एमआयएम कडून मो.सज्जाद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला,लवकरच बुलडाण्यात असदुद्दीन ओवैसीची सभा

बुलडाणा - 4 ऑक्टोबर
थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत बुलडाण्यात इतिहास घडवणा-या मो. सज्जाद यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीची आस होती, मात्र तेजल शरद काळे या नविन चेह-याला प्रकाश आंबेडकर यांनी समोर केले.ऐनवेळी शिवसेनेचे बंडखोर विजयराज शिंदे यांना पक्षात घेत एबी फॉर्म दिला. त्यामुळे मो.सज्जाद आणि समर्थकांनी एमआयएमची वाट धरली. मो.सज्जाद यांनी आज 4 आॅक्टोंबर रोजी एमआयएम पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.लवकरच बुलडाण्यात एमआयएम राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार असल्याची शक्यता मो.सज्जाद यांनी वर्तवली आहे.
      बुलडाण्याच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा बेगम यांचे पती तथा नगरसेवक मो.सज्जाद यांनी एमआयएम पक्षाचा एबी  फॉर्म जोडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमदेवारी अर्ज दाखल झाल्याने बुलडाण्यात आघाडीचे समिकरण बदलणार आहे. मो.सज्जाद अल्पसंख्यांकाचे नेते असून त्यांच्यासोबत दलित आणि बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे. हेच समिकरण दोन वर्षापूर्वी बुलडाणा नगर पालिकेच्या निवडणूकीत बघायला मिळाले. आता बुलडाणा विधानसभा निवडणूकीत त्यांनी एमआयएमचा झेंडा हातात घेतल्याने नगर पालिकेच्या निवडणूकीचे समिकरण या निवडणूकीतही कायम राहते का हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget