Latest Post

श्रीरामपूर : शहरातील व्यापारी कांतीलाल बोकडीया हे, मेनरोडवरील असलेल्या युनियन बँकेत पैसे काढून बाहेर जात असतांना. मोबाईल बाहेर काढतांना, बोकडीया यांच्या खिश्यातील ९० हजार रुपयांपैकी, ४० हजार रुपये खाली पडले. त्यावेळी तेथून जात असलेले गोंधवणी येथील दिलीप सांडू चव्हाण व संदीप भगवान बावसकर यांना रस्त्यावर ४० हजार रुपये सापडले असता. दोन्ही इसमांनी पैसे कोणाचे आहे याचा शोध घेत असतांना. बोकडीया यांनी पोलीस ठाणे गाठून ४० हजार रुपये गहाळ झाल्या बाबत माहिती देताच. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे व गुन्हे तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड,राहुल नरवडे, मच्छिंद्र कातखडे,गणेश गावडे यांना बोलावून,गहाळ झालेल्या पैश्याचा शोध लावण्यासाठी रवाना केले असता. तपास पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बँकेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून. चतुराईने गहाळ झालेले पैसे सापडलेल्या इसमांचा शोध लावून. विचारपूस केली असता दोन्ही इसमांनी देखील ४० हजार रुपये सापडल्याची प्रामाणिक कबुली देत, आपण देखील पैसे कोणाचे आहेत हे शोध असल्याचे सांगून. सापडलेले पैसे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक गवळी यांच्या समक्ष, कांतीलाल बोकडीया यांना गहाळ झालेले ४० हजार रुपये परत करून. प्रामाणिक पणा दाखविना-या दोघांचा सत्कार केला. तसेच पैसे शोधण्यास तत्परता दाखविणाऱ्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे,पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड,राहुल नरवडे, मच्छिंद्र कातखडे, गणेश गावडे यांचे कौतुक केले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार,जिल्ह्यात दर दिवस मोठं मोठ्या कारवाई होत आहेत. या कारवाईच्या चालता अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली,श्रीरामपूर पोलीस देखील मोठं मोठ्या कारवाई करत आहेत. या कारवाईच्या चालता २० नोव्हेंबरच्या रात्री, मानवी स्वास्थास हानिकारक असलेल्या, तसेच मस्त्यपालन, वाहतुक व विक्रीस प्रतिबंधित असलेला. मांगुर मासे घेऊन जात असल्याचीगोपनीय माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली असता. श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील कमानी जवळ, एम एच ४६ बी यु ७८६६ क्रमांकाची टाटा कंपनीचा अल्ट्रा टेम्पो अडवून झडती घेतली असता. टेम्पो मधून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३ टन मांगुर मासे आढळून आल्याने, तात्काळ पोलिसांनी टेम्पो सह आरोपी,असादुल मंडल मुफुजर रेहमान मंडल, अर्षद बाबुराली गाझी,दोघे राहणार वेस्ट बंगाल, सुनिल बारकु यादव, मनोज रामधन यादव दोघे हल्ली राहणार ठाणे, विवेकानंद आत्मज उमाशंकर, राहणार चंदौली उत्तर प्रदेश, प्रदिपकुमार कंन्कराज मोरी राहणार सुरेगाव तालुका नेवासा, वाहन चालक मुक्कमल विश्वास व जागा मालक मोहनेश्वर गणगे अशा ८ आरोपींना,१२ लाख ५० हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन, आरोपीं विरोधात, केंद्र व राज्य शासनाने, प्रतिबंधीत केलेल्या. मांगुर मत्स्य पालन, विक्री व वाहतुकीस प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी, भा.द.वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलीय. सदर कारवाई नंतर अहमदनगर मत्स्य विभागाच्या,सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी, पी एस पाटेकर व श्रीरामपूर शहर पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,पालिकेच्या कचरा डेपो येथे मांगुर मासे नष्ट करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीसउपनिरीक्षक समाधान सुरवडे, पोलीस नाईक रघुवीर कारखीले,राहुल नरवडे, गौतम लगड,गणेश गावडे, रमीजराजा अत्तार, मच्छिंद्र कातखडे, सोमनाथ गाढेकर,भारत तमनर, गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल शरद वांडेकर आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.


बेलापुर (प्रतिनीधी )-गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीतुन गेल्या दोन महीन्यापासुन दुषित पाणी पुरवठा केला जात असुन दुषित पाणी येण्यामागील नेमके कारण काय आहे?  असा सवाल माजी सरपंच भरत साळूंके व माजी रविंद्र खटोड यांनी केला आहे.  गेल्या काही दिवसापासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी होत्या तसेच याबाबत रविंद्र खटोड, भरत साळुंके, सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी ग्रामपंचायत कडे तोंडी तक्रार केली होती.या  सर्व तक्रारीची दखल घेत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठ्या बाबत तक्रारी संदर्भात ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली होती.त्या वेळी पाण्यात टी सी एल तुरटी टाकण्यात अडचण येते काय ? नळाला क्षारयूक्त पाणी का येते? असा सवाल चंद्रकांत नाईक यांनी केला तर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीला लिकेज असल्यामुळे दुषित पाणी येत असुन दोन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या चांगल्या प्रतीच्या तुरटीचा वापर का केला गेला नाही तसेच फिल्टर दुरुस्ती केव्हा होणार काम पुर्ण झाले नाही तर ठेकेदाराला बिल अदा कसे केले असा सवाल  नवले यांनी केला. बेलापुर गाव व परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकुण बारा टाक्या असुन या टाकीची बऱ्याच दिवसापासुन स्वच्छता केली नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली असुन टाक्या सफाईचे काम सुरु करण्यात आलेले असून तातडीनसर्व पाणी टाकी साफ केली जाईल असे अश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वेळोवेळी पाणी तपासणी केली पाहीजे परंतु तसे होत नाही पाण्यामुळे आजार वाढत असल्याच्याही तक्रारीचा सूर या वेळी आळविण्यात आला या वेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की गावाला चांगले पाणी पुरवठा कसा होईल याची दक्षता घेतली जाईल स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध आहे.पाटा मधून तळ्यात आलेले पाणी देखील दूषित आहे त्याबाबत इरिगेशन खात्या कडे लेखी तक्रार केली आहे. पाणीपुरवठा बाबत काही सुचना आसेल तर त्याचीही दखल घेतली जाईल असेही ते म्हणाले.उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की, गावात दूषित पाणी पुरवठा व्हावा अशी कुठल्याच पदाधिकारी अथवा सदस्याची इच्छा नसते.स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व उपाय योजना त्वरित करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.पाणी पिण्यास योग्य की अयोग्य हे तपासणी करुन अहवाल देण्याची जबाबदारी  आरोग्य विभाग व जलरक्षक यांची असताना पाणी पिण्यास योग्य कि अयोग्य असा कोणताच अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाकडे आला नसल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले त्या वेळी ओ टी घेण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल साळूंके यांनी विचारताच ओ टी काय असते असा प्रतिप्रश्न सरपंच साळवी यांनी केला  या वेळी पिण्याच्या पाण्याचे रोटेशन मिळावे अशी मागणीही करण्यात आली.ग्रामपंचायतीने स्वतः हुन पाणीपुरवठा बाबत बैठक बोलावली या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी सदस्य मुस्ताक शेख शफीक बागवान पुरुषोत्तम भराटे मोहसीन सय्यद राम पोळ प्रसाद खरात गोपी दाणी  ईस्माईल शेख समीर शेख गफुर शेख अजीज शेख सचिन अमोलीक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टर महेंद्र मीश्राम प्रशांत गायकवाड तान्हाजी गडाख संतोष शेलार पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम अजीज शेख रमेश अमोलीक रेमेश कुमावत बाबुलाल पठाण गोविंद खरमाळे सतीश मोरे तसवर बागवान आदि उपस्थित होते.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-गायरान जमीनीवरील अतिक्रमण न काढता ते कायम स्वरुपी करण्यात यावे अशी मागणी मांडवे तालुका श्रीरामपुर येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीरामपुर यांच्याकडे केली आहे                               न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरान जमीनीवरील अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असुन श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे येथील एकुण ९१ कुटुंबाला या बाबत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत मांडवे येथील गट नंबर१८० मधील गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन गेल्या अनेक वर्षापासून ९० ते १०० कुटुंब वास्तव्यास आहेत  त्यांनी वेळोवेळी नियमानुसार घरपट्टी पाणी पट्टी विज बिल भरलेले आहे त्यामुळे त्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्याकरी सरपंच निखील वडीतके उपसरपंच गोवींद ताबे मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे सदस्य  शहाजी वडीतके गोकुळ पवार साहेबराव चितळकर संतोष चितळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी निवेदन स्विकारले या वेळी बोलताना आण्णासाहेब गेठे म्हणाले की मांडवे येथील गायरान जमीनीवर गेल्या अनेक वर्षापासून शंभर कुटुंब राहत असुन त्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत त्यांची अतिक्रमण कायमस्वरुपी करुन देण्यात यावी या करीता शासन दरबारी अनेक वेळा निवेदने दिली ग्रामसभेचे ठरावही दिले तसेच महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांच्याशी देखील चर्चा करण्यात आलेली आहे तरी देखील येथील नागरीकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत आता लवकरच विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे सर्व नागरीकांची रास्त मागणी आहे तरी शासनाने कुणालाही बेघर करु नये असे गेठे म्हणाले आम्हाला कुणालाही बेघर न करता  आमच्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील मा .जिल्हाधिकारी  मा उपविभागीय अधिकारी आदिंना पाठविण्यात आलेल्या आहेत या निवेदनावर मायकल साळवी साहेबराव चितळकर गोकुळ पवार विठ्ठल अनारसे सुनिल तुपे नामदेव रजपुत बाबासाहेब अनारसे नामदेव अनारसे एकनाथ पोकळे कचरु गांगुर्डे मंदा भुजबळ बाळासाहेब पोकळे बाळू पवार भिवसेन मोरे छबु बर्डे मल्हारी माळी संतोष माळी सुरेश मोरे मंगल मोरे सुभाष गांगुर्डे सोमनाथ पवार किरण गायकवाड उषा पवार विष्णू सोनवणे बेबी संसारे माया माळी दत्तू माळी आदिसह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत

दाढ (लोणी) : येथील महात्मा फुले विद्यालय येथे पुणे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा श्री मनोज म्हस्के (उपाध्यक्ष नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन कर्मचारी सहकारी पतसंस्था) यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली.यावेळी श्री नरेंद्र मोरे,श्री खालकर,महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे मा अध्यक्ष श्री पार्थ दोशी, पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव श्री दादासाहेब तुपे, राष्ट्रिय व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे,व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री कुलदीप कोंडे,बारामतीचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री शिवाजी जाधव, आत्मा मलिकचे स्पोर्ट्स डेप्युटी डायरेक्टर श्री शलेंद्र त्रिपाठी,श्री सुनिल चोळके,गौरव डेंगळे,श्रीरामपूरचे क्रीडा रत्न श्री नितीन बलराज, राष्ट्रिय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या ईरा ढेकणे व ग्रिष्मा करणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आज पुणे विभागीय निवड चाचणीसाठी अहमदनगर जिल्हा,पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून सुमारे ६५ मुल-मुली उपस्थित होते. यामधून १५ मुलं व १५ मुली यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या मुलांचे शिबिर दाढ येथे पार पडणार आहे तर मुलींचं सराव शिबिर पुणे येथे आयोजित होणार आहे. या सराव शिबिरातून १२ मुले व १२ मुलींची निवड करण्यात येईल व निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्यावतीने सब ज्युनियर (१६ वर्षाखालील) मुले व मुली राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पुणे विभागाचा नेतृत्व करेल.सदर स्पर्धा दि. २३ ते २५ नोव्हेंबर २०२२ रोजी भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी-देविदास देसाई)-   बेलापुरचा आठवडे बाजार वेळ सायंकाळची एक जण पुलावरुन प्रवरा पात्रात उडी घेतो त्याला वाचविण्यासाठी अनेक तरुण जिवाची पर्वा न करता नदीत उड्या मारतात त्याला सहीसलामत बाहेर काढतात अन तो निघतो बेवडा             बेलापुरला रविवारचा आठवडे बाजार असतो येथुन जवळच असलेल्या केसापुर येथील तिन जण सायंकाळच्या वेळेस पुलावरुन चालले असता पुलाच्या कोपऱ्यावरच गाडीचे पेट्रोल संपते अन मग काय करायचे अशा विचारातच आणखी थोडी टाकुन येवु असे करुन तिघेही निघाले अन मौज मस्ती करता करता एकाने अचानक पुलावरुन नदी पात्रात उडी घेतली काही क्षणात अनेक जण मदतीला धावले काही तरुणांनी मागचा पुढचा विचार न करता त्याला वाचविण्यासाठी नदी पात्रात उड्या घेतल्या पुलावर मोठी गर्दी जमली पोलीसही आले त्याला सुखरुप बाहेर काढले त्याची चौकशी केली असता तो केसापुरातील निघाला त्याचे साथीदारही आले खरी गंमत समजल्यावर बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे हरीष पानसंबळ भरत तमनर संपत बडे यांनी त्यास  पोलीस स्टेशनला नेले पोलीसी भाषेत समजावुन सांगीतले अन त्या सर्वांना त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिले गंमत करायला गेले अन अंगाशी आले अशी अवस्था त्यांची झाली

बेलापुर  (प्रतिनिधी  )- प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी भागवत लुटे तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी बेलापुर येथील रविंद्र कर्पे तसेच अहमदनगर  जिल्हा निरीक्षक पदी चंद्रकांत शेजुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे                                                 प्रदेश तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तेली महासंघाची  बैठक संपन्न झाली या वेळी मार्गदर्शन करताना मांजी मंत्री तथा राज्याध्यक्ष  जयदत्त क्षिरसागर म्हणाले की प्रदेश तेली महासंघाच्या  माध्यमातून  समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे संघटनेच्या माध्यमातून तेली समाजाला संघटीत करुन त्यांच्या अडचणी सोडविल्या जातील समाजानेही संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले पाहीजे तरुण पिढीने परंपरागत व्यवसाया व्यतिरिक्त  शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करुन समाजाचे नाव मोठे करावे असे अवाहनही क्षिरसागर यांनी केले या वेळी सागर बाळासाहेब भगत यांची नाशिक युवा आघाडी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .या वेळी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश सेक्रेटरी विजयराव काळे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष अरविंद दारुणकर अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ नरहरी नागले जिल्हा युवा अध्यक्ष सोमनाथ देवकर अहमदनगर शहर युवा अध्यक्ष नितीनराव फल्ले जेष्ठ मार्गदर्शक दिलीप साळूंके बाळकृष्ण दारुणकर संतोष मेहेत्रे आदि मान्यवरासह तेली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी शेवटी आभार मानले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget