शिर्डी राजेंद्र गडकरी /जय शर्मा । विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्यावतीने शिर्डी येथे, या लॉकंडाऊन काळात गरजूंना किरांणाचे वाटप करण्यात आले,
विराट प्रतिष्ठान म.रा. या सामाजिक संस्थेचे राज्यभर मोठे जाळे असून विविध संकटसमयी या संघटनेच्या वतीने देशहीत लक्षात घेऊन नेहमी मदतीचा हात पुढे केला जातो ,अशातच सध्या सुरू असलेल्या कोरोना माहामारी मुळे देशात व राज्यात मोठे संकट निर्माण झाले आहे ,देशभर सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे शिर्डी सुद्धा बंद आहे ,अशा परिस्थितीत शिर्डीतील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबे दररोज हातावर पोट भरणारे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत ,मात्र काही कामधंदे नसल्यामुळे व घरात बसून असल्यामुळे शाखेच्यावतीने शिर्डीतील उपनगरांमधील अनेक गरजवंत व गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबाला, महिलांना घरोघरी जाऊन 201 पाकिटे तय्यार करुण किराणा सामानाचे नुकतेच वाटप करण्यात आले, सौ,जयाताई सुनीलराव सरोदे यांच्या हस्ते शिर्डी उपनगरातील अनेक भागात हे किराणा किटचे वाटप महिलांना करण्यातआले, याप्रसंगी विराट महिला प्रतिष्ठानच्या काही महिलाही उपस्थित होत्या ,मात्र हे किराणा वाटप करताना लॉक डाऊन चे सर्व नियम व सोशल डिस्टंंन्स पाळत ,तोंडाला मास्क लावून हे किराणा वाटप करण्यात आले, तसेच कोणताही गाजावाजा करण्यात आला नाही, या अगोदरही विराट प्रतिष्ठानने नवरात्रीमध्ये गरजू महिलांना साड्या वाटप, मुलांना विद्यार्थ्यांना पुस्तके ,वह्या, शालेय वस्तूंचे वाटप ,दिव्यांगांना वेगवेगळ्या प्रकारांनी मदत तसेच राज्यातही विविध आपत्ती काळात विविध स्वरूपात मदत करण्यात आली आहे , सध्याच्या संकटसमयी गरजूंना किराणा कीट वाटल्याबद्दल विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्या चे शिर्डी व परिसरातून कौतुक होत आहे.
Post a Comment