बुलडाणा - 15 फेब्रूवारी
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे राज्यात प्रतिबंधित गुटखा विक्री विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.काल अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी स्वतः एका टपरीवर गुटखा मिळतो का याची विचारणा केली असता त्याच्याकडे गुटखा असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी सोबत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या पानठेल्याची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले. या झाडाझडतीमध्ये गुटखा पुड्या आढळून आल्याने टपरी धारकविरोधात अकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 फेब्रुवारी रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे हे अकोला येथे स्वर्गीय वसंतराव धोत्रे यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाकरिता गेले असता त्यांनी अचानक निंबवाडी ट्रॅव्हल्स बस स्टँड जवळील मे.जामणिक कोल्ड्रिंक्स नामक पान टपरीवर जावून टपरीधारकला गुटखा मिळतो का अशी विचारणा केली असता त्याच्याकडे गुटखा विक्री होत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यावेळी त्यांनी लगेचच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना त्या पानटपरीची झडती घेण्याचे आदेश दिले. झडती दरम्यान 150 रु. किमतीच्या बाजीराव पान मसाला 30 पुड्या, 80 रु. किमतीच्या करमचंद पान मसाल्याच्या 20 पुड्या, 850 रु किमतीच्या राज रजणीगंधा पान मसाल्याच्या 50 पुड्या, 210 रु आरएमडी च्या 30 पुड्या, 255 रु विमल कंपनीच्या 30 पुड्या अशा प्रतिबंधित गुटख्याच्या एकूण 160 पुड्या मिळून आल्याने नामदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशावरून अन्न सुरक्षा अधिकारी अकोला या. बा.दहातोंडे यांनी सुरेंद्र रामराव जामणिक वय 31 रा.अकोला याच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वतः अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी पानटपरीवर केलेल्या या कारवाहीमुळे चिल्लर गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment