Latest Post

👉 राज्यभरातून ७० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग!

कोपरगाव(गौरव डेंगळे)२३/७:सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दिनांक २३ जुलै २०२४ रोजी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपूण वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील ३५ शाळेतील ७० उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ उज्वला भोर प्राचार्या एस.एस.जी.एम.कॉलेज कोपरगाव होत्या.तर बक्षीस वितरण समारंभासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गोदावरी बायोरिफाइनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी शाळेचे प्राचार्य के.एल.वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नथलीन फर्नांडिस यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक योगेश शिंदे,विमल राठी,वृषाली कुलकर्णी हे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल शालेय व्यवस्थापन,माननीय प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

संत विवेकानंद इंग्लिश स्कूल, अहिल्यानगर ₹ ३,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, अकोले 

₹ २,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

प्रवरा कन्या विद्या मंदिर, लोणी  ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 सेंट जॉन् इंग्लिश मिडियम स्कूल,राहता

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण(स्पेशल सेमी)

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सहावे पारितोषिक*

आत्मा मालिक मिलेट्री स्कूल गुरुकुल, कोकमठाण.

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक*

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल कोऱ्हाळे 

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - राज्यभरातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभरात सुरू असून त्यासाठीचे फॉर्म भरून घेण्याचे काम सर्वत्र सुरू आहे.

श्रीरामपूर शहरात देखील नगरपालिकेने यासाठी जोरदार तयारी केली असून मेन रोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयातील आगाशे सभागृह येथे तसेच शहरातील सर्व नगरपालिका शाळा, संजय नगर भागातील मुळे शाळा व मिनी स्टेडियम मधील नगरपालिकेच्या उपकेंद्रात देखील या योजनेचे फॉर्म विनामूल्य भरून घेतले जात आहेत.

आगाशे सभागृहामध्ये नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील व पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी, वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रीमती स्वाती पुरे यांच्या देखरेखीखाली त्यांची संपूर्ण टीम सदर योजनेचे फॉर्म भरणे कामी अग्रेसर आहे.यामध्ये स्वतः स्वाती पुरे,सिद्धार्थ गवारे,स्वप्निल माळवे,विजय झिंगारे, राजेश जेधे,दिशा बोरकर,साक्षी अहिरे,पूजा क्षत्रिय, राजेंद्र बोरकर हे सर्व काम करीत आहेत. महिला वर्गाचे फॉर्म भरून घेऊन जागेवरच अपलोड केले जात आहेत. त्यासाठी आगाशे सभागृहामध्ये वायफाय व राऊटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आत्तापर्यंत या केंद्रावर 750 पेक्षा जास्त फॉर्म भरून झाले आहेत.शहरातील इतर केंद्रातील सर्व फॉर्म येथे जमा केले जात आहेत तसेच नगरपालिकेचे बालवाडी विभागातील कर्मचारी देखील घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत.खाजगी किंवा इतर ठिकाणी संगणकावर भरले जाणारे फॉर्म ची हार्ड कॉपी येथे जमा केली जात आहे. येणाऱ्या महिला भगिनींना अत्यंत चांगली सेवा येथे मिळत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

शहरामध्ये काही ठिकाणी पैसे घेऊन फॉर्म भरले जात आहेत त्यातही ओटीपी येत नसल्याने अनेकांना दोन दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. त्यापेक्षा नगरपालिकेच्या आगाशे सभागृहातील केंद्रावर मोठी टीम कार्यरत असून येथे मोफत फॉर्म भरले जात आहेत तसेच वायफाय सुविधा उपलब्ध असल्याने ओटीपी वगैरे सुद्धा पटकन येत आहेत.तरी शहरातील मुख्यमंत्र्यांच्या लाडके बहिणींनी या ठिकाणी येऊन आपले फॉर्म भरावेत तसेच समवेत अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आणावीत. जागेवर ती अपलोड केली जातात.या केंद्रावरील कर्मचारी स्वतः फॉर्म भरून घेत आहेत.तरी अद्याप भगिनींनी फॉर्म भरले नसतील त्यांनी ते त्वरित भरावेत. फॉर्म भरण्यासाठी येताना स्वतःचा मोबाईल सोबत आणावा असे आवाहन ग्रंथपाल स्वाती पुरे यांनी केले आहे.

बेलापूर :(प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील ग्रामस्थांनी गावठी दारु विक्रीस बंदी घातल्यानंतर दारुचे व्यसन लागलेले दारु पिण्यासाठी शेजारच्या गावात जात असुन दारु पिऊन येत असताना दोन दुचाकीची धडक होवुन एक जण गंभीर जखमी झाला आहे.       ही घटना काल रात्री घडली दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले कोल्हार-बेलापूर 

ररत्यावरील शिंदे वस्तीजवळ ही घटना घडली. 

    या अपघातातील पाच जणांना पुढील उपचारासाठी 108 मधून लोणी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी एकास शिर्डी येथे अतिदक्षता विभागात तसेच एकाला नगर येथे हलविण्यात आले.एकाच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर असल्याने संगमनेर येथे हलविण्यात आले.त्यांनतर पुढील उपचार घेतल्यांनतर त्यास घरी सोडून देण्यात आले.विशेष म्हणजे शुक्रवारी रात्री नऊ 

वाजेच्या सुमारास गावातील तीन जण एकाच 

दुचाकीवर गळनिब येथून दारु पिऊन घरी चालले 

होते.त्याबरोबर गावातीलच दोन जण गळनिबकडे दारु पिण्यासाठी चालले असता यांच्या दोन दुचाकीच्या समोरासमोर धडक झाली या अपघातात पाच गंभीर जखमी झाले.या अपघातातील दोन जण लोणी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते.दोन दुचाकीची धडक झाल्यानंतर  मोठा आवाज झाला त्या आवाजाने वस्तीवरील नागरीकांनी रस्त्याकडे धाव घेतली.रात्रीची वेळ असल्यामुळे 108 रुग्णवाहिकेला भ्रमणध्वनीवरुन माहिती देण्यात आली.काही वेळातच रुग्णवाहिका आल्यानंतर जखमीना त्वरित लोणी येथे पाठविण्यात आले.अपघातग्रस्त दुचाकी शिंदेवस्ती येथे लावण्यात आल्या असून पाच जणांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे.मात्र काही तरुण दुसऱ्या गावात दारू पिण्यासाठी जातात अन असे अपघात घडतात.यामुळे उक्कलगावाप्रमाणेच आसपासच्या गावातही दारुबंदी  व्हावी,अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश गवले (उपाध्यक्षपदी लांडगे व बनकर; सचिव लोखंडे, सहसचिव देसाई)श्रीरामपूर (प्रतिनिधी) राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश गवले , उपाध्यक्षपदी चंद्रकांत लांडगे व साईनाथ बनकर,सचिवपदी दिलीप लोखंडे, सहसचिवपदी देविदास देसाई आणि खजिनदारपदी अमोल कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, अशी माहिती परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.


परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेच्या श्रीरामपूर तालुका कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.


नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणुन सर्वश्री भाऊसाहेब काळे, बी. आर. चेडे, बापु नवले, भरत थोरात, दिपक क्षत्रिय, मयुर गव्हाणे आणि सचिन उघडे यांचा समावेश आहे. सल्लागारपदी सर्वश्री अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे,रविंद्र भागवत, महेश माळवे, विकास अंत्रे, शिवाजी पवार, बाळासाहेब आगे,

करण नवले, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 या निवडीप्रसंगी तालुक्यातील सर्वश्री अशोक अभंग,लालमहंमद जहागीरदार, महेश रक्ताटे,अमोल बोर्डे, दिलीप तांबे, विकास बोर्डे, प्रविण दरंदले,व्ही.डी.देवळालकर, दिलीप दायमा, अतिश देसर्डा, र्विश्वनाथ जाधव,आदी उपस्थित होते.


नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार  हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे, सह निमंत्रक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-व्हाँट्सअप गृपच्या माध्यमातून रुग्णाच्या उपचाराकरीता जमा केलेला निधी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते वाघ कुटुंबीयांना देण्यात आला      नेवासा तालुक्यातील दगडू मुरलीधर वाघ हे आजारी पडले आगोदरच मोलमजुरी करुन गुजराण करणाऱ्या वाघ कुटुंबीयावर जणू आभाळच कोसळले त्यांचा मुलगा प्रशांत याने वडीलास प्रवरानगर येथील दवाखान्यात दाखल केले त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले परंतु सततच्या आजारपणामुळे वाघ कुटुंबीय पुर्णतः हवालदिल झाले होते घरातील कर्त्या माणसाचा दवाखान्याचा खर्च कसा भागवावा हीच चिंता वाघ कुटुंबीयांना पडली होती ही बाब बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार  देविदास देसाई  यांना समजली त्यांनी तातडीने प्रशांत मुरलीधर वाघ याचा फोन पे नंबर देवुन एक हात मदतीचा म्हणून आपण यथा योग्य गरीब कुटुंबाला मदत करावी असे अवाहन केले त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी सढळ हाताने मदत केली दुर्दैवाने दगडू वाघ यांचे उपचार सुरु असतानाच निधन झाले त्यांचे निधन झाल्याचे समजल्यावरही अनेकांनी त्या कुटुंबाला एक हात मदतीचा देण्याच्या उद्देशाने मदतनिधी पाठविला हा निधी कै .दगडू वाघ यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते देविदास देसाई यांनी जमा झालेला निधी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते कै दगडू वाघ यांच्या पत्नी मिनाताई वाघ यांच्याकडे सूपुर्त केला राबविलेला स्तूत्य उपक्रम पाहुन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील आपली वैयक्तिक मदत दिली तसेच असे सामाजिक उपक्रम सर्वत्र राबविण्याची गरज आहे आपल्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्याचा जिवा वाचु शकतो एखाद्या कुटुंबाला आधार मिळु शकतो असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-आपल्या विविध मागण्या संदर्भात महसुल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले असुन या आंदोलनामुळे महसुलचे कामकाज ठप्प झाले आहे त्याचा त्रास सर्व सामान्याना होत आहे .                                   महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसुल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समीतीच्या अहवालातील शिफारशीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात लागु न करता करावा .अव्वल कारकुन ,मंडलअधिकारी संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देवुन आदेश निर्गमीत करावेत महसुल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजुर करुन पुरवठा  विभागाच्या पद भरतीमुळे रिक्त होणारे महसुल कर्मचारी यांना महसुल सेवेत सामावुन घ्यावे वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा ,महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसुचना दिनांक ३/२/२०२३ नुसार तात्काळ अव्वल कारकुन यांचे वेतन निश्चित करण्यात यावे ,महसुल सहाय्यकाचा ग्रेडपे १९०० वरुन२४०० करण्यात यावा महसुल सहाय्यकाची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसुल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यवी आदिसह अनेक मागण्या करीता हे आंदोलन सुरु करण्यात आले होते पहील्या दिवशी काळ्या फिती लावुन कामकाज करण्यात आले त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत निदर्शने नंतर लेखणी बंद आंदोलन व आता काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जिवन आहेर सरचिटणीस किशोर हटकर कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवारे संघटक चंदु प्रधान समन्वयक राजु धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरु केलेले आहे.या आंदोलनात ऐ एस ऐडके एन ई मंडलीक ऐ आर पुंड एस एस गायकवाड एस आर खाडे एस डी आल्हाट राजु निकाळे आर डी शेले ऐ डी रणनवरे एस एस देसाई डी एस आमले ऐ एस राजवाळ एम जी नाईक मिलींद नवगीरे एस वाय चंदन एम एस खरपुडे आदिसह महसुल कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कोपरगाव (गौरव डेंगळे):श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज भक्त मंडळाच्या वतीने प्रभात फेरी आयोजन आषाढी एकादशी निमित्त गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी प्रभात फेरी उत्साहात संपन्न झाली.सकाळी ६:०० वा धारणगाव रोड शुभमनगर येथून ते आनंदनगरच्या महादेव मंदिरापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. महादेव मंदिरामध्ये महाआरतीचा आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीमध्ये एकच गजर होता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा.प्रभात फेरीमध्ये २५ ते ३० माता बहिणींसह 

बालगोपाळही सहभागी झाले होते.मागील दोन वर्षापासून एकादशीच्या दिवशी प्रभात फेरीच्या आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान प्रभात फेरीच्या सांगतेवेळी प्रभात फेरीच्या आयोजिका भागवताचार्य ह भ प रेखाताई गायकवाड यांनी सांगितले आज दुग्ध शर्करा योग आहे.श्रीक्षेत्र मुळेगाव थडी पासून श्री संत जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थळापर्यंत पायी दिंडी सोहळा परमपूज्य स्वामी कैलास आनंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने होत असतो ही दिंडी गोंदवले कर्मा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रांगणात भेट देऊन महाप्रसाद घेऊन दिंडी समाधी स्थळाकडे स्थानपन्न झाली याला दुग्ध शर्करा योग म्हणतात असे त्यांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget