लोणी येथील हत्येप्रकरणातील आरोपी 24 तासात जेरबंद.

अहमदनगर (प्रतिनिधी ) राहाता तालुक्यातील लोणी येथील हत्येतील आरोपी 24 तासांच्या आत पकडण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश आले आहे. सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (वय 24, रा.बीफ मार्केटजवळ, वार्ड नं.2, श्रीरामपूर), संतोष सुरेश कांबळे (वय 28, रा. मुन्नाभाई वखारीचे बाजूला, बीफ मार्केटजवळ, वार्ड नं.2, श्रीरामपूर), गाठण उर्फ शाहरूख उस्मान शहा (वय 20, रा.बीफ मार्केटजवळ, वार्ड नं.2, श्रीरामपूर), अरुण भास्कर चौधरी (वय 23, रा. सोनगांवरोड, खंडोबा मंदिराजवळ, लोणी प्रवरा ता. राहाता) आदी चार आरोपींना पकडण्यात आले आहेत.
 याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर येथील आशा आब्बू कुरेशी यांचा मुलगा फरदीन कुरेशी याला नाशिक येथे सोबत येण्यासाठी आरोपी सिराज शेख, संतोष कांबळे, शाहरूख शहा या सर्वांनी जबरदस्तीने नाशिकला नेले. यानंतर पुन्हा लोणी येथे आणून आब्बू कुरेशी यांच्या साथीदार उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी ता.राहाता) आदींमध्ये भांडणे झाली. या भांडणात गावठी कट्ट्यातून गोळीबार करून फरीद कुरेशी यांची हत्या झाली होती. या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र पथके नेमण्यात येऊन सदर आरोपींचा शोध घेऊन पोहेकॉ दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, आण्णा पवार, शंकर चौधरी, रविंद्र कर्डिले, विजय वेठेकर, संदीप घोडके, संतोष लोढे, संदीप दरंदले, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, रवि सोनटक्के, मेघराज कोल्हे, सचिन आडबल, विजय ठोंबरे, मयूर गायकवाड, चालक पोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने पकडण्यात यशस्वी  कामगिरी केली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget