मसाला पान खाणार असाल तर सावधान शहरात पान व्यवसाईकांची व्यसन लावण्या साठी मसाला पानातून केली जाते फसवणूक
श्रीरामपूर प्रतिनिधी:सध्या श्रीरामपूर शहरासह तालुकाभरातील विविध पान टपऱ्यांमधून स्ट्रॉंग तंबाखू असलेले किवामयुक्त फुलचंद पान आजही उपलब्ध होत असल्याने राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूवर घातलेली बंदी केवळ कागदावरचा फार्स ठरली आहे. स्ट्रॉंग तंबाखूजन्य फुलचंद पान हे असे पान आहे जे नजर चुकीने जरी एखाद्या इसमाने मसाला पान म्हणून खाल्ले तर खाणाऱ्यास भयंकर चक्कच येणे, त्याच्या ह्रदयाचे ठोके वाढणे,मळमळ होणे अस्वस्थ वाटणे, हातपाय गळण्यासारखे वाटणे असे भयंकर लक्षण दिसून येतात.एखाद्याचे ॲजिओप्लास्टी किंवा बायपास झालेले असल्यास सदरील पान हे त्याच्या जीवावर बेतू शकते असे हे स्ट्रॉंग तंबाखूजन्य पान आहे म्हणून असे पान विकणाऱ्या पान टपऱ्याधारकांवर वेळीच योग्य कारवाई झाली पाहिजे असे आसलम बिनसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.या पत्रकार पुढे असे म्हटले आहे की, श्रीरामपुर शहरामध्ये किमामचा स्वाद असलेली पाने केव्हाही मिळत आहेत. एवढेच नव्हेतर, गुटखाबंदी असतानाही काही ठरावीक ग्राहकांना महागडय़ा दरात गुटखा सहजासहजी मिळत असल्याने सरकारच्या गुटखाबंदीचा सर्रास फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू यावर महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून बंदी घातलेली आहे,ती बंदी उठवण्यायाबाबत अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. मात्र ही बंदी लागू असतानाही स्ट्रॉंग तंबाखूजन्य किवामयुक्त पान आजही ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होत आहे.एके काळी लोकप्रिय असलेल्या मसाला पानाची जागा फुलचंद या पानाने घेतली असल्याने,तोंडाला सुगंध आणणारा किमाम आणि चटणी हे मुख्य घटक या पानाची वैशिष्ट्ये वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे,आणी तरुण वर्ग एकाप्रकारे अशा वेसनाच्या आहारी जात असुन अन्नभेसळ प्रतिबंधक विभाग,गुन्हे अन्वेषण आणि संबंधित स्थानिक पोलिस प्रशासन याबाबत संबंधित तंबाखूजन्य किमाम वापरणाऱ्या पानटपऱ्या धारकांवर कोणतीही उचित कार्यवाही न करता केवळ बघ्याची भुमिका बजावत असल्याने त्यांच्याही कर्तबगारीवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो आहे.की बंदी असलेले माल राजरोसपणे विक्री करणारे संबंधित पानटपऱ्याधारक व्यावसायिक आणि ज्यावर ज्यांचे नियंत्रण असावे असे संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात आपसी संगनमत तर नव्हेना? जर दिवसाढवळ्या इतक्या प्रचंड प्रमाणात बंदी असलेले गुटखा, मसाला सुगंधी पानच्या नावाखाली स्ट्रॉंग तंबाखूजन्य फुलचंद पानाची राजरोसपणे विक्री होत असेल, शिवाय बंदी असलेला सर्व प्रकारचा गुटखा हा राजरोसपणे विकला जात असेल तर मग यावर आवर घालणारे संबंधित प्रशासन काय करत आहे ? असा खडा प्रश्न आज शहरासह तालुक्यातील नागरीकांच्या मनात निर्माण होतो आहे.संबंधित खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सदरील पान टपऱ्याधारकांशी जर लागे बांधे नसेलतर मग कारवाई का केली जात नाही अशीही शंका उपस्थित केली जात आहे.मात्र बातम्या आणी निवेदन देवून कोणास काहीच फरक पडणार नाही,सर्वच गेंड्याच्या कातडीचे बनले आहे,मात्र प्रश्न तरुण पिढी बरबाद होत असल्याबाबतचा आहे,याकरीता पत्रकार आसलम बिनसाद आणि तमाम सामाजिक कार्यकर्ते याविरुद्ध उग्र आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत.तरच असले गैरप्रकार बंद होतील अन्यथा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे जसे मागे चालु राहीले तसे पुढे देखील चालुच राहणार असून करीता सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखी वेळीच सावध होऊन या गैरप्रकाराला वाचा फोडणेकामी पुढे आले पाहिजे तरच सर्व काही शक्य होवू शकणार आहे.असे तिरंगा न्युज चे संपादक आसलम बिनसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment