तालुक्यातील मेंढी येथील शेत शिवारात एकाच्या डोक्यावर प्रेम प्रकरणातून जबर वार करून ठार केल्याची घटना आज दि.१८ ऑगस्ट सकाळी ७ वाजता उघडकीस आली.
मेंढी येथील रस्त्याच्या बाजूला शेतीलगत पडीत शेतात एका युवकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्याने युवकाचा खून झाल्याची एकच चर्चा झाल्याने खळबळ उडाली. तेव्हा घटनास्थळी गावकऱ्यांची एकच गर्दी झाली.या घटनेची माहिती मेंढी येथील पोलीस पाटील यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे दिली.माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस रवाना झाले.तेव्हा मृतदेहाची ओळख केली असता मृतक हा
डोळंबावाडी येथील रहिवासी कृष्णा परशराम उकंडे (वय-२२) याचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मृतक कृष्णा उकंडे हा मुबई येते काम करण्यासाठी अनेक दिवसांपासून गेलेला होता मात्र रक्षा बंधनाकरिता दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी आला होता.तेव्हा तो काल दि.१७ ऑगस्ट रोजी तालुक्यातील मेंढी येथील मामा गुलाब मारोती बुचके यांच्याकडे गेला होता.मृतक यांचे आरोपी संतोष दौलत डहाके (वय-३५) रा.मेंढी यांच्या मुली सोबत प्रेम प्रकरण असल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले.या प्रेम प्रकरणाची आरोपीला माहिती झाली होती.त्याने अनेकवेळा त्याला धमकी सुद्धा दिली असल्याचे फिर्यादी गुलाब मारोती बुचके यांनी पोलिसात दिली.त्यावरून पोलिसांनी आरोपी संतोष दौलत डहाके याला ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी संतोष दौलत डहाके यांच्यावर भादवी कलम ३०२,५०६ नुसार गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल,पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले,सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, उपनिरीक्षक सुरेश कनाके,नितीन वास्टर,अरविंद कोकाटे,प्रकाश चव्हाण,ब्रम्हदेव टाले,मनोज चव्हाण सह पोलीस कर्मचारी करीत आहे.
Post a Comment