अहमदनगर (प्रतिनिधी) गोव्यातील दारू दुसर्या बाटल्यात भरून विक्रीचे रॅकेट चालविणार्या जामखेड येथील अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून तब्बल 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. तसेच दोघांना अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार पसार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जामखेड तालुक्यातील हॉटेल साईराम येथे हा छापा घातला. तेथून महेश शिवाजी इकडे (रा. झिकरी, ता.जामखेड) व ऋषिकेश अशोक काकडे (रा. बोरले, ता.जामखेड) या दोघांना अटक केली आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्यातील विदेशी मद्याचे 57 बॉक्स, प्लॅस्टिक चे सिलकॅप 28 हजार, पत्री बूच 2 हजार व 5 हजार लेबल, रिकाम्या बाटल्या 10 हजार असा साठा जप्त केला. विदेशी मद्याचा चोरून वाहतूक करण्यासाठी कार असा एकूण 10 लाख तीन हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी भाऊसाहेब पाटील गरड हा पसार झाला आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग, उपअधीक्षक सी. पी. निकम, निरीक्षक ए. बी. बनकर, ए. व्ही. पाटील, संजय सराफ, बी. बी. हुलगे, डी. बी. पाटील यांच्या पथकाने केली.
Post a Comment