बदली झाली असून. धुळे शहरात दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख करणारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे इंचार्ज म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने. आज दिनांक बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडे ५:३० वाजता, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका दबंग अधिकाऱ्याचा निरोप समारंभ तर दुसऱ्या दबंग अधिकाऱ्याचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले आहे.
Post a Comment