या बैठकीच्या अध्यस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बरकत अली शेख हे होते. बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार कासम शेख यांनी केले तर प्रास्ताविक पत्रकार सुभाष राव गायकवाड यांनी केले या कार्यक्रमात महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या सदस्यपदी काही नवीन पत्रकारांना सदस्यपदी घेण्यात आले असून त्यांना शेख बरकत अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले
या बैठकीत देवळाली प्रवरा येथील महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे राहुरी तालुका प्रमुख जेष्ट पत्रकार इब्राहीम शेख यांची इंडियन कॉग्रेस ब्रिग्रेड कमेटी (महाराष्ट्र) च्या राहुरी तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तसेच श्रीरामपुर येथील युवा पत्रकार इम्रान शेख यांची इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटीच्या श्रीरामपुर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या दोघांचे निवडीचे पत्र इंडियन कांग्रेस बिग्रेड कमिटीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी बरकत अली शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार कासम शेख, इब्राहीम शेख, असलम बीनसाद, सुभाष गायकवाड, गुलाब भाई शेख, एजाज सय्यद, इम्रान शेख ,यांनी उपस्थित पत्रकारां समोर मार्गदर्शनस्पद मनोगत व्यक्त केले व याकार्यक्रमाचे अध्यक्ष बरकत अली शेख यांनी पत्रकारीता कशी करावी या बाबत उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, पत्रकार असलम बीनसाद,इब्राहीम शेख, सुभाष गायकवाड, कासम शेख, शफी शेख, शब्बीर कुरेशी मोईन शाह गुलाब भाई शेख, जमीर शेख, भैय्या शेख, यांनी शेवटी उपस्थितांचेआभार मानले
Post a Comment