ATM फोडणारी टोळी गुन्ह्यातील आरोपी कोतवाली पोलीसांकडून २४ तासात जेरबंद.
अहमदनगर- शहरातील माळीवाडा परिसरातील एसबीआय बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे तिघांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. सनि सुरजसिंग भोंड, चिक्या उर्फ रोहीत निवृत्ती मेहेत्रे व सोनु सुरजसिंग भोड अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि विवेक पवार, पोसई मनोज महाजन,सफौ मुनफन, चापोहेकाँ सतिष भांड, चासफौ अस्लम पठाण, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना योगेश कवाष्टे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना मुकुंद दुधाळ, पोकाँ अभय कदम, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राऊत, पोकाँ अतुल काजळे, पोकाँ याकुब सय्यद, पोकाँ संदीप थोरात, पोकाँ कवळे, पोकाँ केकान, पोकाॅ कैलास शिरसाठ, मपोकाॅ पुनम नरसाळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि १३ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११.३० वा च्या सुमारस पोलीस नियंत्रण कक्ष येथून वायरलेसव्दारे कॉल आला, माळीवाडा वेस येथील एसबीआयचे एटीएम हे कोणी तरी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार वायरलेस ड्युटी करीता असलेल्या मपोकाँ पुनम नरसाळे यांनी तात्काळ सदरचा संदेश पोलीस स्टेशनचे व्हाट्सअॅप ग्रुपवर प्रसारीत केला. संदेश मिळताच पोनि संपतराव शिंदे यांनी तात्काळ सदर ठिकाणी रवाना होणे बाबत आदेश दिले. तेथे कोतवाली पथकाने तात्काळ ठिकाणी जाऊन पाहणी करता आरोपी सनि सुरजसिंग भोंड (वय २५ वर्ष रा संजयनगर काटवन खंडोबा अहमदनगर) हा SBI एटीएम मशीनचा खालील भाग हाताने ओढताना मिळून आला, त्यास जागीच ताब्यात घेतले. तसेच फरार आरोपी यांचा गुन्हे पथकातील कर्मचारी यांनी शोध घेतला असता चिक्या उर्फ रोहीत निवृत्ती मेहेत्रे (वय २५ वर्ष रा माळीवाडा हाजी सुलेमान गल्ली अहमदनगर), सोनु सुरजसिंग भोड (वय २२ वर्ष रा संजयनगर काटवन खंडोबा अ.नगर) हे मिळून आले आहेत. या घटनेबाबत पोना योगेश कवाष्टे यांनी दिलेल्या फियादी वरुन गुन्हा रजि क्रं ३७/२०२२ भादवि ३७९,५११,४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास पोना गणेश धोत्रे हे करीत आहेत.