बुऱ्हाणपूर येथील नागरिक लहान मुला बाळासह पायी प्रवास करत होते. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती प्रशासनास दिली. तात्काळ तहसीलदार प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत, सदर व्यक्तींची चौकशी केली. त्यावर त्यांनी वाशिम जिल्ह्यातून कामानिमित्त तसेच मध्य प्रदेशमधून कामानिमित्त आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. याच परिसरातील दोन कार्यालयांमध्ये निवारा केंद्र
तयार करून त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे. काल दुपारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे तसेच त्यांच्या पथकाने या मजुरांची वैद्यकीय तपासणी केली.सदर दोन्ही ठिकाणी ३४-३४ लहान-मोठे व्यक्ती ठेवण्यात आले आहे. सदर व्यक्तींची श्रीरामपूर येथील गुरुद्वारा येथून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या सांगितल्यानुसार श्रीरामपूर येथील अनेकांनी सदर नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी वडाळा महादेव ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.
Post a Comment