राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बिबट्या चा वावर वाढला असून रात्री बिबट्याच्या एक शेळी ठार झाली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे श्रीरामपूर रोड लगत सोसायटी डिझेल पंप मागे असलेल्या ढुस वस्ती येथील निवासस्थानी दि. १६ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला. परंतु कुत्र्यांच्या भुंकण्याने खेळाडू आप्पासाहेब ढुस व त्यांचे बंधू अरुण ढुस हे उठून बाहेर आलेने बिबट्याने मृत शेळी तशीच सोडून पळ काढला.
ही शेळी पाच महिन्याची गाभन असल्याचे सांगून देवळाली सोसायटीच्या माजी संचालिका चांगुणाबाई ढुस व नंदा ढुस यांनी दुःख व्यक्त केले असून ढुस वस्ती व देवळाली परिसरातील शेतकरी वर्गामध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment