श्रीरामपुर (प्रतिनिधी)अंगणात खेळणार्या मुलांच्या वादातून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून आज सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास श्रीरामपुरमधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जखमी झाले,१)शरीफ रशीद शेख २)जमील रशीद शेख ३)फरीद रशीद शेख सर्व राहणार हुसेन नगर श्रीरामपूर तर गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने दोघे आरोपी जखमी झाले.१)शेख रफद शेख रशीद राहणार ओरंगाबाद २)सय्यद मुजीब सय्यद राहणार ओरंगाबाद जखमींवर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गोळ्या झाडल्याची घटनास्थळी चर्चा होती.
Post a Comment