Latest Post

लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी 'वृत्तपत्र' हा चौथा स्तंभ मानला जातो.  अनेकदा काहिजण कोणत्याही घटनेसाठी पत्रकाराला जबाबदार धरतात. त्यांच्यावर दबाव आणतात किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. आजही श्री.विक्रम नाईक यांनी पञकारावर अप्रस्तुत टिका केली आहे.पञकारांवर आरोप केले आहेत.याचा प्रथमतः बेलापूर प्रेस क्लब निषेध करीत आसून श्री.नाईक यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी अशी मागणी करीत आहे.                     

आम्ही पत्रकार कुणाचे 'पगारी' नोकर नाही किंवा कोणाचे बाःधिल नाही. पञकाराने काय करावे हे शहाणपण कोणी शिकवायची गरज नाही.बेलापूर प्रेस क्लबचे  पत्रकार सदस्य समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून काम करत असतात.

बातमीची निवड हा पत्रकाराचा विशेष अधिकार आहे. कोणती बातमी प्रसिद्ध करावी आणि कोणती करू नये, हा सर्वस्वी त्या पत्रकारांचा आणि त्यांच्या संपादकांचा निर्णय असतो. बातमीचे महत्त्व, तिची सत्यता आणि समाजावर होणारा परिणाम तपासूनच बातमी लावली जाते. पत्रकारावर कोणत्याही बाह्य व्यक्तीने किंवा शक्तीने बातमीसाठी दबाव आणणे हे बेकायदेशीर आणि नैतिकतेच्या विरोधात आहे.

पत्रकार संरक्षण कायद्या सारखे पत्रकारांचे कायदेशीर कवच तरी काही अतिउत्साही व्यक्ती पत्रकारांना उद्देशून अपशब्द वापरतात किंवा टिकाटिपणी करतात.  महाराष्ट्र सरकारने 'पत्रकार संरक्षण कायदा' (२०१७) लागू केला असून त्यातील प्रमुख तरतुदीनुसार कलम ३ व ४: पत्रकारावर हिंसाचार करणे किंवा त्याच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा आहे. कलम ५ नुसार सदर गुन्हे हे 'दखलपात्र  आहेत.                            तुमच्या राजकारणात पञकारांना आणू नका.पञकारांना राजकारणाशी काहिही घेणेदेणे नाही.दुसरे व्यक्ती वा नागरिक म्हणून पञकार स्वतंञ आहे.त्याची व्यक्ती म्हणून राजकीय विचारधारा असणे हा त्याचा नागरी अधिकार आहे.तेव्हा नागरीक म्हणून पञकाराने कोणी कोणाची  बाजू घ्यवी वा कोणाचे समर्थन करावे हा व्यक्तीगत प्रश्न आहे.त्याबाबत आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.यापुढे अशाप्रकारची टिका प्रेस क्लबचे पञकार  सहन करणार नाहित,याची दखल घ्यावी.   याविषयी अनेक पत्रकार संघटनांनी  जाहीर निषेध करत वरिष्ठ अधिकारी यांना भेट घेणार असल्याची माहिती देखील दिली आहे कोणीही पत्रकारावर राजकीय ताबा आणू नये पत्रकारांना त्यांचे काम करून द्यावे या पद्धतीचे लवकरच निवेदन संबंधित प्रशासनाकडे माहिती मिळत आहे यावेळी            भास्कर खंडागळे(अध्यक्ष), सुहास शेलार(उपाध्यक्ष),रणजित श्रीरामपूर (सचिव),सुनिल मुथा(कोषाध्यक्ष ),विष्णुपंत डावरे(सहसचिव),सदस्यःअशोक गाडेकर,ज्ञानेश्वर गव्हले,देवीदास देसाई,नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिपक क्षञिय,दिलिप दायमा,गणेश साळुंके,शरद पुजारी,आतिष देसर्डा

सत्ता, पैसा आणि संपूर्ण यंत्रणा विरोधात असतानाही केवळ ११ मतांच्या फरकाने झालेला पराभव हा साधा निकाल राहिलेला नाही, तर तो संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. समोर दोन वेळा आमदार राहिलेले, साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे वजनदार नेते होते. त्यांनी सगळी ताकद पणाला लावली, तरीही विरोधकाला संपवू शकले नाहीत, हेच या निकालाचे मोठे वास्तव आहे.

“मी ११ मतांनी हरलो आहे, पण भीतीने नाही, झुकून नाही, विकून नाही,” अशा ठाम शब्दांत उमेदवाराने आपली भूमिका मांडली. हा निकाल एकच गोष्ट स्पष्ट करतो — जुन्या राजकारणाची मक्तेदारी आता हादरली आहे. लोकांचा आवाज दबवता येत नाही, उलट तो अधिक बुलंद होत चालला आहे.

पराभव जरी स्वीकारावा लागला असला, तरी गावागावात एकच चर्चा — ‘११ मतांची हळहळ’ सुरू आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या उमेदवाराने थेट कारखानदारी आणि प्रस्थापित सत्तेला टक्कर दिली. पराभव असूनही जनतेच्या नजरेत ते ‘हिरो’ ठरले आहेत. “आज हरलो असेन, पण उद्याच्या लढाईसाठी अधिक ठाम, अधिक आक्रमक आणि अधिक सज्ज आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या निकालानंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या न्याय्य हक्काचा प्रश्नही चर्चेत आला आहे. “हा न्याय कोण देणार?” असा सवाल उपस्थित होत असून, विखे साहेब न्याय देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, हा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या संघर्षाचा विजय मानला जात आहे. ही लढाई इथे थांबत नाही, तर खऱ्या अर्थाने आता सुरू झाली आहे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.


कोपरगाव : समता पतसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने काही विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबविली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल माहिती व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर सहकार मंत्रालयाकडून ही चौकशी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सत्याचाच विजय झाला असून समता पतसंस्थेला अडचणीत आणण्याचा डाव उधळला असल्याचे मत समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की, विरोधकांच्या पाठबळावर थकबाकीदारांनी संस्थेविरोधात चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप केला आहे. या अगोदर देखील याच थकबाकीदारांनी संस्थे विरोधात सहकार खात्याकडे अर्ज दाखल करून ही संस्थेला क्लीन चीट दिलेले आहे. त्या चौकशीत संस्थेविरोधात काहीही निष्पन्न झालेले नव्हते. तसेच याच थकबाकीदारांनी हायकोर्ट, जिल्हा कोर्टात देखील संस्थेविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. परंतु चुकीच्या याचिका दाखल केल्या असता हायकोर्टानेच त्या याचिका फेटाळून त्या थकबाकीदारांना ५० हजारापर्यंत दंड ठोठावलेला आहे.समता पतसंस्थेच्या वतीने ॲड.विजय गवांदे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, समता पतसंस्थेची वसुली कठोर व कायदेशीर करण्यात येत असते. सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांची वसुली देखील कायदेशीर करण्यात आली आहे. सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची किंमत ठरवून त्यांच्या समक्ष विक्री करण्यात आली होती. ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीने त्यांच्या जप्त केलेली मालमत्ता विकण्यात आली नसून थकबाकीदारांची कोणतीही फसवणूक झाली नाही. याउलट काका कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी कोपरगाव सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक रिंगणात असल्यामुळे त्यांची बदनामी विरोधकांनी त्या थकबाकीदारांना एकत्र आणून चालू केली आहे. विरोधकांकडून सहकार आयुक्त कार्यालयावर दबाव आणून ही चौकशी लावण्यात आली आणि संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु विरोधकांनी काका कोयटे यांना विरोध करण्यासाठी थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेची चौकशी लावली असून त्या थकबाकीदारांची देखील चौकशी करण्यात यावी.तसेच समता पतसंस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून सहकार खात्याने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे सभासद व ग्राहकांच्या विश्वासावर पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने कार्यरत असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात कोणतीही अनियमितता नसल्याचे यापूर्वीही प्रत्येक वर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये अ दर्जा मिळून स्पष्ट झाले आहे. मात्र, कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये संस्थेचे चेअरमन काका कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत असल्यामुळे विरोधकांचा थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेचा अपप्रचार व अफवा, सोशल मीडियावर बदनामी करण्याचा डाव चालु असल्याची माहिती संस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल यांनी दिली.याबाबत जेष्ठ संचालक जितूभाई शहा म्हणाले की, विरोधकांनी संजय चंद्रकांत मोरे, वसंत मधुकर घोडके, ओमप्रकाश बाबूआप्पा खके या थकबाकीदारांना एकत्र करून सहकार मंत्रालयात चौकशीची याचिका दाखल केली होती. सहकार मंत्रालयात थकबाकीदारांनी केलेल्या चौकशी अर्जाची प्रत संस्थेला ८ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेला प्राप्त झाली. त्याच दिवशी समता पतसंस्थेचे म्हणणे ऐकून न घेता विरोधकांच्या दडपणाखाली हा आदेश सहकार मंत्रालयाने दिला.त्यानंतर संस्थेच्या वतीने १० डिसेंबर २०२५ रोजी थकबाकीदारांच्या विरोधात सहकार मंत्रालयात याचिका दाखल केली. प्रसंगी ज्यांनी सहकार मंत्रालयाकडे चौकशीची याचिका दाखल केली होती ते थकबाकीदार संजय चंद्रकांत मोरे, वसंत मधुकर घोडके, ओमप्रकाश बाबूआप्पा खके सुनावणी दरम्यान सहकार मंत्रालयात उपस्थित होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समक्ष सहकार मंत्रालयात झालेल्या सुनावणीत समता पतसंस्थेची चौकशी थांबविली आहे.निवडणूक काळात थकबाकीदारांच्या तक्रारीवरून सहकार खात्याकडून लावण्यात आलेल्या चौकशीमागे तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने सदर चौकशी थांबविण्यात आली आहे.आम्ही देखील थकीत कर्जदारांनी संस्थेची केलेल्या बदनामी विरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले. या निर्णयामुळे समता पतसंस्थेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त झाल्याची भावना सभासद व ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे.समता पतसंस्थेने भविष्यातही कायदेशीर चौकटीत राहूनच कार्य सुरू ठेवणार असून कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा अफवांना बळी न पडता सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी व्यक्त केला आहे.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - वृत्तपत्र क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारारा ज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'दर्पण पुरस्कार' येथील दैनिक स्नेहप्रकाशचे मुख्य संपादक प्रकाश बापूराव कुलथे यांना जाहीर झाला आहे. ६ जानेवारी पत्रकार दिनी सदरचा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असलेल्या कोकणातील पोंभुर्ले,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग येथे स्मारक म्हणूनउभारलेल्या दर्पण सभागृहात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या पत्रकारांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.राज्यातील अनेक नामवंत संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

श्री.प्रकाश कुलथे हे गेली ३५ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत.स्नेहप्रकाश प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित करून लेखकांना प्रोत्साहित केले आहे.


श्री.प्रकाश बापुराव कुलथे यांनी आपल्या यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक वृत्तपत्रे क्षेत्रात अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते

 दैनिक स्नेहप्रकाश चे मुख्य संपादक असून साप्ताहिक वर्ल्ड सामना चे संस्थापक संपादक, वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य अधीस्विकृती समिती, महाराष्ट्र शासन सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी चे विश्वस्त,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक चे उपाध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषद,मुंबई चे कार्याध्यक्ष,

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा श्रीरामपूर चे कार्याध्यक्ष, श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचिव, हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैय्या हायस्कुल, श्रीरामपूर चे सदस्य म्हणून काम पाहत असून नुकतीच त्यांची इंडियन लँग्वेजेस न्युज पेपर असोसिएशन (इलना) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार हा वृत्तपत्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देखील त्यांना आता जाहीर झाला आहे.श्रीरामपूर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने हा संपूर्ण श्रीरामपूरकरांचा सन्मान आहे असे मानले जात आहे.श्री कुलथे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील तील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक उपक्रमांमुळे तालुक्यात विशेष लोकप्रियता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश सोहळा केवळ मोठ्या उत्साहातच नाही, तर भविष्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत देणारा ठरला.


 श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना   हा पक्ष प्रवेश करण्यात आला  डॉ. महेश शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यात रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीतील  राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरचा विकास, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना नेतृत्व मिळावे आणि सामाजिक कार्याला दिशा मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपच्या माध्यमातून श्रीरामपूरचा विकास अधिक वेगाने होईल.”


दरम्यान डॉ. शिरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “ही केवळ राजकीय पायरी नाही तर समाजसेवेच्या कार्याला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच मी प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात विविध चर्चांना चांगलीच उधाण आले आहे. आगामी निवडणुका, नगरपालिकेतील सत्ताकारण आणि विविध गट-तटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचे पक्षप्रवेश हे प्रस्थापित राजकीय घटकांसाठी धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच शहरात चर्चा वाढली असून, “श्रीरामपूर आता नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय वातावरणात बदलाचे संकेत देणाऱ्या या घटनाक्रमामुळे श्रीरामपूरचे राजकारण अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित!

श्रीरामपूर प्रतिनिधी - अहिल्या नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांचे विश्वासू सहकारी ॲङ समिन बागवान यांनी काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला.


गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षात् सक्रिय, एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत होते.

2019 व 2024 च्या विधानसभा निवड नुकित सक्रिय सहभागी,जाहीर सभामधून उत्कृष्ट मुद्देसूद मांडनी करुन काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यातत्यांचा सिंहाचा वाटा होता.

 नगरपालिका निवडणुकीत पक्षश्रेष्टी कडून दखल न घेता अन्याय झाल्याने नाराज नाराज होते.पालकमंत्री विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे यांनी भारतीय जनता पक्षाची दीन दलित,मुस्लिम-अल्पसंख्याक,शेतकरी यांच्या बाबतीत असणारी सर्व समावेशक भूमिका पसंत पड़ल्याने व भविष्यात अल्पसंख्याक समाजाचा असणारा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक उत्तम समन्वयकाची भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी तसेच आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा कायदेशीर, सामाजिक,राजकीय व वैद्यकीय सेवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळवुन देण्याचा मानस ठेऊन जाहीर प्रवेश केला. 

या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री पालक मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ॲडवोकेट बागवान यांच्या प्रवेशाबद्द्ल आंनद व्यक्त करुन निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, दिपक पटारे, इंद्रनाथ पाटील थोरात,संजय फंड, श्रीनिवास बिहानी,रवि पाटील,केतन खोरे,आशिष धनवटे,नारायण डावखर, मुख़्तार शाह,नजीर मुलानी,महेबुब कुरैशी,हाजी इस्माइल,मोहसिन शेख,मेहबूब प्यारे,मुदस्सर शेख,तौफीक शेख,शरद नवले,अभिषेक खंडागळे,नाना शिंदे,नीतिन भागडे,दिपक चव्हाण,विराज भोसले,बंडु शिंदे,राहुल आठवाल आदि उपस्थित होते. या प्रसंगी समिन बागवान यांचे समवेत अनेक सहकाऱ्यानी जाहीर प्रवेश केला.

सदर प्रवेश हा कॉंग्रेस पक्षासाठी धक्का समजला जात असून बागवान हे एक उत्कृष्ट वक्ते असून उत्तम संघटन कौशल्य व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पक्षा सोबत जोड़ला जाईल यात शंका नाही असे या प्रसंगी अनेक उपस्थितांनी बोलून दाखवले.

एडवोकेट बागवान यांच्या प्रवेशाने वार्ड नंबर दोन तसेच संजय नगर भागातील गणिते बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.

सिन्नर (जि. नाशिक) येथील पोलिस ठाण्यात जी.डी. क्रमांक 041 नुसार बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप दामोदर रूपते (वय 40 वर्षे) हे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारास 8 वाजता आपल्या घरीून – उद्योग भवन, सिन्नर, जि. नाशिक येथून कोणास काहीही न सांगता बाहेर पडले असून ते परत घरी आले नाहीत. प्रदीप रूपते यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : उंची : 5 फूट 6 इंच रंग : सावळा चेहरा : उभट केस : काळे, छोटे वेषभूषा : राखाडी रंगाची नाईट पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट याबाबत मनोज दामोदर रूपते (वय 45 वर्षे, व्यवसाय – व्यापारी) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद (रजी. क्र. 147/2025) करून दिली आहे. सदर व्यक्तीचा शोध सुरू असून, कोणाला प्रदीप रूपते यांची माहिती मिळाल्यास सिन्नर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असा सिन्नर पोलिस ठाण्याचा आवाहन आहे. 📞 संपर्क : 9860158354 तपास अधिकारी : पो. हवालदार हरीश रामेश आव्हाड स्रोत : सिन्नर पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget