बेलापूर ( प्रतिनिधी )- संक्रापूर तालुका राहुरी येथील जाधव वस्तीवर असणार्या विद्युत वाहीनीवर विज पडल्यामुळे ती विद्युत वाहीनी ( डी पी ) जळाली असुन सदर डी पी तातडीने दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे परवा रात्री अचानक आकाशात विज चमकली अन जोराचा आवाज झाला अन परिसरातील लाईट गेली दुसर्या दिवशी सकाळी ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचार्या समवेत विज गेल्याचे कारण शोधले असता विज पडून डी पीच जळाली असल्याचे महावितरणच्या कर्मचार्याने सांगितले दोन दिवसापासून येथीला नागरीक अंधारात असुन परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे तरी तातडीने डी पी दुरुस्त करावी आशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
Post a Comment