Latest Post

श्रीरामपूर-शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा विडा उचलून,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कारवाई होत असतांना. एकजण घातपाटाच्या उद्देशाने, गावठी कट्टा व जिवंत बाळगत असल्या संदर्भात. पोलीस निरीक्षक गवळी यांना गोपीनिय माहिती मिळताच, त्यांनी शहर गुन्हे तपास पथकाचे सपोनि जिवन बोरसे यांना कारवाईचे आदेश दिले. रात्री १० वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे, आपल्या जीवाची पर्वा न करता. सपोनि बोरसे हे काही सहका-यांना सोबत घेऊन. छत्रपती शिवाजी चौकापासून काही अंतरावर, सापळा लावुन बसलेले असतांना. त्यावेळी २ इसम विनानंबर पांढऱ्या रंगाच्या एक्टीवावर, टिळकनगर हुन श्रीरामपूरच्या दिशेने येतांना पाहून. पोलिसांनी मोठ्या शिताफीने, गौरव संजय रहाटे, वय वर्ष २२, राहणार दत्तनगर, व रुपेश किरण जाधव, वय वर्ष १८,राहणार कामगार हॉस्पिटल, वॉर्ड नं. ६, या दोघांना  एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह,

१ लाख १ हजारांच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडून. आरोपीं विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून. आरोपींनी गावठी कट्टा कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणला या बाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची कारवाई सपोनि जिवन बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस शिपाई गौतम लगड, राहुल नरवडे,रमिझराजा अत्तार,गणेश गावडे,गौरव दुर्गुळे,मच्छिद्र कातखडे, भारत तमनर आदींनी यशस्वीरीत्या पारपडली असून. आरोपींना न्यायालयात हजर केले असता. अधिक तपासा करिता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याची माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जगातील सर्व देश हे भारताकडे कुतुहलाने व उत्सुकतेने पहात असुन येणारा काळ हा भारत मातेच्या उत्कर्षाचा भरभराटीचा व वैभव संपन्नतेचा असणार आहे जागतीक पातळीवर आपल्या देशाला विशेष महत्व प्राप्त होणार असल्याचा विश्वास राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी व्यक्त केला                                              बेलापुर येथील जुने बालाजी मंदीर येथे आयोजित अन्नकुट उत्सवात भावीकांना उपदेश करताना महंत गोविंद देवगीरीजी महाराज पुढे म्हणाले की या देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोवींदाने राहतात  या देशात वेगवेगळे उत्सव सण उपासणा केल्या जात असल्यामुळे देशाची शोभा दिवसेंदिवस वाढत आहे  जगातील एकमेव भारत देश असा देश आहे की तेथे विविध भाषा वेगवेगळ्या परंपरा रितीरीवाज चालीरीती असुनही या देशात ऐकोपा आहे सुख समृद्धी आहे याचे कारण आपल्या सर्वांची एकच भावना आहे की आपण सारे भारत मातेची लेकुरे आहोत आपल्या देशाची एक व्यक्ती इंग्लंडचा पंतप्रधान होवु शकते ही अभिमानाची गोष्ट आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आपली खरेदी गावातच करा ही सुंदर संकल्पना गावकऱ्यांनी राबविली आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा देशाचा विकास करावयाचा असेल तर आपल्या वस्तु गावातच खरेदी करा देशी वस्तुंचाच वापर करा आपली मुले शहराकडे आकर्षित होत आहे नोकरीच्या मागे पळताना गाव गावातील माणसांना विसरत चालले आहे हे कुठेतरी थांबले पाहीजे त्याकरीता उच्च शिक्षणाची सुविधा गावातच मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जगातील सर्व मुस्लीम राष्ट्रांची परिषद इंडोनेशियात होत आहे  काळानुरुप मुस्लिम बांधव देखील  बदलण्याच्या विचारात आहेत.असे सागुंन ते पुढे म्हणाले की  आपल्या देशाच्या वतीने नेतृत्व करण्याची, विचार मांडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली असुन भगवान केशव गोंविंद महाराज व आपल्या ग्रामस्थांच्या कृपेने नक्कीच यश येईल असेही आचार्य महंत गोविंददेवागीरीजी महाराज म्हणाले ओमप्रकाश व्यास व व्यास परिवारातील बालगोपालांनी देवाचा अतिशय सुंदर पध्दतीने शृंगार केला होता या वेळी अन्नकुटचे यजमान सौ स्नेहलशरद नवले व शरद मोहनराव नवले यांचा सप्त्नीक सत्कार करण्यात आला या वेळी  सखाहारी मुळे लिखीत गोमाता कथा अमृत तसेच मोहनराव खानवेलकर लिखीत भगवान श्री हरिहर केशव गोविंद महात्म्य या ग्रंथाचे प्रकाशन तसेच बेलापुर पाणी पुरवठा योजनेस शासनाकडून १२६ कोटी रुपये मंजुर झाल्याबद्दल त्या माहीती पत्रकाचे अनावरण स्वामीजींच्या हस्ते अनावरण करण्यात आले  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोपाल उपाध्याय यांनी केले तर ट्रस्टचे सचिव पंडीत महेश व्यास यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवान व शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रध्दांजली वहाण्याचा तसेच भारतीय जवान व पोलीस बांधव यांच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी एक पणती जवानांसाठी हा उपक्रम फ्रेंडस् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात आला.फ्रेंड़्स फाँर एव्हर गृप व समस्त ग्रामस्थांच्या वतीने देशाचे रक्षण करताना जे जवान शहीद झाले तसेच आपले कर्तव्य बजावताना जे पोलीस बांधव शहीद झाले त्यांना श्रध्दांजली वहाण्यासाठी तसेच भारतीय जवान व कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव यांच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी गेल्या नऊ वर्षापासुन पाडव्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजता हा उपक्रम राबविण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व भारत मातेचे पुजन करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात असलेल्या ध्वजस्तंभाभोवती हजारो पणत्या माजी सैनिक तसेच पोलीस बांधव व ग्रामस्थ यांच्या हस्ते प्रज्वलीत करण्यात आल्या या वेळी शहीद जवान शहीद पोलीस बांधव आत्महत्या केलेले शेतकरी बांधव या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली या वेळी शहीद जवान अमर रहे जय जवान जय किसान वंदे मात़़्रम भारत माता कि जय अशा घोषणा देण्यात आल्या या वेळी माजी जि प सदस्य  शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई,रणजित श्रीगोड,मारुती राशिनकर,विष्णूपंत डावरे दिलीप दायमा,दिपक क्षत्रिय, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, अजीज शेख,भीमराज हुडे,ग्रामपंचायत सदस्य,मुस्ताक शेख तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे मोहसीन सय्यद, शिवाजी वाबळे,लहानु नागले, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे  हरिष पानसंबळ  पोलीस पाटील अशोक प्रधान कैलास चायल,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा,रावसाहेब अमोलीक बाबुलाल पठाण,शफीक बागवान सुधीर तेलोरे,महेश कुऱ्हे, गणेश बंगाळ,दत्तात्रय मुसमाडे,रफिक शेख,जयेश अमोलीक,गयाज पठाण,वैभव कुऱ्हे,योगेश दायमा पोपट नवले, समीर जहागीरदार, जब्बार पठाण,सुरेश सूर्यवंशी, अवधूत कुलकर्णी, जयेश अमोलिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी फ्रेंड़्स फाँर एव्हर गृपचे विष्णूकांत लखोटीया, शशिकांत तेलोरे,राजेश सुर्यवंशी वेणूगोपाल सोमाणी,अभिषेक खंडागळे,सुमित सोमाणी विशाल वर्मा,मयुर साळूंके,सुभाष शेलार योगेश जाधव, संदीप जाधव ऋतुराज नाईक, विजय कोठारी प्रभात कुऱ्हे  निशीकांत लखोटीया,रविंद्र कुऱ्हे,साईनाथ शिरसाठ आदिनी विशेष प्रयत्न केले उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी आभार व्यक्त केले.

श्रीरामपूर : शाळा आणि ज्ञानार्जन हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक सर्वश्रूत समीकरणच आहे.शाळेतून घेतलेले धडे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे काम विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांचे सर्वत्र कौतुक होत असते.गावकर्‍यांसोबत इतरांनीही कौतुक करावे असा दीपोत्सवाचा उपक्रम उंबरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला.  

असा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत यावे हीच मुळात आनंद देणारी बाब आहे. ज्या शाळेत आपण ज्ञानाचे धडे घेतो,त्याच ज्ञानरूपी शिदोरीच्या सहाय्याने विद्यार्थी भविष्यात मार्गक्रमण करतो, अशा शाळेत रोषणाई केली जावी अशा उद्देशाने विद्यार्थ्यांनी दिवाळी प्रथम शाळेत साजरी केली.


उंबरगाव येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक शकील बागवान यांनी पुढाकार घेत दिवाळी सुट्टीपूर्वी विद्यार्थ्यांना दीपावलीचे महत्त्व पटवून देताना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करताना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते.त्याचवेळी सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेतच दिवाळी साजरी करण्याचा संकल्प मांडला.सर्व विद्यार्थ्यांनी होकार देत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले. 

दिवलीच्या दिवशी रंगी बेरंगी कपडे परिधान करून नटून थटून आलेला प्रत्येक विद्यार्थी पणतीसह आला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच आनंदाची पणती प्रत्येक


वर्गासमोर दीप लावून तो वर्ग सुशोभित केला.पणत्यानी रोषणाई करून संपूर्ण शालेय परिसर प्रकाशमय करून समृद्ध केला. फटाके न फोडता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा खराखुरा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकासह एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

आगळ्यावेगळ्या या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,सरपंच किशोर कांडेकर,माजी सरपंच चिमाजी राऊत,राजेंद्र राऊत,जितेंद्र भोसले,मुख्याध्यापक लताबाई पालवे व सर्व शिक्षकांनी उपक्रमाचे कौतुक केले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-दिपावलीच्या सणाकरीता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजवुन ठेवली परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट स्पष्ट जाणवत होते            दिपावली सणाकरीता व्यापाऱ्यांनी दुकानात भरपुर माल भरुन ठेवला होता या वर्षी दिवाळी चांगली होईल अशी सर्वांनाच अपेक्षा असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व्यापारी कष्टकरी सर्वांच्या आनंदावर पाणी पडले बेलापुर बाजारपेठेची आसपासच्या गावांमुळे दर वर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते खासकरुन शेती चांगली पिकली तर बाजारपेठ फुलुन जाते परंतु या वर्षी सर्वच पिके जोमात होती परंतु आलेल्या पावसामुळे ती सर्व कोमात गेली पाऊस येण्या आगोदर सर्वच भागात सोयाबीन कापसु मका ही पिके जोरात होती त्या पिकाच्या जोरावर काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते परंतु अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या वाती झाल्या तर

सोयाबीनला जागेवरच मोड फुटले सोयाबीन, कापुस बाजारात आले असते तर आर्थिक उलाढाल वाढली असती परंतु आता केवळ बालबच्च्याकरीता नाईलाजास्तव सण साजरा करण्याची वेळ सर्वावरच आली आहे अनेकांनी थोडे फार फराळ बाजारातुनच विकत आणुन सण साजरा केला आहे  शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यामुळे कष्टकरी वर्गांना देखील काम मिळेनासे झाले आहे नुकसानीचे पंचनामे करुन निदान दिवाळीला तरी सण साजरा करण्यापुरती मदत शासनाकडून मिळेल ही अपेक्षा होती पण ती ही फोल ठरली आहे याचा परीणाम सर्व बाजारपेठावर झालेला दिसत असुन व्यापारी ग्राहकाच्या प्रतिक्षेत दुकानात बसुन आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त  ग्राहकांनी आपली खरेदी गावातच करावी या करीता भव्य अशी बक्षिस योजना जाहीर केली व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला परंतु हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हिरावला गेल्यामुळे व्यापारी बँका पतसंस्था सहकारी संस्था सर्वावरच मोठा परिणाम झाला आहे

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-अतिवृष्टीमुळे शेतकरी व कष्टकरी वर्गाचे झालेले नुकसान व सणासुदीचा काळ लक्षात घेता सर्वांची दिवाळी गोड व्हावी या करीता आनंदाचा शिधा देण्याचा धाडसी निर्णय शासनाने घेतला असुन या निर्णयामुळे गरीबांना दिपावलीचा आनंद घेता येणार असल्याचे मत खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले                                   श्रीरामपुर तालुक्यात आनदांचा शिधा दुकानात पोहोच झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित वितरण होते की नाही हे पहाण्याकरीता खासदार लोखंडे यांनी रेव्हेन्यू सोसायटीच्या धान्य दुकानास भेट देवुन पहाणी केली वाटप व्यवस्थित सुरु असल्याचे पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले त्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वितरणही करण्यात आले या वेळी त्याच्या समवेत भाजपाचे पदाधिकारी प्रकाश चित्ते राजेंद्र देवकर सुधीर वायखेडे संदीप वाघमारे कैलास भणगे नंदकिशोर आरोटे राजेंद्र त्रिभुवन उपस्थित होते रेव्हेन्यू सोसायटीच्या दुकानाचे सेल्समन रज्जाक पठाण यांनी आभार मानले

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-शासनाने गोरगरीबांना दिवाळी भेट देताना शंभर रुपयात साखर रवा हरबरा डाळ व पामतेल या चार वस्तूचा आनंदाचा शिधा वस्तुंचे वाटप श्रीरामपुर तालुक्यात सुरु झाले असुन ग्रामीण भागातही वाटप सुरु झाले आहे .मांडवे तालुका श्रीरामपुर येथे या किटचे वाटप सुरु करण्यात आले        या वेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य  शंकर चितळकर म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकरी तसेच गोरगरीबांना दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा या करीता शंभर रुपयात चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला असुन  शासनाचा हा निर्णय खरोखरच सर्वसामान्यांना वाढत्या महागाईच्या काळात नक्कीच दिलासा देणारा आहे अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या अर्थात दिवाळीच्या काळात भाजपा सरकारने या गोरगरीब जनतेला मोठा मदतीचा हात दिलेला आहे या वेळी  पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर सरपंच निखील वडीतके उपसरपंच गोविंद तांबे ग्रामसेवक संदीप बडाख अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई गंगाराम भोसले  आण्णासाहेब गेठे शहाजी वडीतके बबनराव सोपान चितळकर  साहेबराव चितळकर गोकुळ पवार विजय काबुडके आण्णासाहेब ढोणे पांडुरंग पटांगरे बाबासाहेब शेंडे ज्ञानेश्वर वडीतके शिवाजीराजे वडीतके विष्णू सोनवणे  आदींसह तांबे वाडी तसेच मांडवे येथील रेशनकार्ड धारक महिला आणि लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget