Latest Post

पुणे (गौरव डेंगळे) : पुणे विभागातून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करीत कुठल्याही स्पर्धेत सहभागी होताना आपला संघ विजयी होईल व आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा खेळ कसा उंचावता येईल हेच लक्षात ठेवून आपण स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असे प्रतिपादन मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक यांनी आज राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणारा पुणे विभागीय मुलींच्या संघाला जर्सी  वाटप व शुभेच्छा समारंभ दरम्यान केले. दिनांक १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान मिलेनियम नॅशनल स्कूल येथे १५ सदस्य मुलींचा पुणे विभागीय व्हॉलीबॉल संघाचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील दाढ येथे संपन्न झालेल्या विभागीय निवड चाचणी स्पर्धेतून या संभाव्य १५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी संघातील खेळाडूंना मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक व नेहा फाटक आदींच्या हस्ते खेळाची जर्सी प्रदान करण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना फाटक म्हणले की युवा मुलींनी या सर्व शिबिरासाठी आलेल्या मुलींचा खेळ बघून आपण देखील या खेळामध्ये प्राविण्य मिळवावे जेणेकरून आपल्या राज्याचा संघ बलाढ्य होईल व तो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निश्चित पदक मिळवेल. मला आशा आहे की चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जाणारा पुणे विभागीय मुलींचा संघ निश्चित सुवर्णपदकास गवसणी घालेल यात शंकाच नाही असे ते पुढे म्हणाले.

या प्रसंगी मिलेनियम नॅशनल स्कुलचे क्रीडा अधिकारी रामदास लेकावळे यांनीही संघास शुभेच्छा दिल्या, राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप

कोंडे, सचिन चव्हाण, पंकज शिंदे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन महेश गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे यांनी केले.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)लहानपणी मी भरपुर क्रिकेट खेळायचो व त्यातून एक गोष्ट शिकलो की कधी कधी आपल्याला माहिती असत की आपण हरणार आहोत तरी सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागत आणि कधी कधी त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा एखादा नो बॉल पडून दिखील यश मिळू शकत . आयुष्यातही असच असत मित्रांनो आपण हरलोय किंवा हरत आहोत असं माहिती असताना सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत खेळणे गरजेचं असत काय माहिती कधी बाजी पलटुन जाईल आणि आपले अपयश यशामध्ये बदलून जाईल असे प्रतिपादन ग्रॅज्युएट व लस्सीचे संचालक स्वप्निल लांडे यांनी श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.यावेळी सार्थक बहुउद्देश्य संस्थेचे अध्यक्ष उमेश तांबडे, साई इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अस्मिता गायकवाड,हेमंत सोलंकी, दिगंबर पिनाटे,एस सोनवणे,शुभम पवार,तुषार पवार, अस्मिता परदेशी,अतुल जाधव,अमोल शिरोळे,दौलत पवार, वैष्णवी इंगळे स्पर्धा आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.आज झालेल्या अंतिम सामन्यात साई इलेव्हन संघाने बेलापूर फायटर संघाचा ४ गडी राखून पराभव करून ५ व्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.श्रीरामपूर फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला.बेलापूर फायटर संघाने निर्धारित ६ षटकार ३६ धावा केल्या. विजयासाठी ३७ धावांचा आव्हान साई इलेव्हन संघाने पाचव्या षटकात चार गडी राखून पूर्ण केले व स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला ₹ ५०००/- व चषक डिझायर गॅलरीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.उपांत फेरीच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारा चैतन्य शिंदे,कुणाल थोरात तसेच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षण करणारा जस्मित गुलाटी,उत्कृष्ट क्षेत्रक्षण करणारा ध्रुव मुथा, उत्कृष्ट गोलंदाजी करणारा पवन बच्छाव,उत्कृष्ट फलंदाजी करणारा युवराज पवार यांना मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

बेलापुर  ( प्रतिनिधी  )- वैद्यकिय क्षेत्रांत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण देव मानतो परंतु पैशाला कमिशनला जास्त महत्व प्राप्त झाल्यामुळे हेच देव दुसऱ्याकडे केलेल्या सोनोग्राफीचा अहवाल पाहुन उपचारास नकार देतात त्यांना आपण काय म्हणणार ?                          अशीच एक घटना तालुक्याच्या ठिकाणी घडली रुग्ण हा बेलापुर गावातील होता दहा दिवसाच्या बाळाला डॉक्टर सोनोग्राफी सुचवतात, आपण घाई घाईने सोनोग्राफी करून तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जातो., परंतु डॉक्टरांनी  सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून सोनोग्राफी न केल्यामुळे डॉक्टर सदर बाळावर उपचार करण्यास नकार देतात त्यावेळी आपली काय अवस्था होईल.?

 श्रीरामपूर येथील एका वैद्यकिय अधिकाऱ्याने केवळ बाळाची सोनोग्राफी आपण सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून केली नाही म्हणून सदर बाळा वर उपचार करण्यास नकार दिला.

वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेली कट कमीशन प्रॅक्टिस या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे सदर अन्यायग्रस्ताने बेलापुर  येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांच्या कानावर ही घटना घातली.

सुनील मुथा यांनी विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ तसेच ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संकेत मुंदडा यांना सदर घटनेची माहिती देऊन रुग्णास न्याय न मिळाल्यास या बाबतीत आपण रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशाराही दिला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि सदर रुग्णास पुन्हा उपचारासाठी बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले.

श्रीरामपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटरचे चालक यांचे रॅकेट असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गरीब लोक पैशाची जमवाजमव करून महागड्या उपचाराकरीता खर्च करतात सोनोग्राफी करतात. परंतु ती सोनोग्राफी ग्राह्य धरली नाही तर परत सोनोग्राफी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून... याचाही डॉक्टरांनी विचार करायला हवा. जनसामान्यांच्या मनातल्या आपल्या या प्रतिमेला तडा जाऊ नये याची पुरेपूर काळजी डॉक्टरांनीही घ्यायला हवी. रुग्ण सेवा हीच  ईश्वर सेवा  या ब्रीदवाक्य प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपून आपला व्यवसाय केल्यास भविष्यातअसे संघर्षाचे प्रसंग निर्माण होणारच नाहीत अशी आशा मुथा यांनी व्यक्त केली. तरीही भविष्यात अशा प्रकारचा अन्याय रुग्णांवर झाल्यास संबंधित डॉक्टरांविरुद्ध कर्तव्यात कसूर केला म्हणून भादवी 166 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सुनील मुथा यांनी दिला आहे..

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुरला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरुन बेलापुर ग्रामपंचायतीने बैठक बोलविली अन आजी माजी सदस्य  पदाधिकारी, ग्रामस्थ ,कामगार यांच्याकडून समस्येचे निकारण करण्याबाबत चर्चा झाली.अन त्यातून जे धक्कादायक सत्य बाहेर आले ते समजल्यावर "बरे झाले बैठक बोलविली " असेच म्हणावे लागले .    गेल्या दोन तीन महीन्यापासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत होता या बाबत सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या दुषित पाण्याचे नमुनेही व्हाटस्अप गृपवर फिरले. गांवकरी मंडळाचे मार्गदर्शक शरद नवले यांनी सरपंच महेंद्र  साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना तातडीने कारण शोधण्याच्या सूचना दिल्या.यावर उपाय योजना संदर्भात चर्चा करण्यासाठी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ग्रामस्थांची बैठक बोलविली. या बैठकीच्या चर्चेतून असे समोर आले की अनेक वर्षापासुन टाकी स्वच्छ केलेली नाही त्यामुळे तातडीने टाकी स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीने तातडीने टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली असता भयानक सत्य समोर आले. त्या टाकीत चार ते पाच फुटापर्यत गाळ साचलेला होता अन हेच गाळ मिश्रीत पाणी बेलापुर व परिसरातील नागरीक गेल्या अनेक वर्षांपासून पित होते.त्या टाकीतील बऱ्याच वर्षापासून साचलेला गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले असता मागील काळात टाकी केव्हा साफ करण्यात आली होती याची माहीती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता टाकी स्वच्छ केल्याची तारीख महीना वर्षच सापडले नाही या वरुन अनेक वर्षापासून नागरीक गाळ मिश्रीत पाणीच पित होते हे उघड झाले. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे.हे माहीत आसताना देखील त्याकडे दुर्लक्ष झाले आरोग्य विभागही या बाबत अनभिज्ञ होता पाण्याच्या  टाकीत साचलेला प्रचंड गाळ हा वरुन पडलेल्या पाण्यामुळे ढवळून निघत होता व तेच ढवळलेले गाळ मिश्रीत पाणी नागरीकाना पिण्यास येत होते हे या निमित्ताने समोर आले आहे.याबाबत  सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की बैठकीत झालेल्या चर्चे नुसार बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने ५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे व टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.त्या नंतर २ लाख लिटर ची टाकी देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहे.मेन टाकीवरील पाण्याचे सर्व हौद देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहेत.या आधी अमरधाम, खटकळी-गावठाण,२० घरकुल, अयोध्या कॉलनी येथील पाण्याच्या टाक्या गाळ काढून स्वच्छ करण्यात आल्या आहेत. तसेच सातभाई वस्ती, गायकवाड वस्ती, कुऱ्हे वस्ती, रामगड, सुभाषवाडी येथील टाक्या देखील लवकरच साफ करण्यात येणार आहेत.परिसरात असणाऱ्या सर्वच बारा पाणी साठवण टाक्याची स्वच्छता वेळो वेळी करण्यात यावी व टाकी केव्हा स्वच्छ केली ते टाकीवर तसेच बेलापुर ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत नोंद केली जावी अशीही नागरीकांची मागणी आहे.

श्रीरामपूर : शहरातील व्यापारी कांतीलाल बोकडीया हे, मेनरोडवरील असलेल्या युनियन बँकेत पैसे काढून बाहेर जात असतांना. मोबाईल बाहेर काढतांना, बोकडीया यांच्या खिश्यातील ९० हजार रुपयांपैकी, ४० हजार रुपये खाली पडले. त्यावेळी तेथून जात असलेले गोंधवणी येथील दिलीप सांडू चव्हाण व संदीप भगवान बावसकर यांना रस्त्यावर ४० हजार रुपये सापडले असता. दोन्ही इसमांनी पैसे कोणाचे आहे याचा शोध घेत असतांना. बोकडीया यांनी पोलीस ठाणे गाठून ४० हजार रुपये गहाळ झाल्या बाबत माहिती देताच. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे व गुन्हे तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड,राहुल नरवडे, मच्छिंद्र कातखडे,गणेश गावडे यांना बोलावून,गहाळ झालेल्या पैश्याचा शोध लावण्यासाठी रवाना केले असता. तपास पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बँकेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून. चतुराईने गहाळ झालेले पैसे सापडलेल्या इसमांचा शोध लावून. विचारपूस केली असता दोन्ही इसमांनी देखील ४० हजार रुपये सापडल्याची प्रामाणिक कबुली देत, आपण देखील पैसे कोणाचे आहेत हे शोध असल्याचे सांगून. सापडलेले पैसे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक गवळी यांच्या समक्ष, कांतीलाल बोकडीया यांना गहाळ झालेले ४० हजार रुपये परत करून. प्रामाणिक पणा दाखविना-या दोघांचा सत्कार केला. तसेच पैसे शोधण्यास तत्परता दाखविणाऱ्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे,पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड,राहुल नरवडे, मच्छिंद्र कातखडे, गणेश गावडे यांचे कौतुक केले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार,जिल्ह्यात दर दिवस मोठं मोठ्या कारवाई होत आहेत. या कारवाईच्या चालता अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली,श्रीरामपूर पोलीस देखील मोठं मोठ्या कारवाई करत आहेत. या कारवाईच्या चालता २० नोव्हेंबरच्या रात्री, मानवी स्वास्थास हानिकारक असलेल्या, तसेच मस्त्यपालन, वाहतुक व विक्रीस प्रतिबंधित असलेला. मांगुर मासे घेऊन जात असल्याचीगोपनीय माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली असता. श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील कमानी जवळ, एम एच ४६ बी यु ७८६६ क्रमांकाची टाटा कंपनीचा अल्ट्रा टेम्पो अडवून झडती घेतली असता. टेम्पो मधून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३ टन मांगुर मासे आढळून आल्याने, तात्काळ पोलिसांनी टेम्पो सह आरोपी,असादुल मंडल मुफुजर रेहमान मंडल, अर्षद बाबुराली गाझी,दोघे राहणार वेस्ट बंगाल, सुनिल बारकु यादव, मनोज रामधन यादव दोघे हल्ली राहणार ठाणे, विवेकानंद आत्मज उमाशंकर, राहणार चंदौली उत्तर प्रदेश, प्रदिपकुमार कंन्कराज मोरी राहणार सुरेगाव तालुका नेवासा, वाहन चालक मुक्कमल विश्वास व जागा मालक मोहनेश्वर गणगे अशा ८ आरोपींना,१२ लाख ५० हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन, आरोपीं विरोधात, केंद्र व राज्य शासनाने, प्रतिबंधीत केलेल्या. मांगुर मत्स्य पालन, विक्री व वाहतुकीस प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी, भा.द.वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलीय. सदर कारवाई नंतर अहमदनगर मत्स्य विभागाच्या,सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी, पी एस पाटेकर व श्रीरामपूर शहर पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,पालिकेच्या कचरा डेपो येथे मांगुर मासे नष्ट करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीसउपनिरीक्षक समाधान सुरवडे, पोलीस नाईक रघुवीर कारखीले,राहुल नरवडे, गौतम लगड,गणेश गावडे, रमीजराजा अत्तार, मच्छिंद्र कातखडे, सोमनाथ गाढेकर,भारत तमनर, गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल शरद वांडेकर आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.


बेलापुर (प्रतिनीधी )-गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीतुन गेल्या दोन महीन्यापासुन दुषित पाणी पुरवठा केला जात असुन दुषित पाणी येण्यामागील नेमके कारण काय आहे?  असा सवाल माजी सरपंच भरत साळूंके व माजी रविंद्र खटोड यांनी केला आहे.  गेल्या काही दिवसापासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी होत्या तसेच याबाबत रविंद्र खटोड, भरत साळुंके, सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी ग्रामपंचायत कडे तोंडी तक्रार केली होती.या  सर्व तक्रारीची दखल घेत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठ्या बाबत तक्रारी संदर्भात ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली होती.त्या वेळी पाण्यात टी सी एल तुरटी टाकण्यात अडचण येते काय ? नळाला क्षारयूक्त पाणी का येते? असा सवाल चंद्रकांत नाईक यांनी केला तर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीला लिकेज असल्यामुळे दुषित पाणी येत असुन दोन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या चांगल्या प्रतीच्या तुरटीचा वापर का केला गेला नाही तसेच फिल्टर दुरुस्ती केव्हा होणार काम पुर्ण झाले नाही तर ठेकेदाराला बिल अदा कसे केले असा सवाल  नवले यांनी केला. बेलापुर गाव व परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकुण बारा टाक्या असुन या टाकीची बऱ्याच दिवसापासुन स्वच्छता केली नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली असुन टाक्या सफाईचे काम सुरु करण्यात आलेले असून तातडीनसर्व पाणी टाकी साफ केली जाईल असे अश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वेळोवेळी पाणी तपासणी केली पाहीजे परंतु तसे होत नाही पाण्यामुळे आजार वाढत असल्याच्याही तक्रारीचा सूर या वेळी आळविण्यात आला या वेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की गावाला चांगले पाणी पुरवठा कसा होईल याची दक्षता घेतली जाईल स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध आहे.पाटा मधून तळ्यात आलेले पाणी देखील दूषित आहे त्याबाबत इरिगेशन खात्या कडे लेखी तक्रार केली आहे. पाणीपुरवठा बाबत काही सुचना आसेल तर त्याचीही दखल घेतली जाईल असेही ते म्हणाले.उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की, गावात दूषित पाणी पुरवठा व्हावा अशी कुठल्याच पदाधिकारी अथवा सदस्याची इच्छा नसते.स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व उपाय योजना त्वरित करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.पाणी पिण्यास योग्य की अयोग्य हे तपासणी करुन अहवाल देण्याची जबाबदारी  आरोग्य विभाग व जलरक्षक यांची असताना पाणी पिण्यास योग्य कि अयोग्य असा कोणताच अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाकडे आला नसल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले त्या वेळी ओ टी घेण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल साळूंके यांनी विचारताच ओ टी काय असते असा प्रतिप्रश्न सरपंच साळवी यांनी केला  या वेळी पिण्याच्या पाण्याचे रोटेशन मिळावे अशी मागणीही करण्यात आली.ग्रामपंचायतीने स्वतः हुन पाणीपुरवठा बाबत बैठक बोलावली या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी सदस्य मुस्ताक शेख शफीक बागवान पुरुषोत्तम भराटे मोहसीन सय्यद राम पोळ प्रसाद खरात गोपी दाणी  ईस्माईल शेख समीर शेख गफुर शेख अजीज शेख सचिन अमोलीक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टर महेंद्र मीश्राम प्रशांत गायकवाड तान्हाजी गडाख संतोष शेलार पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम अजीज शेख रमेश अमोलीक रेमेश कुमावत बाबुलाल पठाण गोविंद खरमाळे सतीश मोरे तसवर बागवान आदि उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget