संगमनेर-(राजेशजेधे)संगमनेरतालुक्यातील धांदरफळ येथील सहा तर संगमनेरात एक अशा सात व्यक्ती करोना बाधीत आढळल्याने संगमनेर पुन्हा हादरले आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल दिवेद्वी व जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट देवून पाहणी केली. संगमनेरचा जाहीर झालेला हॉटस्पॉट व धांदरफळ बुद्रूक प्रतिबंधात्मक क्षेत्र येथे आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची तंबी जिल्हाधिकार्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिली आहे. तालुक्यातील धादंरफळ येथील 67 वर्षीय व्यक्ती करोना बाधीत होवून मयत झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यापाठोपाठ संगमनेरातील कुरण रोड येथील एक महिला व धांदरफळ बुद्रूक येथील सहा व्यक्ती करोना बाधीत आढळले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट दिली.संगमनेरातील जाहीर केलेल्या हॉटस्पॉट एरियाची मॅपनुसार जिल्हाधिकार्यांनी पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे कडक अंमलबजावणी करण्याची तंबी प्रशासकीय अधिकार्यांना दिली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, डीवायएसपी रोशन पंडीत, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदि उपस्थित होते.
Post a Comment