पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे सर्वच ध्वजारोहन करणे अशक्य- अनुराधाताई आदिक.
इच्छा होती मात्र वेळ नव्हता, ध्वजारोहन करणे हे कर्तव्य.
श्रीरामपूर प्रतिनिधी - पालिकेच्या ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा अट्टहास का?राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्य भरातील नगरपालिकासह याही नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या ज्या ठिकाणच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. अशा नगरपालिकांची सूत्रे प्रशासकांनी हाती घेतले आहेत. २६ जानेवारी २०२२ रोजी आपल्या हस्ते शहर आणि तालुक्यात ठीकठिकाणी ध्वजारोहणासह इतरही अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित अशी होती. पालिकेतील ध्वजारोहणाचे आपणास कोणत्याही प्रकारचे मुख्य अधिकाऱ्यांकडून उपस्थित राहण्या संदर्भातले निमंत्रण नव्हते. असे असले तरी नगरपालिका ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला . मात्र शहरातील संत लूक हॉस्पिटल मधील ध्वजारोहन हे आपल्या हस्ते पूर्वनियोजित असे होते. ते टाळणे अपरिहार्य असे होते. आणि पालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहिले पाहिजे असा काही नियम नाही,त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा अट्टहास का?असा सवाल करून नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या,
खरेतर प्रजासत्ताक दिन हा सर्व स्तरातील सर्वांचाच असतो आणि एकाच वेळी सर्व त्याठिकाणी ध्वजारोहणास जाता येणे शक्य नाही. जो तो आपापल्या मर्जीनुसार आणि निमंत्रनानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. त्याचा सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. शासकीय ध्वजारोहनासह काँग्रेस भवन आणि संत लूक हॉस्पिटल या ठिकाणचे ध्वजारोहण करण्यास संदर्भातले निमंत्रण मला असल्या कारणाने अगोदर या ठिकाणी मी ध्वजारोहण केले आहे. इच्छा असूनही आपण मात्र नगरपालिकेच्या ध्वजारोहणास उपस्थित राहू शकलो नाही. वेळेचे बंधन असल्याकारणाने सर्व ठिकाणचे ध्वजारोहण करण्यासाठी एकाच वेळी उपस्थित राहता येत नाही. असे श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा आणि साईबाबा संस्थांनच्या विद्यमान विश्वस्त अनुराधा ताई आदिक यांनी म्हटले आहे.