Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-सण- उत्सव काळात सोशल मीडियावर चुकीचे संदेश व्हायरल करून अफवा पसरविल्या जात असल्याचे समोर आले आहे. आगामी काळात जिल्ह्यामध्ये विविध सण उत्सव साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये काही चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी सायबर सेलची दोन पथके नियुक्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात अयोजित पत्र परिषदेत अधीक्षक पाटील बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ आग्रवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. अधीक्षक पाटील म्हणाले की, जिल्ह्यात येत्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी, महावीर जयंती आदी विविध सण- उत्सव साजरे होत आहेत. काही दिवसांपूर्वी नेवासा येथे घडलेल्या घटनेसंदर्भात आरोपींना अटक करण्यात आली आहे.मात्र, सध्या सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलची दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणतेही चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. असे प्रकार आढळल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.जिल्ह्यात सामाजिक शांतता राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. रामनवमी उत्सवादरम्यान धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असून, गुंडांविरोधातही कारवाया केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर शहरात जातीय तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, यासंदर्भातही पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी कुठलेही चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नयेत. चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणे, त्याला लाईक करणे, कमेंट करणार्‍या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. समाजकंटकांनी एकत्र येवून तेढ निर्माण होणारे व्हिडिओ तयार केले तर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. समाजात काही अफवा निर्माण झाल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. नागरिकांनी अफवांवरती विश्‍वास ठेऊ नये.


बेलापूर(प्रतिनिधी)ःयेथील अभिषेक देविदास देसाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जलसंधारण अधिकारी (वर्ग २)पदाची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत.                              श्री.अभिषेक देसाई हे ज्येष्ठ पञकार बिनदास न्युज 24 चे उप संपादक व बेलापूर पञकार संघाचे सचिव देवीदास देसाई यांचे चिरंजीव आहेत.श्री.अभिषेक हे नुकतीच जलसंधारण अधिकारी (वर्ग२)पदासाठी माहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली.त्यात त्यांना घवघवीत यश प्राप्त झाले. त्यांच्या या यशाबद्दल बिनदास न्युज 24 चे संपादक तसेच महाराष्ट्र लघु व्रत्त पत्र व पत्रकार संघ ईलेक्ट्राँनिक मिडिया चे जिल्हाध्यक्ष आसलम बिनसाद व महाराष्ट्र बेलापूर पञकार संघाचेवतीने सर्वश्री भास्कर खंडागळे ,सुनिल मुथा,रणजीत श्रोगोड,मारुती राशिनकर,सुनिल नवले,ज्ञानेश्वर गव्हले,नवनाथ कुताळ,अरविंद शहाणे,दिपक काळे,राम पोळ,भिमराज हुडे,सदाशिव नागले,दिपक क्षञिय,रुपेश सिकची,शरद पुजारी, आदिंनी अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी -श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या एका जणाने पत्नीची कुदळीच्या सहायााने हत्या केली. तसेच चार वर्षाच्या मुलाच्या गळ्यास दोरीने फास देवून हत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागातील खबडीत राहणा-या बलराम कुदळे (वय 40 ) या नाराधम माणसाने घरगुती वादातून काल सकाळी त्याची पत्नी अक्षता (वय 35) हिच्या डोक्यात कुदळीच्या वार करून तिची हत्या केली. तसेच मुलगा शिवतेज (वय 4 वर्ष) याला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास देवुन जिवे ठार मारले रामनवमी या पवित्र दिनी दोन जणांची हत्या केल्यामुळे श्रीरामपूर शहरात खळबळ माजली असून समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.

नेवासा  प्रतिनिधी -नेवासा शहरात रामनवमीच्या  पूर्वसंध्येला निघालेल्या मिरवणुकीदरम्यान काही तरुण झेंडा फडकवत असल्याने समोरासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीला गालबोट लागले असल्याने राम भक्तांमधून संताप व्यक्त केला गेला. काही वेळानंतर पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला सदरील प्रकाराबाबत पोलीस हवालदार तुळशिराम भानुदास गिते (वय ५१) यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की दि. ९ रोजी नेवासा शहरात शोभा यात्रेमध्ये रात्री १००० ते १२०० लोक हजर होते व डिजे लावण्यात आलेला होता. सदर शोभायात्रेबाबत आयोजक मनोज पारखे यांना शोभायात्रेची परवानगी घेतली किंवा कसे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले, सदर शोभायात्रेचे आयोजक अंकुश पंढरे, कृष्णा डहाळे, संतोष कुटे, नितीन जगताप इ. असल्याचे सांगितले. सदर शोभायात्रेमध्ये स्थावरती प्रभू रामचंद्राचा फोटो लावण्यात आलेला होता. शोभायात्रा एसटी स्टॅण्ड येथून खोलेश्वर गणपतीकडे घेवून जात असताना रस्त्याच्या उत्तरेकडीलबाजूस असलेल्या किस्मत टी व ज्युस या दुकानासमोरील रस्त्यावर काही मुस्लीम तरुण हातामध्ये हिरव्या रंगाचे कापड बांबूला बांधून जोरजोराने हालवत होते. ते पाहुन शोभायात्रेतील हिंदू तरुण त्यांचेकडे धावत जाऊन वाद घालू लागले तेवढ्यात मी व इतर स्टाफ तेथे पोहचलो. झेंडा घेतलेल्या मुलांना मी ओळखले. ते रेहान शेख, फजल शेख, सोहेब पटेल, इमरान जमीर शेख, सद्धाम जमीर शेख, सलमान जमीर शेख, साहील जहागिरदार व इमरान आत्तार हे होते. आम्ही त्या मुलांचे हातातून झेंडा काढून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मला धक्काबुक्की केली म्हणून मी माझे मोबाईलमधून त्यांचे चित्रण करीत असताना त्या तरुणांपैकी रेहान शेख याने माझा मोबाईल हिसकावून घेऊन मोबाईल फोडून नुकसान केले व माझे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. त्यानंतर ते सर्वजण तो झेंडा घेऊन तेथून पळून गेले. त्यावेळी मला समजले की जमावातील कोणीतरी अल्ताफ ख्वाजा बागवान (वय १५) रा. लक्ष्मीनगर नेवासा यास कोणीतरी काहीतरी डोक्यात मारुन जखमी केले असून त्यास काही लोक परस्पर दवाखान्यात घेऊन गेले आहेत. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी सार्वजनीक रस्त्यावर जोरदार गोंधळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दुकानादारांनी आपआपली दुकाने भितीने बंद केली. त्याचवेळी रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने व रस्त्यावरील लोक यांचेमध्ये प्रचंड पळापळ झाली त्यानंतर पोलिसांनी जमलेल्या जमावाला तेथून पांगवले आयोजक मनोज पारखे, अंकुश पंढुरे, कृष्णा डहाळे, संतोष कुटे, नितीन जगताप यांनी विनापरवाना श्रीरामनवमी निमित्त शोभायात्रा काढून त्यामध्ये डीजे लावण्यात आला तसेच इसम नामे रेहान शेख, फजल शेख, सोहेब पटेल, इमरान जमीर शेख, सद्धाम जमीर शेख, सलमान जमीर शेख, साहील जहागिरदार व इमरान आत्तार यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून हिरव्या रंगाचा झेडा फडकावून सार्वजनीक रस्त्यावर हिंदू समाजातील तरुणाबरोबर वाद निर्माण केला व मी सरकारी कर्तव्य करत असताना माझे बरोबर वाद घालून धक्काबुक्की केली तसेच माझा मोबाईल फोडून नुकसान केले आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणला तसेच हिंदू समाजातील ओंकार जोशी, दीपक परदेशी, कष्णा डहाळे, बाळासाहेब कोकणे व इतर ६० ते ७० लोकांनी सार्वजनीक रस्त्यावर गोंधळ करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५३, ३२४, १४३, १४७, १४९, ४२७, ३२३, १८८ सह क्रिमीनल अमनमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करत आहेत. सदरील घटनेनंतर शहरात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. 

श्रीरामपूर रमजान स्पेशल- (डॉ सलीम सिकंदर शेख)" तुम्हाला," आजन " देउन पुकारले (बोलावले ) जाईल , तर तुम्ही नमाज अदा करण्यासाठी घाई करून दुकान , व्यापार, हातातील काम लवकर आटोपून लगेच या " 

      (  दिव्य कुरआन सुराहा नं.६२ , सुरह अल - जुमूआ .आ.न.९,१०).

प्रत्येक धर्मात श्रद्धांळुंना ,ईमानवानांना , मंदिर, मस्जिद, चर्चा , मध्ये बोलावण्यासाठी एका विशिष्ट पद्धती आहेत. प्रेषीत मुहम्मद स्व.यांनी मक्का हुन मदीना हिजरत केल्या नंतर , तेथील ईमानवानांना एकत्र करण्यासाठी कोणती पद्धतीची गरजेचे आहे ,यासाठी त्यांनी आपल्या सहकारी मित्र ( साहाबा रजि.) यांची मिटींग बोलावून सल्ला मागितला .( प्रेषित मुहम्मद स्व.यांच्या  कामाची पध्दत आशी होती की , कोणत्याही काम करताना , आपल्या सहकारी मित्रांना ( साहाबा म्हणतात ) चर्चा साठी एकत्र करून , प्रत्येक सहभागी सहकारी मित्रांचे सल्ला , विचार घेऊन नंतर च कोणताही निर्णय घेत असत , .ही ईस्लामी लोकशाही  पध्दती आहेत.) दिवसातून पाच विविध वेळेनुसार लोकांना एकत्र करण्यासाठी कोणती पध्दतीची गरज आहेत,

,काही सहाबांनी ज्यु ( यहुदी)सारखी कंक (बेल ) वाजवून ,तर काहींनी चर्च सारखं घंटा वाजवू ,तर कोणी शंख वाजवू तर कोणी आग लावून बोलावू ,हे  सल्ले प्रेषीतांना आवडली नाही, दुसऱ्या दिवशी विचार करून सांगा , तर खास मित्र हजरत उमर बिन खत्ताब रजि.( ईस्लामी दुसरे खलिफा  ) यांच्या स्वप्नात कोणीतरी मनुष्य वारंवार तेच तेच आजान सारखं शब्द , वाक्य रचना गूण गुणत आहे ,तसेच त्यांच्याच प्रमाणे दुसरे सहाबा (मित्र) हजरत अब्दुल्ला बिन जैद रजि.यांनी ही त्यांच्या ही स्वप्नात त्याच शब्दांचा आवाज वारंवार येत आहेत ,  त्यांनी झोपेतच तो आवाज पाठ  ( कंठस्त) करून झोपेतूनच तात्काळ उठून , निम्म्या रात्रीच प्रेषीत मुहम्मद स्वं . यांच्या कडे जाऊन  उठवून सर्व स्वपनातील हाकीगत सांगितली  ...

ही अल्लाहा ( परमेश्वर,  ईश्वराला) चीच  ईच्छा , वरदान , देनं ,आहेत . अल्लाह चीच मान्यता आहे  , अल्लाह चेच शब्द , ध्वनी समजून ,  लगेच त्यांचे खास सहकारी मित्र हजरत बिलाल रजि. भारदस्त व्यक्तिमत्व ,पहाडी परंतु मंजुळ आवाजाचे धनी ., यांना बोलावून पहाटेची नमाज ए फजर ला .

 ( हे ' आजान " चे पवीत्र शब्द व ध्वनी )

    (१)    " अल्लाहा -हु - अकबर .. अल्लाहा- हु - अकबर .."


( अर्थात :- अल्लाहा (ईश्वर ) सर्व श्रेष्ठ आहे . अल्लाहा (ईश्वर) सर्व श्रेष्ठ आहेत.)

      " अल्लाहा- हु - अकबर ... अल्लाहा- हु- अकबर "

(अर्थात:- अल्लाहा (ईश्वर) सर्व श्रेष्ठ आहे .. अल्लाहा (ईश्वर) सर्व श्रेष्ठ आहेत.)


 (२) " अशहदु -अल - ला- ई-लाह-ईल्लल्लाह....."

(अर्थात:- मी ग्वाही देतो की, अल्लाहा (ईश्वरा)च्या शिवाय कोणीही पुज्य नाही .)


" अशहदु -अल- ला- ई- लाह - ईल्लल्लाहा ...."

( अर्थात:- मी ग्वाही देतो की, अल्लाहा (ईश्वरा) च्या शिवाय कोणीही पुज्य नाही.)


(३)" अशहदु- अनन - मुहम्मद - अर - रसुलुल्लाहा ...."

(अर्थात:- मी ग्वाही देतो की , मुहम्मद - स्वल्लल्लाहा - अल्लाहा (ईश्वरा)चे प्रेषीत आहेत.)


 " अशहदु - अन न- मुहम्मद - अर - रसुल्लल्लाहा ....'

(अर्थात:- मी ग्वाही देतो की, मुहम्मद - स्वल्लल्लाहा अल्लाहा (ईश्वरा)चे प्रेषीत आहे.)


(४)    " हयया - अल-स-सलाह...."

अर्थात:- नमाज ( सलाहा ) कडे ..या )


" हयया - अल - स-सलाह....."

(अर्थात:- नमाज ( सलाह ) कडे या  )


(५)  " हयया - अल - फलाहा...."

(अर्थात:- सफलते -(कल्याणा) कडे  - या...)


" हयया -अल- फलाहा ....)

अर्थात :- सफलते -(कल्याणा) कडे ..या..)


(६) "अल्लाह हु - अकबर .... अल्लाहाहु - अकबर ..

     "अल्लाहा हु - अकबर ..... अल्लाहा हु - अकबर ..

(अर्थात;- अल्लाहा ( ईश्वर) सर्व श्रेष्ठ आहे ... अल्लाहा (ईश्वर) सर्वश्रेष्ठ आहे....)


(७) " ला- ई- लाहा - ईल्लल्लाहा...)

(अर्थात:- अल्लाहा ( ईश्वरा) शिवाय कोणीही पुज्य नाही....)


मदीनेच्या मस्जिद उंचवट्यावर जाउन .  भारदस्त  आवाजात आहिस्ता-आहिस्ता अल्लाहा ने दाखविलेल्या मंजुळ आवाजात आजान दिली ...हाच आजानचा ध्वनी संपूर्ण सृष्टी मधे जगातल्या सर्व शहरं, गल्ली, गावं, खेड्यां नी पाच(५) वेळा धुमधमत आहे..

ज्या  ज्या वेळेला आजान पुकारली जाते,  त्या प्रत्येक वेळा  जगात  निगेटिव्ह एनर्जी पसलेली असते .आशा वेळेस च आजान ही पॉझिटिव्ह एनर्जी पसरविण्याचे  महत्त्वाचे काम करीत असते .

जगात कुठेही काही आपादा आल्या उदाहरणार्थ :- नदीला पुर येवून पुर्ण गावं पाण्यात गेलं, भयानक दुष्काळी परिस्थिती , धरणीकंप वारंवार होत आहे , एखाद्या गावात काही विशिष्ट संकटं आली , महामारी , आशा वेळी गावातील मस्जिद मधे किंवा आप आपल्या घरावर जाउन " अजान पुकारले " जातात. ज्या गावात , खेड्यात , शहरात जेष्ठ नागरिकांना या गोष्टीचे ज्ञान, माहिती आहे ,  त्या त्या ठिकाणी जेष्ठ नागरिक तरुणांना " अजान पुकारण्यांस " सांगितले जाते ..करोना महामार्गामधे भारतात खुप विविध ठिकाणी खेड्यांत , शहरात " अजान पुकारले " गेली .हे सत्य परिस्थिती आहे..


प्रेषीत मुहम्मद स्व नी सांगितले की, " ज्या ज्या वेळी आजान चे ध्वनी उच्चारले जातील त्या त्या वेळी शंभर मिटर अंतरावरील  शैतान हा भितीने घाबरून पळून जातो. "

याचाच अर्थ असा  की , आपल्या मधे सकाळी सकाळी आलेली मरगळ ,आळस ,व नकारात्मक विचार , नकारात्मक स्वप्न . नकारात्मक एनर्जी .अजानच्या मंजुळ स्वरा(ध्वनी)ने सकारात्मक बदल घडवून आणुन मनाप्रमाणे प्रसन्ना येते ,

.एक आनंदी पहाट...उजेडत असते....


( मित्रांनो आपल्या मित्रांना आवश्य पाठवा कृपया खाडाखोड करु नका . प्रतिक्रिया अवश्य कळवा..)

डॉ सलीम सिकंदर शेख,  बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर


बेलापुर  (प्रतिनिधी  )-एका वर्षात गांवकरी मंडळाने स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला आहे.  ग्रामपंचायतीच्या शताब्दी वर्षानिमित्त गाव व वाड्या वस्त्यावर वेगवेगळ्या योजना राबविणार असुन गावाचा चेहरा मोहरा बदलवणार असल्याची ग्वाही गांवकरी मंडळाचे नेते जि प सदस्य शरद नवले यांनी दिली           गांवकरी मंडळाने एक वर्षाचा कार्यकाल पुर्ण केल्याबद्दल केलेल्या कामाचे मूल्यमापन त्या बाबत कार्यकर्त्यांच्या सूचना तसेच सोसायटी निवडणूकितील पराभवाचे विचारमंथन या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी नवले वस्तीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालींदर कुऱ्हे होते. जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले,की गावाचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन गांवकरी मंडळाचा उदय झाला विरोधकांच्या अनेक वावड्या उठत असतानाही बेलापुर ग्रामपंचायतीत मंडळाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कारभार केला आहे. कोरोना काळात ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच विनामूल्य कोवीड सेंटर सुरु करुन अनेक रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचे काम करता आले .गांवकरी मंडळावर नेत्याचा पूर्णपणे अंकुश असुन कुठल्याही चुकांची पुनरावृत्ती होवू देणार नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाही तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले गेले नाही. गावाला फील्टर पाणी देण्याचा आमचा मानस आहे तसेच तरुणांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन देण्याकरीता व अभ्यास करण्याकरीता स्वतंत्र इमारत उभारणार आहे.बेलापुर हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आधार गृपच्या माध्यमातून सामूहीक गट शेती करावयाची योजना असुन या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य हाती घेणार असल्याचे नवले म्हणाले.या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की गांवकरी मंडळाच्या विजयानंतर गावात एकही फ्लेक्स बोर्ड लावला नाही.दररोज एका नागरीकांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची नवी परंपरा सुरु केली. महानुभाव आश्रमाजवळीला रस्ता खूला केला,खटोड काँलनीतील गटारीचा रेंगाळलेला प्रश्न सोडवीला.राजकारणा पलीकडे जावुन गावाचा विकास करण्याचा आमचा मनोदय आहे बेलापुर सोसायटीत झालेला पराभव हा तांत्रीक कारणामुळे झालेला पराभव आहे आमचे सर्व सदस्य प्रामाणिकपणे काम करत असुन विरोधकांना देखील आरोप करण्याची संधी आम्ही दिली नसल्याचे खंडागळे म्हणाले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, सुनिल मुथा,रणजित श्रीगोड, देविदास देसाई विलास कुऱ्हे प्रमोद अमोलीक बाळासाहेब वाबळे, बाळासाहेब दाणी,लहानु नागले तंटामूक्ती अध्यक्ष  पुरुषोत्तम भराटे भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,बाळासाहेब दाणी,विलास कु-हे,मोहसीन सय्यद,प्रमोद अमोलिक,अकबर सय्यद, लहानु नागले,आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कनजीशेठ टाक, भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,यादव काळे,ग्रामपंचायत सदस्य तबसुम बागवान,मीना साळवी,उज्वला कुताळ,प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक,चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,रमेश काळे,शांतीलाल हिरण,प्रविण बाठीया,संजय बाठीया,पत्रकार दिलीप दायमा,किशोर कदम,वृद्धेश्वर कु-हे,रामदास वाबळे,गोरक्षनाथ कु-हे,मधुकर अनाप,सुरेश बोंबले,शाम मेहेत्रे,शशिकांत नवले,प्रकाश मेहेत्रे,प्रभाकर खंडागळे,अनिल कु-हे,संजय गोरे,सारंगधर खंडागळे,राकेश कुंभकर्ण, प्रशांत मुंडलिक,नितीन शर्मा,गोरख कुताळ,चंद्रकांत लबडे,प्रभात कु-हे,टिंकू राकेचा,लक्ष्मण राशिनकर,शहानवाज सय्यद,अशोक लबडे, सचिन वाघ,शफीक बागवान,दादासाहेब कु-हे,रवींद्र कुताळ,राजेंद्र कुताळ,अजीज शेख, श्रीहरी बारहाते,अल्ताफ शेख,बापू कु-हे,दादासाहेब कुताळ,रावसाहेब अमोलिक,शरद अंबादास नवले,राजेंद्र काळे,मास्टर हुडे,गोपी दाणी,भाऊसाहेब राक्षे,कुंदन कुताळ, अजय शेलार, बाळासाहेब शेलार,विजय हुडे,समीर जहागिरदार,नंदू शेलार,प्रभाकर ताके,जब्बार आतार,प्रतीक मुथ्था,रफिक शेख,रावसाहेब कु-हे,अक्षय दहिवाळ,नवाब सय्यद, रमेश लगे,सचिन हरदास,भिकाजी मेहेत्रे,समद सय्यद,जय संचेती,मंगेश नजन,विजय पोपळघट,अन्वर सय्यद,रमेश कुमावत,राम सोनवणे, विशाल आंबेकर,संदिप जाधव, अमोल गाडे,महेश कु-हे,सचिन जाधव,अक्षय गाढे,ऋषीकेश नवले,हरिष शेजुळ,सुभाष राशिनकर,दिपक पोपळघट,गणेश फुलभाटी,भाऊ नागले,नितीन पोपळघट,अनिस शेख,जयेश अमोलिक,आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते महेबुब ईमाम शेख यांची तर व्हा चेअरमन पदी सौ योगीता यमासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक संपन्न होवुन संक्रेश्वर जनसेवा शेतकरी विकासा अघाडीला अकरा जागा मिळाल्या होत्या तर  विरोधी संक्रेश्वर जनसेवा मंडळाला दोनच जागा मिळाल्या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी आर पी आगरकर यांनी चेअरमन  व व्हा चेअरमन निवडीकरीता बैठक बोलविली होती त्यात चेअरमन पदाकरीता एकमेव महेबुब ईमाम शेख यांचा अर्ज आला त्यांच्या नावाची सूचना बाबासाहेब जगताप यांनी मंडली तर भर्तरीनाथ सालबंदे यांनी त्यास अनुमोदन दिले व्हा चेअरमन पदाकरीता सौ योगीता यमासाहेब चव्हाण यांच्या नावाची सूचना राजु जगताप यांनी मांडली त्यास शशिकांत भोंगळे यांनी अनुमोदन दिले दोन्ही पदाकरीता एकेकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर पी आगरकर यांनी चेअरमन पदी महेबुब शेख तर व्हा चेअरमन पदी सौ योगीता चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव गीताराम काळे प्रकाश नलगे यांनी काम पाहीले या वेळी नुतन चेअरमन महेबुब शेख व्हा चेअरमन सौ योगीता चव्हाण संचालक बाबासाहेब जगताप भर्तरीनाथ सालबंदे त्रींबक जगताप राजेंद्र जगताप सौ. सिताबाई खेमनर ज्ञानदेव होन बाळासाहेब चोखर पत्रकार देविदास देसाई शशिकांत भोंगळे पंढरीनाथ जगताप जालींदर चव्हाण आदि संचालक उपस्थित  होते   निवडीनंतर संक्रेश्वर मंदीरात दर्शन घेवुन चेअरमन व्हा चेअरमन व सर्व संचालकांना रथात बसवुन फटाक्याच्या अतिषबाजीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सोसायटी स्थापनेपासून आजपर्यंत निघालेली ही पहीली अभूतपूर्व मिरवणूक होती अनेक जण गट तट विसरुन या मिरवणूकीत सहभागी झाले होते .या वेळी माजी चेअरमन नबाजी जगताप माजी सरपंच संजय जगताप कल्याणराव जगताप अन्सार शेख कादर शेख मिलींद बोरावके रोहीदास खपके बाळासाहेब हरिश्चंद्रे भास्कर महाराज पागीरे सुभाष दाते चंद्रभान जगताप  रज्जाक शेख पिरन शेख द्वारकनाथ चव्हाण प्रकाश बोरावके राजु बोरावाके प्रभाकर चव्हाण कादर शेख मिलींद बोरावके जावेद सय्यद गोकुळ सालबंदे दादासाहेब जगताप बाजीराव जगताप आनदा बर्डे संभाजी जाधव आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेवटी रामराव होन यांनी आभार मानले राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ जायभाय व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget