Latest Post

श्रीरामपूर - नागरिकांच्या सेवेसाठी नेमण्यात आलेले, शासकीय अधिकारी आपल्या कर्तव्या बजावीत नसल्याने. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास,सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. ज्यात श्रीरामपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या. निष्क्रिय तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष, व सतत दालन बंद करून गायब असल्याने. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून. शासनाकडून मिळणाऱ्या मोफत आरोग्य साधने,सर्रासपणे खाजगी मेडीकल मध्ये विकली जात असल्याचेही निदर्शनास आल्याने. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची अवस्थाच बिकट झाल्याने. कर्तव्यात कसून करणाऱ्या, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून. त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा,अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने. गटविकास अधिकारी यांना निवेदना द्वारे दिला आहे. सदरचे निवेदन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,जिल्हा सरचिटणीस शरद बोंबले, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण देवकर, शहराध्यक्ष दौलत गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष गोरख शेजुळ, तालुका उपाध्यक्ष प्रशांत पटारे आदींनी दिले आहे.

श्रीरामपूर -विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सह, त्यांच्या शारिरीक क्षमतेत वाढ होण्या करिता. विविध मैदानी क्रिडा तसेच खेळांचे प्रशिक्षण दिले जातात. ज्यात मुला मुलींच्या आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने, त्यांना मार्शल आर्ट,तायकांदो या सारखे प्रशिक्षण देखील दिले जात आहेत. या सर्वांच्या चालता श्रीरामपूर शहरातील शेकडो मुल- मुली, मास्टर कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्लोबल मार्शल आर्टच्या माध्यमातून. मागील ३ महिन्यांपासून मोफत तायक्वांदो कराटे प्रशिक्षण दिले जात आहे. सदरचे प्रशिक्षण घेणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांची, शहरातील काँग्रेस भवन वार्ड नंबर ६ या ठिकाणी. नुकतीच कलर बेल्ट एक्झाम संपन्न झाली. यावेळी परिक्षणार्थी मुला मुलींनी आत्मसाद केलेल्या मार्शल आर्ट, तायकांदोचे प्रत्येक्षिके सादर करून. उपस्थित मान्यवरांसह पालकांचे मन मोहून घेतले. यावेळी प्रशिक्षक जुबेर बिनसाद,पूजा गतिर,अबू बकर बिनसाद,अशोक शिंदे,शुभम पवार,शोएब पटेल गौरव काळे, आदींच्या निरीक्षणाखाली कलर बेल्ट एक्झाम संपन्न झाल्या. तसेच सेल्फ डिफेन्स आज काळाची गरज असून, ते आपल्याला करता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून,जास्तीत जात मैदानी खेळ खेळावेत,जेणे करून आपले शरीर निरोगी, धष्टपुष्ट राहून. बुद्धीचा देखील चांगला विकास होईल.तसेच भालाफेक,कबड्डी, खो-खो, क्रिकेट,अथलेटिक, तायक्वांदो,आर्चरी, रनिंग,अशा खेळांच्या मधून. अनेक पदके मिळवून,आपल्या पालकांचे नाव श्रीरामपूर शहरचे, जिल्ह्याचे नाव राज्य नाही तर देश पातळीवर चमकव्यात. अशा शुभेच्छा ग्लोबल मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष, मास्टर कलीम बिनसाद यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या.

बेलापूर ( वार्ताहर) पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असुन पत्रकार शशीकांत वारीसे यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी बेलापुर व परिसरातील पत्रकारांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ..               पत्रकारवरील हल्ल्याबाबत  पोलिसांनी तसेच शासनाने दखल घेवुन आरोपींना अटक करुन कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .रत्नागिरी येथील पत्रकार शशीकांत वारीसे यांनी वृत्तपत्रात बातमी छापली म्हणून त्यांना गाडीची धडक देवुन ठार मारण्यात आले अशा गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे . पत्रकारांना

संरक्षण  देण्याबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आवश्यक ते पावले उचलावीत असेही निवेदनात म्हटले आहे.

.बेलापूर येथे औटपोस्टचे हेड कॉ अतुल लोटके पोलिस हेड कॉ रामेश्वर ढोकणे भारत तमनर नंदु लोखंडे  यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनावर भास्कर खंडागळे अशोक गाडेकर  देवीदास देसाई ज्ञानेश्वर गवले नवनाथ कुताळ शरद थोरात  भरत थोरात दिलीप  दायमा किशोर कदम दिपक क्षत्रिय सुहास शेलार  आदीसह पत्रकारांच्या  सह्या आहे. 


 

राज्यात व देशांमध्ये मिलेनियम नॅशनल स्कूलच्या मुलींचे पुन्हा एकदा वर्चस्व.

हिगोली (१२/२/२३):दि १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी हिंगोली येथे महाराष्ट्र क्रीडा संचालनालय,पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल १७ वर्षा खालील मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मुलीच्या गटात पुणे विभागाचे नेतृत्व करत मिलेनियम नॅशनल स्कूल,पुणे संघाने अंतिम सामन्यात नागपूर विभागाचा  पराभव करून विजेतेपद पटकावले. कर्णधार ओजस्वी बचुटे हिच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुणे विभाग संघाने साखळी सामन्यात कोल्हापूर विभाग व लातूर विभागाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यामध्ये मिलेनियम संघाकडून श्रीया गोठस्कर,नंदिनी भागवत,ओजस्वी बचुटे,निधी पाटील,अनन्या गोसावी,श्रावणी काळे,रिद्धी देसाई यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावरती संघास विजेतेपद मिळवून दिले. विजयी संघाचे मिलेनियम नॅशनल स्कूलचे डायरेक्टर मा.अन्वित फाठक यांनी अभिनंदन केले.विजयी खेळाडूंना राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे,सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री हरिहर केशव गोविंद भगवान श्री क्षेत्र उक्कलगाव हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी या कालावधीत उक्कलगाव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन या सप्ताहाची सांगता ह भ प जगन्नथ महाराज पाटील भिवंडी यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे            उक्कलगावचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवान देवस्थानच्या प्रांगणात महंत रामगिरीजी महाराज व  महंत उध्दवगीरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वअखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असुन त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दररोज पहाटे ५ ते ६.३० वाजेपर्यंत काकडा भजन , सकाळी ६.३० ते ७ आरती , सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यत प्रसादभोजन सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत हरिपाठ रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत हरिकिर्तन अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वरी  ग्रंथ मिरवणूक सायंकाळी ७ ते ९ ह भ प अरुणगीरीजी महाराज भामाठाण यांचे किर्तन व गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत वाणीभुषण ह भ प जगन्नाथ महाराज पाटील  भिवंडी यांच्या  काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असुन त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सायंकाळी ७ ते ९ हरी किर्तन नंतर महाप्रसाद असा उपक्रम सप्ताहभर सुरु आहे  ह भ प बाबा महाराज मोरे ह भ प नामदेव महाराज मोरे ह भ प रविंद्र महाराज मुठे ,ह भ प उल्हास महाराज तांबे ह भ प बाबासाहेब  महाराज ससाणे हे व्यासपीठ चालक म्हणून काम पहात आहेत तरी भावीकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-माझी लहान लहान वीस बालके असुन त्यांना दोन घास भरविण्यासाठी माझ्या झोळीत काहीतरी दान टाका आपल्या दानने त्या चिमुकल्यांचा एक दिवस तरी भागेल अशी आर्त हाक श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे ह भ प कृष्णानंद महाराज यांनी दिली               निमित्त होते संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाचे            बेलापुर सुवर्णकार समाजाच्या वतीने बेलापुरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी म जि प सदस्य  शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड भरत साळूंके विलास मेहेत्रे  प्रशांत लढ्ढा एकनाथ उर्फ लहानु नागले दत्ता कुऱ्हे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम उपस्थित होते संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त श्री हरिहर केशव गोविंद मदिरात ह भ प कृष्णानंद महाराजाचे प्रवचन ठेवण्यात आले होते त्या वेळी उपस्थितीतांना संबोधीत करताना कृष्णानंद महाराज म्हणाले की महाराष्ट्र ही साधु संताची भुमी आहे समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम संतानी केलेले आहे संत हे कुणा एका समाजाचे नाहीत त्यांनी संपुर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आपले जिवन समर्पित केलेले आहे मी स्वतं अनाथ आहे ते दुःख काय असते हे मला ठाऊक आहे त्यामुळे वयाच्या अठराव्या वर्षी मी अनाथ मुलांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे आज श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात अठरा अनाथ बालके  आहेत त्यांचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मी किर्तन प्रवचन करत आहे सर्वांचे चहा पाणी नाष्टा जेवण त्याच बरोबर शिक्षण  हा सर्व खर्च भागविणे अवघड काम आहे त्यामुळे आपण शक्य होईल तेवढी मदत या लहानग्यांना करावी आसे अवाहनही कृष्णानंद महाराजांनी शेवटी केले सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष अनिल मुंडलीक यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२३-२४ या वर्षीचा १४ कोटी २० लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला असुन या अर्थसंकल्पात अनेक विकास कामे हाती घेण्यात आलेली आहे प्रशासकांच्या कार्यकाळात  बाजार समीतीचा नफा तसेच ठेवीत देखील  मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे                           श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीने सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला असुन प्रशासकाच्या कार्याकाळात बाजार समीतीच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे माहे डिसेंबर २०२१ अखेर समीतीला ५लाख ८३ हजार रुपये नफा होता तर माहे डीसेंबर २०२२ अखेर ४५ लाख रुपये नफा झालेला आहे तर माहे आँक्टोंबर पर्यत मुदत ठेवी ४५ लाख होत्या .जानेवारी २०२३ अखेर या ठेवी १ कोटी २० लाख इतक्या झालेल्या आहेत प्रशासकांनी पुढील काळात अनेक विकास कामे हाती घेतलेली असुन सी एन जी पंप उभारणी जनावरांचा बाजार पूर्ववत चालु करणे ,मोकळा कांदा खरेदीसाठी जमीन खरेदी करणे ,बेलापुर उपबाजार आवारात २८ दुकानगाळे व १४ गोडावुन असे २ कोटी ५० लाख रुपयाचे काम प्रागती पथावर आहे महाराष्ट्र शासनाकडून शेती महामंडळाच्या उर्वरीत ५० एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव प्रशासाकांनी तयार केलेला आहे  तसेच श्रीरामपुर बाजार समीतीतील मेन गेट ते कांदा मार्केट रोड काँक्रिटीकरणासाठी रुपये १२ लाख कांदा मार्केट रोड काँंक्रीटीकरणासाठी रुपये ७० लाख मुख्य बाजार समीतीत शाँपींग सेंपर करीता रुपये २ कोटी ५० लाख भाजीपाला मार्केट दुकानगाळे रुपये ४०लाख बेलापुर उपबाजार शाँपींग सेंटर १ कोटी १५ लाख बेलापुर रोड अंतर्गत काँक्रीटीकरण रुपये ६५ लाख ,टाकळीभान रोड काँक्रीटीकरण रुपये १ कोटी १० लाख या प्रमाणे एकुण ७ कोटी ७० लाख रुपये खर्चाची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे बाजार समीतीचे प्रशासक दिपक नागरगोजे व बाजार समीतीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्या कार्यकाळात बाजार समीतीच्या उत्पन्नात तसेच वैभवातही वाढ होत आहे शेतकरी व्यापारी वर्गांना मिळणाऱ्या सुविधातही वाढ झाली असुन शेतकरी व्यापारी बंधुनी प्रशासक नागरगोजे व प्रभारी सचिव वाबळे यांना धन्यवाद दिले आहेत

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget