सहा गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसा सह संगमनेरचे तरूण जेरबंद,एलसीबीची कोल्हारमध्ये कारवाई.

अहमदनगर प्रतिनिधी - सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसेसह संगमनेरच्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथे पकडले. ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तरूणांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख 86 हजार 100 रूपयांचे सहा गावठी कट्टे, 12 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मनोहर गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.कोल्हार येथील नगर-मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ ऋषिकेश घारे व त्याचा साथीदार गावठी कट्टे विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची माहिती

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांंनी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, विश्वास बेरड, ज्ञानेश्वर शिंदे, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.पथकाने कोल्हार येथील नगर-मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ सापळा लावला. दोन तरूण पायी येताना दिसताच त्यांना पथकाने पकडले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता ऋषिकेश घारेच्या कंबरेला पँटचे बेल्टमध्ये खोसलेला एक गावठी कट्टा पोलिसांना मिळून आला. समाधान सांगळे याच्या पाठीवर असलेल्या काळे रंगाच्या पिशवीची (सॅक) पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये पाच गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी सर्व कट्टे, काडतुसे जप्त करत दोघांना अटक केली.अटक करण्यात आलेला आरोपी सांगळेविरूध्द संगमनेर शहर, संगमनेर तालुका, शिर्डी पोलीस ठाण्यात दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे आदी स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संजय सातव (शिर्डी) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget