शस्‍त्र परवानाधारकांची माहिती इलेक्‍ट्रॉनिक स्‍वरुपात भरण्‍यासाठी 25 एप्रिलपर्यत मुदत.

शिर्डी (प्रतिनिधी)  अहमदनगर दि. 13- नगर उपविभागातील अहमदनगर व नेवासा  तालुक्‍यातील सर्व शस्‍त्र परवानाधारकांना शस्‍त्र अधिनियम 1959 व शस्‍त्र नियम 1962 अंतर्गत देण्‍यात आलेले सर्व  शस्‍त्र परवान्‍यांची माहिती इलेक्‍ट्रॉनिक स्‍वरुपात भरण्‍यासाठी कळविण्‍यात आले होते. ज्‍या शस्‍त्र परवानाधारकांनी अद्यापही विहित नमुन्‍यातील माहिती भरुन दिलेले नाही. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी  दि. 25 एप्रिल 2020 पूर्वी समक्ष अथवा प्रतिनिधीमार्फत उपविभागीय दंडाधिकारी, नगर भाग,अहमदनगर यांच्‍याकडे जमा करण्‍यात यावी.
शस्‍त्र परवानाधारकांना सदरची माहिती इलेक्‍ट्रॉनिक स्‍वरुपात भरण्‍यासाठी  ही शेवटची मुदतवाढ असल्‍याने शस्‍त्र परवानाधारकांनी माहिती विहित नमुन्‍यात भरलेला अर्ज, शस्‍त्रपरवान्‍याची छायांकित प्रत, पासपोर्ट फोटोसह दिनांक 25 एप्रिल 2020 पर्यत उपविभागीय दंडाधिकारी ,नगर भाग, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे जमा करावीत.  ज्‍या शस्‍त्र परवाना धारकांची माहिती इलेक्‍ट्रॉनिक स्‍वरुपात भरण्‍यात आली नाही. अशा परवाना धारकांचा शस्‍त्रपरवाना रद्द करण्‍याबाबत कार्यवाही केली जाईल. याची सर्व शस्‍त्र परवानाधारकांनी नोंद घ्‍यावी. असे नगर भागचे  उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget