Latest Post

श्रीरामपुर-मराठी भाषेत सर्व प्रकारचे साहित्य प्रकार उपलब्ध असल्याने ती सर्वंकष आणि समृद्ध आहे.त्यामुळे संपूर्ण जग मराठी भाषेचा गजर आणि जागर करीत असल्याचे प्रतिपादन पत्रकार व वात्रटिकाकार नवनाथ कुताळ यांनी केले आहे.

               मॉडेल इंग्लिश स्कुल येथे मराठी गौरव दिनाचे  आयोजन करण्यात आले होते  त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्या तृप्ती करीर होत्या.यावेळी मराठी गौरव पिठावर संस्थेच्या अध्यक्षा मैमकौरजी सेठी,संचालक रतनसिंगजी सेठी, बलजीत कौरजी सेठी,उपमुख्याध्यापक विनोद जोशी,यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

उपप्राचार्य जोशी,सुतार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.नवनाथ कुताळ पुढे म्हणाले की मॉडेल इंग्रजी माध्यमाची शाळा असतानाही फक्त इंग्रजीचाच विचार न करता मराठी भाषाही समृद्ध ठेवली आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य ग्रंथ दिंडी काढली होती.तर पोवाडे,कविता,पंढरीची वारी अन भजने, स्फूर्ती गीते आदींसह मराठी साहित्य प्रकारातील वैविध्यपूर्ण सादरीकरण करून बाल पिढीतही मराठी भाषा कशी समृद्ध आहे हे दाखवुन दिले.

           स्वागत आयुष बागूल याने,परिचय कार्तिक आसने या विद्यार्थांनी तर प्राची सुर्यवंशी, तन्मय खटाणे,ओम शिंदे,अभिराज लोंढे यांनी मनोगत,कविता,पोवाडा सादर केला.विद्यार्थ्यानी ग्रंथदिडी,शिवाजी महाराज,विठ्ठल रूख्मिनी ,लेझिम,'होता जीवा म्हणून वाचला शिवा' यावर आधारीत पोवाडा, असे साहित्याचे अनेक पैलू सादर केले. आर्या लोंढे व आर्यन सरोदे यांनी सूत्रसंचालन केले तर आयुष बागुल याने स्वागत केले शेवटी विराज चौधरी याने आभार मानले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - आत्तापर्यंत मी सहा ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. त्यापैकी पाच ठिकाणी शिक्षण मंडळे होती. त्यामुळे नगरपालिका शाळांच्या समस्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत .वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील नगरपालिकेच्या सर्व शाळा अत्याधुनिक करण्यासाठी पालिकेने योजना तयार केली असून प्रत्येक शाळेला डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देणार आहोत.तसेच इतर सर्व भौतिक सुविधा पुरविल्या जातील. पालिकेची उर्दू शाळा क्रमांक पाच ही आमचा मानबिंदू आहे. या शाळेची प्रगती नेत्र दीपक असून आजच्या स्पर्धेच्या युगात शाळेने आपली पटसंख्या आणि गुणवत्ता टिकवून ठेवली. त्यामुळे ही शाळा आज जिल्ह्यात नावाजलेली आहे.पालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रिडा स्पर्धेत स्पर्धेत मिळवलेले यश भविष्यात शहराला नवीन खेळाडू मिळवून देतील असा आशावाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे यांनी व्यक्त केला.

येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच च्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक मुख्तार शाह होते. व्यासपीठावर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अविनाश आदिक,प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, नगरसेवक संजय छल्लारे,ताराचंद रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते मुक्तार मणियार, माजी नगरसेवक दत्तात्रय सानप, राजेंद्र सोनवणे, याकूबभाई बागवान,

कलीम कुरेशी,हिंद सेवा मंडळाचे सहसचिव अशोक उपाध्ये, खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जयंत चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अकिल सुन्नाभाई, ज्येष्ठ पत्रकार अशोकराव गाडेकर, अनिल पांडे, महेश माळवे, रवी भागवत, संतोष मते,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख, माजी अध्यक्ष रज्जाकभाई पठाण तसेच सरवरअली मास्टर, युवा नेते तौफिक शेख, जमील शाह, शफी शाह, फयाज कुरेशी, जाफर शाह,जिजामाता तरुण मंडळाचे उपाध्यक्ष संजय साळवे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नगरसेवक संजय छल्लारे तसेच अशोक उपाध्ये यांनी उर्दू शाळेच्या प्रगतीचा आवर्जून उल्लेख केला. मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली या शाळेची प्रगतीची घौडदौड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात नगरसेवक मुख्तार शाह यांनी शुभेच्छा दिल्या.

*आदिकांची फटकेबाजी*

या कार्यक्रमास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी अचानकपणे दिलेल्या  भेटी प्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगताने कार्यक्रमाची रंगत वाढवली.त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत व्यासपीठावरील उपस्थित माजी नगरसेवकांना चिमटे घेतले. हे सर्वजण माझे चांगले मित्र आहेत. यांच्यामुळे मी घडलो असे सांगत यातील अनेक जण मला दररोज मेसेज करीत असतात. वेगवेगळी चित्रे व फुले ते पाठवित असतात.मला आनंद एकाच गोष्टीचा आहे कि त्यांनी अजून कमळाचे फुल मला पाठवलेले नाही असे ते म्हणताच एकच हंशा पिकला.शाळा क्रमांक पाचच्या प्रगतीचे कौतुक करत अविनाश आदिक यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.

प्रास्ताविक भाषणात शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख यांनी शाळेमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल माजी अध्यक्ष रज्जाक पठाण यांचा मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अलीम शेख, मुख्याध्यापक जलील शेख, शाळा क्रमांक सहाच्या उपाध्यापिका लता औटी यांचा सत्कार करण्यात आला तर शिरसगाव शाळेचे मुख्याध्यापक सिद्दीक शेख हे उमराह यात्रेसाठी रवाना होत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसे दुपारच्या सत्रात शाळेचे स्नेहसंमेलन पार पाडले यामध्ये सर्वच वर्गांनी बहारदार कार्यक्रम सादर केले विशेषतः शाळा क्रमांक नऊच्या बेटीया आणि शाळा क्रमांक पाच च्या कव्वालीने उपस्थित प्रेक्षकांची खूप व्हावा मिळवली .

होते. दुपार सत्रात शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, लिपिक रुपेश गुजर, किशोर त्रिभुवन, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब सरोदे,माजी संचालक नानासाहेब बडाख,माध्यमिक सोसायटीचे संचालक सूर्यकांत डावखर, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जाकीर सय्यद,विकास मंडळाचे विश्वस्त प्रदीप दळवी, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संतोष वाघमोडे, कार्याध्यक्ष शाम पटारे, गणेश पिंगळे, केंद्रप्रमुख वाघुजी पटारे, शिक्षक नेते जब्बार सय्यद, मुख्याध्यापक राजू थोरात,परवीन शेख, जावेद शेख,समीरखान पठाण,जलील शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.

बेलापुर (देविदास देसाई  )- जळगाव येथील जैन इर्रीगेशन कंपनी व जैन हाईटेक प्लँट फँक्टरी या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपण कसत असलेली परंपरागत शेती सोडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुनच शेती करण्याचा निर्धार बेलापुरातील शेतकऱ्यांनी बोलून दाखविला.                               सार्थक एजन्सी व बेलापुर विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने जळगाव येथील कै.भवरलालजी जैन यांच्या संशोधनातुन व योगदानातुन उभारलेल्या जैन प्रकल्पाची पहाणी करण्यात आली.शेती करण्याच्या नवनविन पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना आपल्या जीवनात कसा वापर करता येईल या उद्धेशाने सहलीचे नियोजन करण्यात आले होते.छं.श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सहल जळगाव करीता रवाना झाली.जैन प्रकल्पाचे संचालक अभय जैन यांनी सर्वांच्या निवासाची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती.दुसऱ्या दिवशीं सकाळी सात वाजता आमची सहल मार्गदर्शकासह सुरु झाली. आंबा, पेरु, सिताफळ, डाळींब, सत्रा,नारळ, लिंबु,चिकु,केळी सफरचंद या फळबागाची पहाणी केली,संबधीत मार्गदर्शक प्रत्येक फळबागेविषयी सविस्तर माहीती देत होते.फळबाग लागवड करताना सरी किंवा बेड पुर्व पश्चिम दिशेनेच पाडावे जेणे करुन प्रत्येक झाडाला भरपुर सुर्यप्रकाश मिळाला पाहीजे. वेगवेगळ्या फळ पिकाच्या दोन झाडामधील अंतर किती असावे याचीही माहीती देण्यात आली .फळझाडांची उंची ही मर्यादित ठेवली पाहीजे हे सर्व फळबागाची पहाणी करताना सांगण्यात आले,त्याचे कारण फळांची काढणी व रोगराई व्यवस्थापन सोईस्कर व्हावे.फळ बागेला खते व पाणी कसे द्यावे याची सविस्तर माहीती देण्यात आली.पाणी थेंबान अन पिक जोमान हा मुलमंत्र सर्वांनी जपावा तसेच पाणी अमूल्य आहे त्याचा अति वापर करु नका ते पिकालाही अन जमिनीलाही मारक आहे हे तज्ञव्यक्तीकडून प्रात्याक्षीकासह दाखविण्यात आले. फळबाग तसेच पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देण्याकरीता निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रीप नळ्यांची माहीती देण्यात आली. मिनी स्प्रिंकलर, मायक्रो स्प्रिंकलर, रेनपोर्ट,मेटल इम्पँक्ट स्प्रिंकलर, रेनगन, प्लास्टिक इम्पँक्ट स्प्रिंकलर ,क्विक कनेक्ट पाईप, त्याची वापरण्याची पद्धत ,येणारा खर्च, होणारी बचत,मिळणारे शाश्वत उत्पन्न या विषयी सखोल माहीती देण्यात आली.पिकाला पाणी देण्याकरीता स्वयंचलित सेफ्टीवाँल्व यंत्रणा दाखवीण्यात आली. वेगवेगळी फील्ट्रेशन संसाधने,सँण्ड सेपरेटर व पॉली फिटींग्ज याची प्रात्यक्षिकासह माहीती देण्यात आली.ठिंबक सिंचन यंत्राचा वापर केल्याने ७०% पाण्याची बचत होते त्यामुळे तेवढ्या पाण्यात अधिक क्षेत्र लागवडीखाली आणता येते,तसेंच पीकही लवकर हाती येते.खत वापराची कार्यक्षमता ५०% पर्यत वाढते खताचा खर्च,अंतर मशागतीचा खर्च व मजुरीच्या खर्चातही बचत होते तसेच चढ उताराच्या जमीनीतही एकसारखा पाणी पुरवठा होतो याची महत्वपुर्ण माहीती मिळाली.ही सर्व माहीती घेवुन आम्ही पुढे कांदा लागवड सिंचन पध्दतीची माहीती घेण्यासाठी  गेलो. बेड पध्दतीने लागवड केलेले कांदे व पिकावर रोग व किडी प्रादुर्भाव न होण्यासाठी आसपास लागवड केलेली फुलझाडे याचेही ज्ञान अवगत झाले.प्रत्येक पीकात झेंडु सारखी फुलझाडे लावावीत हे आवर्जुन सांगण्यात आले. फुल झाडामुळे मधमाशी येते व परागीभवन चांगल्या प्रकारे  होते.रासायनिक औषधाच्या अति वापरामुळे निसर्गातील मधमाशीचे प्रमाण कमी होत चालले असुन मधमाशी संपली तर मानवी जीवनचं काय संपूर्ण जिवसृष्टी देखील नाहीशी होईल त्यामुळे रासायनिक औषधाचा वापर कमी करण्याचाही सल्ला मार्गदर्शकांनी दिला.दौरा यशस्वी होण्याकरिता जैन कंपनी चे जिल्हा व्यवस्थापक श्री सचिन डोंगरे तसेच श्री अजय डाकले व संतोष डाकले यांनी मार्गदर्शन केले.या सहलीत बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले ,विलास मेहेत्रे ,ज्ञानदेव वाबळे ,दत्ता कुऱ्हे विजय खंडागळे ,देविदास देसाई संतोष डाकले ,भरत साळूंके ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक अशोक कुऱ्हे अय्याज सय्यद ,जाकीर शेख ,विश़्वनाथ गवते ,कलेश सातभाई ,किरण नवले ,सुरेश कापसे ,डाँक्टर मिलींद बडधे ,नामदेव बोंबले ,अनिल पवार ,विपुल नवले ,सौरभ पवार, हरिष बडाख ,आदिसह अनेक सभासद सहलीत सहभागी झाले होते .पहाटे चार वाजता आम्ही सुखरुप बेलापुरात उतरलो पण येताना शेतीकरीता नविन ऊर्जा घेवुनच

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक बाल संस्कार केंद्राचे भुमीपुजन विविध मान्यवरांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले या वेळी सर्व मान्यवरांनी गावाच्या वैभवात भर टाकणारे हे संस्कार केंद्र असुन केंद्र उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे अवाहन केले               श्री स्वामी समर्थ केंद्रांची बेलापुरात सन १९९१ ला सुरुवात झाली सुरुवातीला हे केंद्र महादेव मंदीर येथे सुरु झाले या केंद्रास व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा यांनी जागा उपलब्ध करुन दिली सन २०१७ पासुन नविन जागेत श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात आले या ठिकाणी जागा उपलब्ध होती परंतु  या ठिकाणी चांगले संस्कार केंद्र उभे रहावे ही अनेक सेवेकऱ्यांची मनापासुन ईच्छा होती अखेर विविध मान्यवरांच्या हस्ते या केंद्राचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला त्या वेळी जि प सदस्य शरद नवले बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष  सुनिल मुथा ,प्रशांत लढ्ढा शांतीलाल हिरण आप्पासाहेब थोरात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सुवालाल लुक्कड रविंद्र खटोड सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे साहेबराव वाबळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी प्रताप सरोदे ,उंदिरगाव केंद्र भारत कोळसे, राधु पवार ,दिनेश वैद्य, बाबासाहेब शेटे, हिम्मतराव धुमाळ, प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, किरण भांड, ज्योतीताई भांड, भगीरथ मुंडलीक, कैलासा देसाई , दत्तात्रय कुऱ्हे  ,योगेश शिंदे ,जनार्धन शिंदे ,विलास कुऱ्हे  ,जालींदर गाढे ,अशोक राशिनकर ,विजर धुमाळ  आदिसह असंख्य सेवेकरी उपस्थित होते या वेळी महीला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कल्पना थोरात यांनी केले तर सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले शेवटी विठ्ठल गाडे मामा यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-दिपावली प्रमाणेच गुढी पाडवा व डाँक्टर  बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेला शंभर रुपयात  आनंदाचा शिधा देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे जनतेचा सण गोड होणार आहे                                       सर्व सामान्य नागरीकांची दिवाळी गोड व्हावी या करीता शासनाने शंभर रुपयात एक लिटर पामतेल एक किलो रवा एक किलो साखर एक किलो हरभरा दाळ देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता आता नविन मराठी वर्ष सुरु होत आहे पहीलाच सण  गुढी पाडवा आहे तसेच महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती आहे त्यामुळे नागरीकांना हे ही सण आनंदात साजरे करता यावेत या करीता राज्यातील एक कोटी ६३ लाख कुटुंबांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे  दिपावली सणाच्या कालावधीत अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा उशिराने पोहोचला होता परंतु आता शासनाने वेळेत हा शिधा पोहोच करण्याची खबरदारी घ्यावी अशीच सर्व सामान्य नागरीकांची मागणी आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )- आर्थिक नियोजना बाबत बेलापुर ग्रामपंचायतीने केव्हा ग्रामसभा घेतली? विरोधी सदस्यांना का बोलविले नाही ?त्या सभेचा अजेंडा दाखवा ? म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला यावर सरपंच-उपसरपंच यांनी आक्रमक होत प्रतिउत्तर दिले. गरमा-गरमीच्या वातावरणात जि प सदस्य शरद नवले यांनी मध्यस्थी करुन वादावर पडदा टाकल्यामुळे ग्रामसभा शांततेत पार पडली     बेलापुर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मराठी शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आली होती ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी मागील सभेचे प्रोसिडींग वाजण्यास सुरुवात केली त्या  वेळी ही सभा केव्हा घेतली आम्हाला निरोप का दिला नाही ?असा सवाल सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड यांनी केला त्यावर वाद सुरु झाला या वादात उपसरपंच अभिषेक खंडागळे  प्रफुल्ल डावरे मोहसीन सय्यद यांनी तुम्ही मागे काय केले ते पण सांगा अशी विचारणा करताच वातावरण चांगलेच तापले त्यामुळे पोलीस देखील तातडीने ग्रामसभेस उपस्थित झाले. जि प सदस्य शदर नवले यानी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करु असे सांगुन तो विषय थांबविला त्या नंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या १५% निधी मागासवर्गीयासाठी खर्च करणे हा नियम असताना तो  का केला नाही असा सवाल विजय शेलार यांनी केला.चंद्रकांत नाईक यांनीही दलीत वस्तींना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील मागसवर्गीय निधी वाटप झालेले नाही असा खुलासा केला.प्रफुल्ल डावरे यांनी अनेक ठिकाणी नविन बांधकाम झालेली असुन त्याचे रिव्हीजन करा वा नविन नियमानुसार आकारणी करा जेणेकरुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल अशी मागणी केली.हाजी इस्माईल शेख यांनी गावातील रस्त्यावरील अतिक्रमण गोविंद वाबळे व राकेश कुंभकर्ण यांनी फ्लेक्स बोर्डाबाबत नियम बनवावेत कलेश सातभाई, संजय रासकर यांनी सातभाई वसाहतीतील स्मशानभुमीचा लागलेला फेर कसा रद्द झाला अशी विचारणा केली. याबाबत सरपंच महेंद्र साळवी यांनी सदरचा फेर २०१० सालीच रद्द झालेला असून जागा ताब्यात घेण्या याबाबत कार्यवाही करू असे सांगितले.बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी पाणी पुरवठा योजनेची माहीती व आराखडा याची माहीती नागरीकांना द्यावी अशी मागणी केली या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनी बेलापुर ग्रामपंचायतीचे शतक महोत्सवी वर्ष असुन पाणी पुरवठा योजनेकरीता १२६ कोटी रुपये निधी मिळविणारी पहीली ग्रामपंचायत ठरली असुन या योजनेकरीता पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा खासदार सदाशिव लोखडे आमदार लहु कानडे तसेच दिपक पटारे, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे  या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. टाळ्याच्या गजरात त्यास मंजुरी देण्यात आली मा ,जि प शरद नवले यांनी १२६ कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा  योजनेची सविस्तर माहीती दिली  पाणी पुरवठा योजनेकरीता जमीन मिळावी या करीता उच्च न्यायालयात दावा दाखल करणारे विलास मेहेत्रे संजय शिरसाठ मुस्ताक शेख यांचा सत्कार करण्यात आला तसेच नविन पाणी पुरवठा योजनेतील टाक्यासाठी  जागा देणारे माधव कुऱ्हे प्रकाश मेहेत्रे नामदेव मेहेत्रे मनोज मेहेत्रे जनार्धन दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी तबस्सुम बागवान सौ शिला पोळ स्वाती आमोलीक प्रियंका कुऱ्हे जालींदर कुऱ्हे  प्रकाश नवले लहानु नागले भाऊसाहेब तेलोरे दत्ता कुऱ्हे  प्रकाश नवले प्रभाकर कुऱ्हे  विशाल आंबेकर अमोल गाढे अजिज शेख अय्याज सय्यद जाकीर शेख भाऊसाहेब कुताळ महेश कुऱ्हे सचिन वाघ सुरेश कुऱ्हे आदिसह ग्रामस्थ महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमीत शांत व संयमी असणारे सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा आक्रमक पवित्रा पहिल्यादाच विरोधकांनी अनुभवला.


श्रीरामपूर - येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका शिक्षण मंडळाचे लोकप्रिय प्रशासन अधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे हे उपस्थित होते.

आपल्या प्रमुख भाषणात प्रशासनाधिकारी पटारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव जपला. त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणात होते.महाराज ही त्यांची खूप काळजी घेत होते.त्यांच्या आजोबांनी मूल बाळ होण्यासाठी नवस केल्यामुळे झालेल्या मुलांची नावे शहाजी व शरीफजी ठेवली असे सांगून शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अत्यंत ओजस्वी स्वरात सादर केल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी भाषणे सादर केली.

प्रस्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मुस्लिम सरदार या विषयावर मार्गदर्शन केले. महाराजांच्या फौजेमध्ये 35% मुस्लिम सैन्य होते तसेच महाराजांनी कुरआन शरीफ सुद्धा अवगत केले होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशासन अधिकारी पटारे साहेब यांचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ मुर्तुजा व आभार प्रदर्शन एजाज चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीच्या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget