श्रीरामपुर (खास प्रतिनिधी )-श्रीरामपुर तालुक्यातील एक व्यक्ती हिमाचल प्रदेश येथे मानसिक संतुलन हरवलेल्या स्थितीत चार महीन्यापासुन भटकत असुन तेथील सामाजिक सांघटनेच्या कार्याकर्त्याने बिनधास्त न्यूजला ही बातमी पाठविली असुन तालुक्यात या व्यक्तीचे कुणी नातेवाईक असेल तर त्यांनी तातडीने संपादक बिनधास्त न्यूजशी किव्वा पवन बोहरा ९८१६४६२५५९ हिमाचल प्रदेश, संपर्क साधावा असे अवाहन करण्यात येत आहे . सदरची व्यक्ती ही हिमाचल प्रदेश मधील सिरमौर जिल्ह्यातील पावाटा तालुक्यात मानसिक संतुलन हरवल्यामुळे भटकंती करत आहे ती व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील श्रीरामपुर तालुक्यातील असल्याचे सांगत असुन तेथील पवन बोहरा या सामाजिक कार्यकर्त्याने बिनधास्त न्यूजशी संपर्क साधला असुन आपल्या बिनधास्त न्यूजमधुन या बातमीला प्रसिद्धी दिल्यास एका व्यक्तीला आपले नातेवाईक व घर परिवास परत मीळू शकतो अशीही अपेक्षा पवन बोहरा यांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment