खो-खो विश्वचषक २०२५!!!बांगलादेशचा धुव्वा उडवत भारत उपांत्य फेरीत दाखल,युगांडा दक्षिण आफ्रिका व नेपाळ यांचा देखील उपांत्य फेरीत प्रवेश...
गौरव डेंगळे/नवी दिल्ली/१७/१/२०२५ भारतीय महिला खो खो संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवला.यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.भारताचं वर्ल्डकप जेतेपद फक्त दोन विजय दूर आहे. भारताने चौथ्या सामन्यात १०० गुणांचा आकडा पार केला आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जबरदस्त खेळी केली. भारतीय कर्णधार प्रियांका इंगळे हीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अटॅक करण्याचा निर्णय केला.पहिल्या डावात भारताने एकही ड्रीम रन दिला नाही.त्यामुळे पहिल्या डावात भारताने ५०-० अशी आघाडी मिळवली होती.ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान बांगलादेशपुढे होतं.पण बांगलादेशने हा फरक कमी करण्याऐवजी ६ ड्रिम पॉईंट्स दिले.तर अटॅक करताना फक्त ८ गुण मिळवले.म्हणजेच दुसऱ्या डावात बांगलादेशकडे फक्त २ गुण होते.तर भारताकडे ४८ गुणांची आघाडी होती.तिसऱ्या डावात अटॅक करताना भारताने आक्रमक अटॅक केला.एका पाठोपाठ एक बॅच तंबूत पाठवत होते.त्यामुळे भारताच्या पारड्यात एका पाठोपाठ एक गुण मिळत होते. तिसऱ्या डावात भारताकडे १०६ गुण होते. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. कारण ९८ धावांची आघाडी भारताकडे होती. त्यामुळे चौथ्या डावात अटॅक करून ९८ धावांचा फरक कमी करणं कठीण होतं.त्यात भारताने चौथ्या डावातही ड्रीम रनही मिळवला.भारताने हा सामना १०९-१६ गुणांनी जिंकला.
उपांत्यपूर्व फेरीचे निकाल:
पहिला उपांत्यपूर्व सामना: युगांडाचा न्यूझीलंडवर ७१-२६ ने विजय.
दुसरा उपांत्यपूर्व सामना: दक्षिण आफ्रिकेचा केनियावर ५१-४६ ने विजय.
तिसरा उपांत्यपूर्व सामना: नेपाळचा इराणवर १०३-०८ ने विजय.
चौथा उपांत्यपूर्व सामना: भारताचा बांगलादेशवर १०९-१६ ने विजय.