अहमदनगर
(प्रतिनिधी)-घोडेगाव येथील घर पाडताना सोन्याची कळशी सापडली असून ती विकायची आहे, असे सांगून 19 जानेवारी 2019 ला दुपारी पांढरीपूल येथे सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर जि. पुणे) येथील दीपक नामदेव थोपटे (वय-51) व त्यांचे दोन मित्र यांना मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम, अंगावरील सोन्याचे दागिने असा 9 लाख 84 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपी अरुण चव्हाण याला यापूर्वी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार या गुन्ह्यातील आरोपी नंदू काळे (रा. खोसपुरी ता.नगर) हा त्याच्या राहात्या घरी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, कर्मचारी मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डीले, राम माळी, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश सातपुते, संदीप दरंदले, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे,सचिन कोळेकर यांच्या पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याने वरील गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधिक्षक,सागर पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामीण अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Post a Comment