Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी - 
भीम आर्मी भारत एकता मिशन चे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे साहेब, महाराष्ट्र प्रभारी दत्तू मेढे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे साहेब, महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दिपकजी भालेराव साहेब यांच्या आदेशानुसार भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मा. पँथर ऋषी पोळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत.भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचा विषय असा होता कि, _रोहन माळवदकर_ या मनुवादी लेखकाने "वास्तव" या पुस्तकात _भिमाकोरेगाव चा खोटा इतिहास लिहिला आहे. तसेच ब्राम्हण महासंघाने हि पुस्तके फुकट वाटू अशी बुरसटलेल्या विचारसरणीची मानसिकता दाखवली._  त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाचे असल्यामुळे सदरच्या घटनेचा निषेध म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काळी फीत लावून दिनांक 30/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता  निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार तसेच श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या अटीनुसार मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचे आंदोलन करण्यात आले.यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दीपकजी भालेराव साहेब, स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पँथर ऋषी पोळ साहेब, महाराष्ट्र सदस्य गौरव भालेराव, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख, राहाता तालुकाध्यक्ष सुनील भाऊ मोकळ, राहाता तालुका संघटक शब्बीर भाई कुरेशी, स्टुडंट्स फेडरेशन राहाता तालुका संघटक साहिल गायकवाड,विश्वदीप सोनवणे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.




इच्छा होती मात्र वेळ नव्हता, ध्वजारोहन करणे हे कर्तव्य.
श्रीरामपूर प्रतिनिधी - पालिकेच्या ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा अट्टहास का?राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्य भरातील नगरपालिकासह याही नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या ज्या ठिकाणच्या  नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. अशा नगरपालिकांची सूत्रे प्रशासकांनी हाती घेतले आहेत. २६ जानेवारी २०२२ रोजी आपल्या हस्ते शहर आणि तालुक्यात ठीकठिकाणी ध्वजारोहणासह इतरही अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित अशी होती. पालिकेतील ध्वजारोहणाचे आपणास कोणत्याही प्रकारचे मुख्य अधिकाऱ्यांकडून उपस्थित राहण्या संदर्भातले निमंत्रण नव्हते. असे असले तरी नगरपालिका ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला . मात्र शहरातील संत लूक हॉस्पिटल मधील ध्वजारोहन हे आपल्या हस्ते पूर्वनियोजित असे होते. ते टाळणे अपरिहार्य असे होते. आणि पालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहिले पाहिजे असा काही नियम नाही,त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा अट्टहास का?असा सवाल करून नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या,

खरेतर प्रजासत्ताक दिन हा सर्व स्तरातील सर्वांचाच असतो आणि एकाच वेळी सर्व त्याठिकाणी ध्वजारोहणास जाता येणे शक्य नाही. जो तो आपापल्या मर्जीनुसार आणि निमंत्रनानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. त्याचा सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे.  शासकीय ध्वजारोहनासह काँग्रेस भवन आणि संत लूक हॉस्पिटल या ठिकाणचे ध्वजारोहण करण्यास संदर्भातले निमंत्रण मला असल्या कारणाने अगोदर या ठिकाणी मी ध्वजारोहण केले आहे. इच्छा असूनही आपण मात्र  नगरपालिकेच्या ध्वजारोहणास उपस्थित राहू शकलो नाही. वेळेचे बंधन असल्याकारणाने  सर्व ठिकाणचे ध्वजारोहण करण्यासाठी एकाच वेळी उपस्थित राहता येत नाही. असे श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा आणि साईबाबा संस्थांनच्या विद्यमान विश्वस्त अनुराधा ताई आदिक यांनी म्हटले आहे. 



श्रीरामपूर : २६ जानेवारीला डॉ बाबसाहेबांनी लिहलेल्या संविधानाच्या माध्यमातून, सर्व देशवासियांना विचार स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्य मिळाले. मात्र ज्या संविधनामुळे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली,अशा श्रीरामपूर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक यांना, पालिकेत प्रशासक येताच, शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पाठ फिरवल्याचे लक्षात आलेने, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा यांना पालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचा विसर पडल्या संदर्भात बातमी लावल्याचा राग अनावर झाल्याने, एका वृत्तपत्राचे संपादक असलेल्या स्वर्गीय खासदार गोविंदरावजी आदिक यांच्या कन्येने, तुम्ही पत्रकार आमच्या विरोधात पैसे घेऊन खोट्या बातम्या लावतात ? आम्हाला इतर कामे नाहीत का ,पालिकेच्या ध्वजारोहणास जायला आम्ही रिकामी टेकडे आहे का ? अशा शब्दांचा वापर करून, जवळपास १५० ते  २०० लोकांच्या जमवा समोर आरेरावीची भाषेत एस न्यूज मराठी ,चौफेर कानोसा या प्रसार माध्यमांमध्ये, व्यवस्थापकीय संपादक पदावर काम करत असलेल्या पत्रकारा समोर, सर्व पत्रकारांचा अपमान केल्याची निंदनीय घटना घडली. या घटनेच्या निषेध नोंदवित ग्रामीण पत्रकार महासंघाच्या वतीने, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपविभागीय प्रांताधिकारी अनिल पवार ,तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर यांना निवेदन देऊन,भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा अपमान करत, पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यायावी अशी मागणी केली असून. जर तत्कालीन राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास संघटनेच्या वतीने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा,ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी दिला असून, त्यामुळे निर्माण होणारी संभाव्य परिणाम व परिस्थितीस , राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक या वैयक्तिक व संयुक्तिक रित्या जबाबदार राहातील असेही जाहीर केलं आहे. या आंदोलना वेळी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख किरण शिंदे, साईकिरण टाइम्सचे राजेश बोरुडे, तिरंगा न्यूजचे अस्लम बिनसाद, एस ९ न्यूजचे युनूस इनामदार, स्वप्नील सोनार, लोकमतचे भरत थोरात, व्हिजन प्लसच्या सायरा सय्यद, एस न्यूज च्या मनीषा थोरात, अविनाश लिहणार, पत्रकार विठ्ठल गोरणे, आदी उपस्थित होते.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस कर्मचारी हरिभाऊ मांडगे (वय 40, रा. पिंपरी गवळी, ता. पारनेर) यांनी शनिवारी (दि. 29) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.हरिभाऊ मांडगे यांच्यावर कौटुंबिक वादातून 2018 आणि 2022 मध्ये दोन गुन्हे सुपा (ता. पारनेर) पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

श्रीरामपूर प्रतिनिधी-अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.  राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी  राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट  4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन अहमदनगर पोलिसांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dy.s.p. संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करतअसताना हा गुन्हा फौजदारी कट रचून करण्यात आल्याचे  निष्पन्न झाल्याने भारतीय दंड संहिता कलम 120( ब) आणि गुन्हा करून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्यावरून भारतीय दंड संहिता कलम 201 कलमाप्रमाने वाढीव कलमे  लावण्यात आली.आज रोजी Dy.s.p  संदीप मिटके यांनी खालील आरोपीताना विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी तीन दिवसांची  वाढीव पोलीस कोठडी सुनावली.1) सागर भांड (टोळी प्रमुख),2) निलेश संजय शिंदे (टोळी सदस्य)3) गणेश रोहिदास माळी  (टोळी सदस्य) 4) रमेश संजय शिंदे (टोळी सदस्य)या गुन्ह्यातील आरोपींनी राहुरी येथील दुय्यम कारागृह चे गज कापून पलायन केल्यामुळे PI इंगळे सह अन्य सहा पोलीस निलंबित करण्यात आलेले आहेत. पोलिस त्या दोन आरोपींचा शोध घेत आहेत.सरकारी पक्षातर्फे   ॲड.  दिवाने व Dy.s.p  संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद  केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून  आरोपीस तीन दिवसाची  वाढीव पोलीस कोठडी दिली.आरोपीच्या बाजूने ॲड. बाफना  व ॲड. सरिता साबळे यांनी काम पाहिले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-शासनाने वाईन विक्रीला खूलेआम परवानगी दिली असुन यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पा यांनी केली आहे    आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे बेलापुर  कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या उद़्घाटनासाठी आले असता पत्रकारांनी वाईनला परवानगी या विषयावर छेडले असता आमदार राधाकृष्ण  विखे पा. म्हणाले की वाईन व दारु ही शारिरीक दृष्ट्या योग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगणे या सारखे दुर्दैव कोणते आहे .दारु असो की वाईन  शेवटी ती शरिराला घातकच आहे तरी देखील या शासनाने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची दाट शक्यता आहे या शासनाने लोकांच्या भावनेशी खेळण्याचा उद्योग सुरु केलेला आहे लोकांची श्रद्धास्थाने असणारी मंदीरे बंद करुन मदीरालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन या सारखे दुर्दैव ते कोणते ?असा सवाल करुन आमदार विखे पा .म्हणाले की या अघाडी सरकारने कुणालाच न्याय दिलेला नाही .शेतकरी उद्योजक व्यवसायीक कोवीडमुळे बेरोजगार झालेले नागरीक यातील कुणालाच दिलासा देवू शकलेले नाही आता किराणा दुकानात वाईनला परवानगी देवुन काय साध्य केले केवळ संबधीतांशी हातमिळवणी करुन यात मोठा भ्रष्टाचार झाला असावा त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अशी भाजपाची मागणी असल्याचेही आमदार राधाकृष्ण विखे पा .यांनी सांगितले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-राजुरी जवळ विजेच्या तारा तुटल्यामुळे खंडीत झालेला विज पुरवठा सुरळीत करत असताना दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असुन दैव बलवत्त म्हणून दोघेही कर्मचारी थोडक्यात वाचले. बेलापुरला विज पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा राजुरी ममदापुर येथे तुटल्यामुळे बेलापुरगाव व परिसराचा विज पुरवठा खंडीत झाला होता बेलापुर महावितरणचे उपअभियंता मिलींद दुधे महावितरणचे चेतन जाधवा मधुकर औचिते स्वप्निल पाटील रविंद्र रौंदळ संदीप वायदंडे गणेश थोरात भोकरे पवार मनवर हे सर्व जण राजुरी येथे शेतात तुटलेल्या तारा ओढण्याचे काम करत होते चेतन जाधवा व अनिल दौंड हे अकरा मिटर उंच असलेल्या पोलवर बसुन तारा जोडण्याचे काम करत असतानाच त्यातील एक क्रॉस आर्म तुटल्याने शेजारी चेतन जाधव व अनिल दौंड यांनी प्रसंगावधान राखल्याने किरकोळ जखमी झाले. चेतन जाधव यांच्या बोटाला जखम झालेली आहे तर अनिल दौंड यांच्या तोंडाला जखम झालेली आहे उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने खाली उतरविले व प्राथमिक उपचार केले .या ही परिस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम करुन रात्री दोन वाजता विज पुरवठा सुरळीत केला .आपला जिव धोक्यात घालुन हे कर्मचारी आपल्याला विज देण्याचे काम करत असतात ते उंच पोलवर चढुन विज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत असताना आपण वेळोवेळी लाईट केव्हा येईल हे विचारण्यासाठी केलेल्या फोनमुळे त्यांच्या कामात किती व्यत्यय येत असेल याची कल्पनाच केलेली बरी असाच अनुभव काल महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget