Latest Post

श्रीरामपूर : यावेळेची मोठी बातमी हाती आलीय. ज्यात श्रीरामपूर एमआयडीसी तील दत्तनगर ते वाकडी रस्त्यावररील, यशवंतबाबा चौकी पासून  काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात अंदाजे ३५ वर्षीय युवकांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून. दगडाखाली ठेचून युवकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती  समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी दोन्ही अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन. मृतदेह व परिसराची पाहणी करून,युवकाच्या हत्येसंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याने. सहाय्यक पोलीस निरीक्षक मगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे,पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार, रघुवीर कारखीले, पोलीस कॉन्स्टेबल खरात, गुंजाळ, गुन्हे अन्वेषण विभागाचे राहुल नरवडे, गौरव दुरगुळे,गौतम लगड, बाळासाहेब गिरी, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फुरखान शेख,प्रमोद जाधव, बिरप्पा करमल आदी पोलीस कर्मचा-यांनी,मृतदेह व परिसराचा पंचनामा करून, मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदना करीत पाठवला असून. मयत युवक कोण व कुठला, व कशामुळे त्याचा खून झाला याबाबत शहर पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )-बेलापुर बु ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसुचित जमाती महिला या जागेवर निवडून आलेल्या सुनिता राजेंद्र बर्डे यांचे जात प्रमाणपत्रच रद्द झाल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द ठरविल्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसलै यांनी काढला असुन या निकालामुळे जनता विकास आघाडीला धक्का बसला आहे.  बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२१ मध्ये झाली होती त्यात प्रभाग क्रमांक  चार मधुन अनुसुचित जमाती महिला जागेकरीता गावकरी मंडळाच्या वतीने सौ.कमल भगवान मोरे तर जनता विकास आघाडीच्या वतीने सौ.सुनिता राजेंद्र बर्डे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत सौ कमल भगवान मोरे यांचा पराभव झाला. या निवडणूकीत जनता विकास अघाडीला सहा जागा तर गावकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या होत्या या वेळी सौ कमल मोरे यांनी जात पडताळणी कार्यालय नाशिक येथे अर्ज करुन बर्डे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्यामुळे जात पडताळणी देवु नये अशी मागणी केली होती. सौ.मोरे यांच्या अर्जाची दखल घेवुन तो अर्ज चौकशी कामी उपविभागीय कार्यालय श्रीरामपुर येथे पडताळणीसाठी पाठविण्यात आला.श्रीरामपुर येथील उपविभागीय अधिकारी यांना जातीच्या दाखल्या सोबत जोडलेले पुरावे चुकीचे असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे उपविभागीय कार्यालयाने सौ. सुनिता बर्डे यांचे जात प्रमाणपत्र दिनांक १०आँक्टोबर २०२२ रोजी  रद्द केले व तसा चौकशी अहवाल जातपडताळणी कार्यालयास कळविला तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आदेश क्र/रानिआ/मनपा/२००७ / प्रक्र६ /क-५दिनाक ३ आँक्टोंबर २००७ मधील मुद्दा क्रमांक ३ नगरपरिषद व नगर पंचायत व ग्रामपंचायत यांच्या बाबतीत ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे त्यांच्या बाबतीत अनर्हतेचे आदेश जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचे कळविल्यापासून त्वरीत व जास्तीत जास्त १५ दिवसाचे आत सदस्यत्व रद्द करुन संबधीताना बजवावा कुठल्याही सदस्याचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास ते तात्काळ जिल्हाधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे त्या नुसार जात पडताळणी कार्यालयाने ते पडताळणी देणे शक्य नसल्याचे कळविले.सौ.बर्डे यांचे जात प्रमाणापत्रच रद्द झाल्याने जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पदच रद्द केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी): आज दि.16/01/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना वडगाव पान ता. संगमनेर येथे  सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून सदर ठिकाणी  बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन एक परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.आरोपी नामे प्रतिक उत्तर आणि एक महिला आरोपी अशा दोघां विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गु. र.नं.23/2023, महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर  Dysp संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली PI राजेंद्र भोसले,   𝙰𝚙𝚒 ठाकरे, पो.हे .का.सुरेश औटी पो.ना.निलेश मेटकर,पो.ना.दिपक रोकडे,पो.कॉ लगड,पो.कॉ नितीन शिरसाठ, म.पो.कॉ वाकचौरे यांनी केली.*

श्रीरामपूर (प्रतिनिधी): श्रीरामपूर आरटीओ कार्यालय वतीने रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.या मार्गदर्शन सत्रासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरेश शिंदे व हेमंत निकुंभ उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निकुंभ म्हणाले की, अपघात टाळण्यासाठी आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. सर्व नागरिकांनी रस्त्यावर चालताना उजव्या बाजूने चालावे त्याने देखील अपघात तळतील. तसेच रस्त्यावर गाडी उभी करताना व गाडीचा दरवाजा उघडताना आपण मागे बघून दुसरे वाहन येत नसल्याची खात्री करावी मगदरवाजा उघडावा. रस्ता ओलांडताना आधी उजव्या, डाव्या मग उजव्या बाजूला बघून रस्ता ओलांडावा, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे असे ते पुढे म्हणाले. यावेळी शिंदे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की रस्त्यावर होणाऱ्या अपघात व मदत कार्य कसं करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अनेक नियम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी यांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज त्रिपाठी तर आभार रत्नप्रभा पाटील यांनी व्यक्त केले.

बेलापूर -- काही दिवसांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकर चा कर्ण  कर्कश्य  आवाज आणि  त्यांचा कायदेशीर वेळे व्यतिरिक्त होणारा वापर याविषयी पो. नि. हर्षवर्धन गवळी यांना निवेदन दिले होते. या संदर्भात पोलिसांनी संबंधितांना नोटीसाही दिल्या होत्या..

त्याच पार्श्वभूमीवर बेलापूर येथे एका लाऊड स्पीकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरून लाऊड स्पीकर चालक सोमनाथ साळुंके यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीने कर्ण कर्कश्य  आवाजात लाऊड स्पीकर वाजवून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे, लाऊड स्पीकर चा आवाज आणि तो वाजवण्याची वेळ, याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि जनतेस पीडा उत्पन्न होईल असे वर्तन केले असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. तसेच लाऊड स्पीकर चा आवाज किती डेसिबल पर्यंत असावा याचीही मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे. यासंदर्भात विविध धार्मिक स्थळांना नोटिसा देण्यात येऊन समज दिलेली आहे सदर कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती बेलापूर औट पोस्टचे हवालदार अतुल लोटके यांनी दिली असुन अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस मोठा आवाज लावुन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईत सातत्य ठेवावे अशी नागरीकाची मागणी आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून तालुक्याला दिशा देण्यासाठी आता पत्रकारांनी पुढे येण्याची गरज आहे.माजी आमदार कै.जयंत ससाणे हे नेहमी पत्रकारांना आपले मित्र मानत होते. त्यांनी पत्रकार दिनी या शहरांमध्ये पत्रकारांच्या सत्काराची परंपरा सुरू केली. ही परंपरा करण ससाणे यांनी चालू ठेवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत श्रीरामपूरचा विकास आणि श्रीरामपूर जिल्हा कधी होणार या प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली.

निमित्त होते अपूर्वा हाल येथे करण ससाणे मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभाचे.

यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती राजश्रीताई ससाणे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील बोलके, दत्तात्रय सानप, रमण मुथा,

ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, संपादक करण नवले,दिलीप नागरे, सुधीर नवले आदिंसह शहर व तालुक्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी आज श्रीरामपूरला कोणी वारस राहिलेला नाही. श्रीरामपूरच्या विकासासाठी कोणी पुढे येत नाही. याबद्दल खंत व्यक्त केली. तोच धागा पकडून ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी पुढे कोणी यायचं असा प्रश्न उपस्थित करीत आता तुम्हीच नेतृत्व करा आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत असे त्यांना सांगितले.

श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून जी चळवळ ज्या वेगाने चालवायला पाहिजे ती सध्या मंदावल्यासारखी वाटते. शहरांमध्ये येणारे शासकीय अधिकारी सध्या आपल्या मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. चार दोन लोक जाऊन अधिकाऱ्याचा सत्कार करतात. त्यामुळे ते डोक्यावर बसतात. नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असल्याने तिथे काय चालले कुणालाच कळत नाही. शहरांमध्ये अतिक्रमणे वाढत आहेत. दिवसाढवळ्या मूळ जागा मालकांच्या जागेमध्ये अतिक्रमणे होत आहेत. गुन्हेगारी मध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर व तालुक्याचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी राजकीय पक्षाचे लोक कमी पडत आहेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, करण नवले, ज्ञानेश गवले, भाऊसाहेब काळे, नागेशभाई सावंत आदिंनी वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

 प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड यांनी शहरातील पत्रकार भवनाचा प्रश्न नजीकच्या काळात मार्गी लागणार आहे. खासदार राजीव शुक्ला यांच्या दहा लाख रुपयांच्या निधीतून पत्रकार भवनाचे बरेचसे काम झाले आहे. उर्वरित काम आमदार लहूजी कानडे यांच्या निधीतून मार्च एंड पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.

यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी कै. जयंत ससाणे साहेब व पत्रकार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख करत पत्रकारांनी विरोधात बातमी छापली म्हणून ससाणे साहेब कधीही नाराज झाले नाहीत. उलट त्यांनी ती बातमी सकारात्मक दृष्टीने घेऊन मूळ प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. शिर्डी संस्थानच्या माध्यमातून देखील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावला. पत्रकारांनी केलेल्या बहुमोल सूचनांची ते दखल घेत असत तसेच शहर व तालुक्याच्या विकासासाठी नेहमी पत्रकारांशी चर्चा करीत होते. आज शहरांमध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार अनिल पांडे, महेश माळवे,गौरव साळुंके,शिवाजी पवार, सुनील नवले, प्रकाश कुलथे,सलीमखान पठाण,रणजीत श्रीगोड, बरकतअली शेख, भारतीताई परदेशी, रियाज पठाण, विठ्ठल गोराणे आदिंसह तालुक्यातील पत्रकार व ससाणे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-कोरोना काळातील अधिकचे मोफत धान्य शासनाने एक जानेवारी पासुन बंद केले असुन आता कार्डधारकांना वर्षभर माणशी पाचच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे मोफत धान्य वाटपामुळे आपला दैनंदिन खर्च कसा भागवावा अशा विवंचनेत स्वस्त धान्य दुकानदार सापडले आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात केद्र सरकारने पंतप्रधान  गरीब कल्याण योजनेंतर्गत माणशी पाच किलो धान्य मोफत देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता त्यामुळे विकतचे पाच किलो धान्य तर मोफतचे पाच किलो धान्य असे दर माह  माणशी दहा किलो धान्य दिले जात असे आता एक जानेवारी पासुन शासनाने माणशी पाचच किलो धान्य देण्याचे जाहीर केले असुन ते धान्य वर्षभर मोफत दिले जाणार आहे जिल्ह्यात १८०० धान्य दुकानदार असुन राज्यात ५५००० रेशन दुकानदार आहेत .धान्य मोफत वितरण करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे आता दुकानदारांना धान्याकरीता पैसेच भरावे लागणार नाही तसेच कार्डधारकाकडून पैसेच घेता येणार नाही त्यामुळे आता दुकान भाडे विज बिल दैनंदिन खर्च घर खर्च  कसा भागवायचा असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे .दुकानदारांना धान्य वितरणामागे क्विंटलला दिडशे रुपये कमिशन दिले जात असुन त्यात वाढ करण्यात यावी तसेच धान्य वितरणाचे कमिशन दर महा दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget