🔹काम पडले लांबणीवर
🔹जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
🔹शासकीय भूखंडावर कोणाचा डोळा❓
बुलडाणा - 4 जुलै
विकासकामे करण्याच्या अभिवचनावर निवडून येणाऱ्या एका नगरसेविकेनेच जलकुंभाच्या निर्माण कार्यात अडसर निर्माण केल्याचा प्रकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या कडे केलेल्या तक्रारीवरुन चव्हाट्यावर आला आहे. जलकुंभाच्या पूर्नभरणासाठी नगरसेविकेच्या शाळा परीसरात टाकलेला शासकीय कामाचा मुरुम उचलण्यास नगरसेविकेने विरोध केल्यामूळे आधीच संथ गतीने होणारे जलकुंभाचे काम लांबणीवर पडले आहे.
बुलडाणा शहर व 4 गांवे पाणी पुरवठा योजना अंतर्गत शहरातील इकबाल नगर भागात 13 लक्ष लीटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाकीच्या खोदकामास दि. 3 ऑक्टोंबर 2019 पासून सुरुवात करण्यातआली . खोदकामातून मोठ्या प्रमाणात मुरुम काढण्यात आला परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात निघालेला मुरुम ठेवण्यासाठी कामाच्या ठीकाणी जागा नसल्याने सदर मुरुम तात्पुरत्या स्वरुपात नगर सेविका आस्मा परवीन शेख याकूब यांच्या मिर्ज़ा नगर येथील शाळेसमोरील शासकीय मोकळ्या जागेत ठेवण्यात आला. जलकुंभाचे काम जमिन लेवल पर्यंत पुर्ण झाले. पुर्नभरती करण्यासाठी परत मुरुम उचलण्यास ठेकेदाराचे कामगार जेसीबी घेऊन गेले असता नगर सेविका आस्मा परविन शेख याकूब यांनी विरोध केल्यामुळे जलकुंभाच्या पुर्नभरणास व पुढील कामास विलंब होत आहे. एके प्रकारे नगरसेवीका या शासकीय कामात अडथळा आणत असल्याचे बोलल्या जात आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन संबंधीतांना आदेशीत करावे अशी मागणी व विनंती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग बुलडाणा यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पात्रात केली आहे.
तर दूसरीकडे ज्या सरकारी जागेवर सदर मुरुम गंजी मारून ठेवण्यात आला होता त्या ठीकाणी आजच्या घडीला मुरुम पांघरुन दिलेला आहे.एके प्रकारे हा शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रकार असल्याचेही बोलल्या जात आहे,सदर शासकीय जागेवर कोणाचा डोळा आहे हे परिसरातील सर्वांना माहित आहे.
Post a Comment