दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक मनोजजी आगे यांचा बेलापुरात वाढदिवसानिमित्त सत्कार; मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
बेलापूर, प्रतिनिधी दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री. मनोजजी आगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त सकाळी बेलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक श्री. मनोजजी आगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर, ग्रामपंचायत बेलापूर येथे श्री. मनोजजी आगे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. आगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य पुरुषोत्तम भराटे, दैनिक जय बाबाचे प्रतिनिधी दिलीप दायमा, पत्रकार सुहास शेलार, बाबा शेख, मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, अरुणोदय पतसंस्थेचे संचालक संजय गोरे, गावकरी संस्थेचे संचालक प्रवीण बाठीया, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, विजय कटारीया, महेश कुऱ्हे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्री. मनोजजी आगे यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.