"ज्ञानगंगा अभयारण्यात" आलेला "C1-वाघ" झाला ट्रॅप कॅमेऱ्यात कैद, होय ! वाघाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला.

(बुलडाणा- 13 डिसेंबर )5 महिन्यात तब्बल 13 शे किलोमीटरचा लांब पल्ला गाठत यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयरण्यातून बाहेर पडत "C1" नावाचा 3 वर्षीय सबअडल्ट वाघ चक्क बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला असून 10 दिवसाच्या अथक प्रयत्न नंतर पहिल्यांदाच सदर वाघ जंगलात लावलेल्या एका ट्रैप कैमऱ्यात कैद झाल्याने वन्यजीव विभाग वाघाच्या संरक्षणासाठी सतर्क झालेला आहे,हा वाघ आपल्या नवीन टेरोटेरी तसेच वाघिनच्या शोधात  असल्याची शक्यता अकोला वन्यजीव विभागाचे डीएफओ मनोजकुमार खैरनार यांनी वर्तवली आहे.
        बुलडाणा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध पशु-पक्षीचे अधिवास आहे.मागील 1 डिसेंबरच्या रात्री "C1" नावाचा पट्टेदार वाघ या अभ्यारण्यात दाखल झाला असून त्याची प्रत्येक हालचालीवर वन्यजीव विभाग लक्ष ठेवून आहे.दोन दिवस अगोदर जंगलात लावलेल्या ट्रॅप कैमऱ्यात एका ठिकाणी रात्रीच्या वेळी हा वाघ कैद झाला आहे. रेडिओ कॉलर लावलेला सदर वाघाचा पाठलाग तर सुरुच होता पण आता त्याचा फोटो हाती आल्यानंतर वन्यजीव विभाग अजुन सतर्क झालेला असून त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या पाऊले उचलली जात आहे.
        यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात 3 वर्षा अगोदर एका "T1" नावाची वाघिनने 3 बछडे दिले होते त्यांचे अनुक्रमे C1,C2 आणि C3 अशे नामकरण करण्यात आले होते.लहानपणा पासून C1 वाघ लवकर उघड़पणे समोर येत नव्होता म्हणजेच तो अतिशय लाजाळु होता.5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा प्रवास करत असतांना त्याला फक्त बुलडाणा जिल्ह्यातील माटरगांव परिसरात एका व्यक्तिने पाहिले होते.मागील 12 दिवसापासून सदर वाघ या अभयारण्यात थांबलेला आसुन तो पूर्ण जंगलात फिरून पाहणी करीत आहे. अभयरण्यातून जाणारा मार्ग रात्री 10 ते साकाळी 5 वाजे पर्यंत काटेकोरपणे बंद ठेवावे,वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी मार्गावर गतिरोधक बसविन्यात यावे,C1 वाघाच्या संरक्षणासाठी वन्यजीव विभाग,प्रादेशिक वनविभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे काम करावे अश्या महत्वपूर्ण मुद्द्यावार 10 डिसेंबरला आयोजित जिल्हा व्यघ्र समितीच्या बैठकीत चर्चा झाली.अस्वलांच्या आधिवासासाठी प्रसिद्ध असलेले ज्ञानगंगा अभयारण्य हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे. वाघ हा प्राणी राहण्यास इथले  वातावरण अनुकूल असून वाघाच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीवांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे हा वाघ ज्ञानगंगेत राहू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


एकदम आला रसत्यावर वाघ

खामगांवहुन आमचा काम अटपुन कारने बुलडाणा कडे येत असतांना ज्ञानगंगा अभयारण्य सुरु झाला व मुख्य घाट चढत असतांना एक भलामोठा आमच्या समोरून मार्ग क्रॉस करुण आत जंगलात निघुन गेला.सदर वाघ एकदम रुबाबदार,ऐठदार शैलीने त्याला जाताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले,वाघ समोर येताच आम्ही घाबरलो व कारचे काच बंद केले, आमची कारच्या सोबतच एक बाइक चालकाने व समोरून येणारी कार मधील लोकांनी ही या वाघाला पाहिला असल्याची माहिती C1 वाघाला प्रत्यक्ष पाहणारे अंढेरा फाटा येथील पत्रकार खंडू मान्टे यांनी दिली आहे. त्यांना हा वाघ 11 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजेच्या दरम्यान दिसून आला.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget