या यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग संघटना व पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, शारीरिक शिक्षण संचालक व अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रा. विजय देशमुख, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख व उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे, यांनी अभिनंदन केले, व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या निवडीबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
वेटलिफ्टिंग खेळासाठी कोमल वाकळे व योगिता खेडकर यांची ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड.
पाथर्डी - अहमदनगर जिल्ह्याचे वेटलिफ्टिंग खेळाडू व बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कोमल वाकळे व योगिता खेडकर यांची गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. कोमल वाकळे हिची ८७ किलो वजन गटात तर योगिता खेडकर हिची ८७ किलो वरील वजन गटात निवड करण्यात आली आहे. भारताच्या प्रतिष्ठित असलेल्या या स्पर्धेत एकूण ४३ क्रीडा प्रकारात भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे संघ सहभागी होणार आहे. या आधी गुजरात येथे झालेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेमध्ये कोमल वाकळे हिने महाराष्ट्र संघास सुवर्णपदक मिळवून दिले होते. कोमल व योगिता या दोघींनी ही अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळविले आहे.
Post a Comment