सिल्लोड, प्रतिनिधी : मान्सनोत्तर पावसात पिके व चारा कुजल्याच्या विरहाने कृष्णा एकनाथ काकडे (38 रा. पूर्णावाडी, धानोरा) या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा सोमवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. बुधवारी त्यांच्या कुटुंबाची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांत्वन करीत शासकीय मदत मिळवून देऊ असे सांगत धीर दिला.
मयत शेतकऱ्याला धानोरा शिवारात गट नं. 293 मध्ये अवघी एक एकर शेती आहे. यामुळे ते दुग्ध व्यवसाय करुण कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु परतीच्या पावसाने सोंगनी केलेल्या मकाच्या कणसाला कोंब फुटली, तर चारा वाहून गेला. यामुळे दुभत्या गायीला काय खाऊ घालणार अशा तणावात ते होते.
कुटुंबातील कर्ताच माणूस गेल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या कुटुंबाची माजी आ. सांडू पाटील लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, माजी सरपंच माधवराव काकडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
Post a Comment