बुलडाणा - 4 जुलै
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात गांधी चौक जवळ गुजरी भागात आशीष नवगजे यांच्या मालकीची 3 मजली इमारत आज 4 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान अचानक पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हाणी झाली नाही. सदर इमारत 34 वर्ष जुन असल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीच्या खालच्या बाजूस किराणा दुकान होते. तर वरच्या मजल्यावर नवगजे यांचे आई-वडील, पत्नी, मुलगी असे चार जणांचे कुटूंब याठिकाणी 34 वर्षापासून राहत होते. यासह ही इमारत क्षतीग्रस्त होण्याच्या 1 तास अगोदरच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे यामध्ये सुदैवाने जीवीत हाणी झाली नाही. सदर इमारत पडकीस आल्यामुळे उपाय योजना म्हणून पुढील धोका टाळण्यासाठी नांदुरा न.प.प्रशासनाने नवगजे यांना इमारत रिकामी करण्यासाठीची नोटीस दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
Post a Comment