अहमदनगर प्रतिनिधी- दिवसा घरफोडी करणा-या टोळीचा म्होरक्या पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून सुमारे ६ तोळे सोने व ९२० ग्रॅम वजनाची चांदी असे एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अविनाश दिलीप क्षेत्रे (रा भुषणनगर केडगाव अ.नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि २० मे २०२२ रोजी सकाळी पहाटे ४.३० वा सुमारास मी आई वडिलांसह देवदर्शनकरीता राहते घरास कुलूप लावून जेजुरी येथे गेलो. या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून उचकापाचक करून गोदरेज कपाटातील सोन्या-चांदीचे ३ लाख ३ हजार १०० रुपये किंमतीचे दागीने स्वताःच्या आर्थिक फायद्याकरीता चोरुन नेले आहेत. या पुजा मनोज बडे (रा भुषननगर केडगाव अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं । ३९४/२०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा पाळत ठेवून झालेला असून घराची माहीती देणारे आरोपी हे अहमदनगर येथील आहे. घरफोडी करणारे आरोपी हे पुणे येथून आलेले होते, अशी प्राथमिक माहीती मिळाल्यावरुन आरोपींचा शोध घेणे कामी गुन्हे शोध पथकाचे एक पथक पुणे येथे व दुसरे पथक कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत रवाना करुन आरोपींचा शोध घेत असतांना एकजण गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोने चांदीचा मुद्देमाल विक्री करणे करीता एकजण गंजबाजार येथे येणार असल्याबाबत माहीती मिळाली. त्या ठिकाणी सापळा लावून एकजण संशयीतरित्या सोने व चांदी विक्री करणे कामी सराफ बाजारात फिरताना मिळून आला. त्यास कोतवाली पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याला विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अविनाश दिलीप क्षेत्रे (रा भूषणनगर केडगाव अ.नगर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिणे मिळून आले. दागिण्याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने व त्याचे साथीदार यांनी मिळून केडगाव भूषणनगर येथे घरफोडी केल्याचे कबुल केले. त्याला गुन्हा करते वेळी पुणे येथील आरोपी साथीदार होते असे त्याने सांगितले आहे. तसेच त्याच्या साथीदाराबाबत माहीती घेतली असून त्याचा कोतवाली पोलिस शोध घेत आहोत.
Post a Comment