बेलापूर : - ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक दिवसांपासून बेलापूरकरांना दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून त्यात सुधारणा न झाल्यास पाणीपुरवठ्याच्या मुख्य टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा अशोक कारखाण्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी
ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या साथीचे रोग चालू आहे. त्यातच एक ते दिड महिन्यापासून गावात पिण्यासाठी दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाणीसाठा मुबलक असताना , ऐन दिवाळीतही नागरिकांना अशाच दुषित पाण्याचा पुरवठा केला गेला. पाणी मुबलक असताना जारचे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तळ्याचे व इतर श्रोतांच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावे व त्वरित पाणीपुरवठा सुधरावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
वेळोवेळी सांगूनही यात सुधारणा होत नसल्याने पुढील आठ दिवसात पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास ग्रामस्थांसह मुख्य पाण्याच्या टाकीवर चढून सामुदायिक शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिषेक खंडागळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेनावर भास्कर बंगाळ , प्रसाद खरात , शांतवन अमोलिक , महेश कुऱ्हे , दादासाहेब कुताळ आदिंच्या सह्या आहेत.
Post a Comment