Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर येथे नव्याने रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नानासाहेब बच्छाव यांची भेट घेऊन त्यांच्या आगमनाचे स्वागत करून महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री बरकत आली शेख यांच्यासमवेत पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार व तिरंगा न्यूज चैनल चे संपादक असलम बिनसाद आदींनी श्री नानासाहेब बच्छाव यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली असुन या प्रकरणाशी खटोड बंधुचा कुठलाही संबध नसुन त्यांचेवर दाखल झालेला खोटा मागे घेण्यात यावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे केली आहे.या बाबत बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मयत सुनिल गायकवाड याने काही महीन्यापूर्वी खटोड यांच्याकडे झाडे लावण्यासाठी खोदकाम करण्याचे काम घेतले होते त्या वेळी खोदकाम करताना काही प्रमाणात चांदीची नाणी सापडली होती ती रितसर काऱ्यवाही करुन तहसीलदार यांच्या ताब्यात देण्यात आली होती या बाबत विनाकारण वावड्या उठविण्यात आल्या होत्या मयत गायकवाड याने गळफास घेवुन आत्महत्या केली त्या वेळी घरी कुणीही नव्हते त्याचे पती पत्नीमध्ये वाद झाल्यामुळे पत्नी माहेरी गेलेली होती घरी कुणीही नसताना त्याने कौटुंबिक वादातुन आत्महत्या केली असावी परंतु काही बाहेर गावच्या पुढाऱ्यांनी व पत्रकारांनी या प्रकरणास वेगळे वळण देवून खटोड बंधुवर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले ते गुप्तधन तहसीलदार यांच्या ताब्यात दिल्यानंतरही मयत गायकवाड याने प्रतिज्ञापत्र करुन दिले होते त्या नंतर मयत सुनिल गायकवाड व खटोड बंधुचा कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष अथवा फोनद्वारे संपर्क आलेला नाही गायकवाड याच्या आत्महत्येशी खटोड बंधु किंवा त्या गुप्तधनाचा कोणताही संबध नाही मयत सुनिल याने सुसाईड नोटही लिहलेली नाही त्यामुळे त्याच्या आत्महत्येशी खटोड बंधुंचा कुठलाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबध नाही मयत सुनिल गायकवाड याने या बाबत पोलीसांना कसलाही तक्रार अर्ज दिलेला नाही गावातील शांतता भंग व्हावी या करीता बाहेरील काही पुढाऱ्यांनी मयताच्या पत्नीला खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले असुन या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन खोटा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा आम्हाला सनदशिर मार्गाने आंदोलन करावे लागेल असेही निवेदनात म्हटले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांना  निवेदन देताना सुनिल मुथा सुधीर नवले अँड शरद सोमाणी  भरत साळूंके अजय डाकले अशोक पवार जावेद शेख शेषराव पवार ज्ञानदेव वाबळे जाकीर शेख प्रकाश जाजू प्रसाद खरात प्रशांत लढ्ढा शांतीलाल हिरण दत्ता कुऱ्हे उपस्थित होते.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-अमृतवाहिनी प्रवरा नदीस यंदाच्या पावसाळ्यात पहिलेच पाणी आले.  बेलापूरच्या गावकरी मंडळ व ग्रामस्थांनी प्रवरामाईचे जलपूजन करुन आपला आनंद व्यक्त केला.प्रवरा नदिच्या पाण्यावर बेलापूर पंचक्रोशीतील शेती व बाजारपेठ अवलंबून आहे.भंडारदरा व निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदिला पाणी येते.यंदा सप्टेंबर महिना सुरु होवूनही नदी वाहती न झाल्याने चिंतेचे वातावरण होते.माञ वरुणराजाच्या कृपेने धरणांच्या पाणलोटात मुसळधार पाऊस होवून धरणे भरली आणि प्रवरा नदिला यंदा पहिल्यांदाच पूर आला.                          प्रवरेला पाणी आल्याचे समजताच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.गावकरी मंडळ व  ग्रामस्थांनी प्रवरेला आलेल्या पाण्याचे पूजन केले.बेलापूरचे माजी उपसरपंच प्रकाश नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,पत्रकार देविदास देसाई अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कु-हे,तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे आदिंची भाषणे झाली.

याप्रसंगी शरद नवले,रणजित श्रीगोड,जालिंदर कु-हे,महेंद्र साळवी,अभिषेक खंडागळे, शरद देशपांडे, साहेबराव वाबळे,इस्माईल शेख,भाऊसाहेब कुताळ, भास्कर बंगाळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,देविदास  देसाई,नवनाथ कुताळ,दिलीप दायमा,सुहास शेलार,किशोर कदम,पुरुषोत्तम भराटे,चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,शफिक बागवान,बाळासाहेब दाणी,शांतीलाल हिरण,भरतलाल सोमाणी,रावसाहेब अमोलिक, विशाल आंबेकर,महेश कु-हे,सचिन वाघ,राजेंद्र वारे,जमशेद पटेल, अन्वर सय्यद,सतिश व्यास,तस्वर बागवान,श्रीहरी बारहाते,संजय रासकर,अजीज शेख,बाळासाहेब शेलार,अल्ताफ शेख,शफीक आतार,रफिक शेख,रोहित शिंदे,युनूस आतार,मारुती गायकवाड,अन्सार पटेल,विनायक जगताप,मोकाशी दादा,अशोक शेलार,बाबा शेख,विजय हुडे,लहानू नागले,जिना शेख,दादासाहेब कुताळ, जाकीर हसन शेख, बाबूलाल पठाण,जब्बार आतार,दिलीप अमोलिक, कुंदन कुताळ,सुरेश अमोलिक,सिकंदर पठाण,मोहन सोमाणी,सागर ढवळे,निसार बागवान,संजय गोरे,निसार नालबंद,मच्छिंद्र खोसे,सुभाष शेलार,प्रशांत मुंडलिक,मास्टर हुडे,सद्दाम आतार,साईनाथ शिरसाठ,गणेश बंगाळ, अकबर सय्यद, किरण गागरे,अकिल पटेल,सौरभ कापसे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील मूळ उक्कलगाव येथील व सध्या शहरातील कांदा मार्केट  परिसरात राहणार्‍या अक्षय अनिल पावसे या 25 वर्षीय भावी डॉक्टरने अशोकनगर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र कळू शकले नाही.काल सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अशोकनगर परिसरात एका एक्सपे्रस रेल्वे खाली तरुणाने आत्महत्या केली होती. या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे आणला असता त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली. अक्षय तालुक्यातील उक्कलगाव येथील राहणारा असून सध्या तो कांदा मार्केट परिसरात राहत होता. हा तरुण मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील अनिल पावसे यांची लॅब आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अक्षयच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी अकरा लाख रुपये देण्याचे अश्वासन देवून नकार दिला तसेच मानसिक व शारिरीक छळ केल्याचा आरोप गुप्त धन खोदकाम करणारा मयत सुनिल गायकवाड याच्या पत्नीने केल असुन त्याच्या तक्रारीवरुन पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बेलपूरातील दोन खटोड बंधुवर गुन्हा दाखल केला आहे. या बाबत गुप्तधनाचे खोदकाम करणारा मजुर मयत सुनिल गायकवाड याची पत्नी वंदना सुनिल गायकवाड हीने श्रीरामपुर शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की वट पौर्णिमेच्या दिवशी माझे पती सुनिल गायकवाड हे दोन मजुरांना सोबत घेवुन राजेश व हनुमंत खटोड यांचे घराचे मागील बाजुस मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी मजुरीने खड्डे खोदण्याच्या कामासाठी गेले होते ते काम संपवून घरी आल्यानंतर मला सांगितले की हनुमंत खटोड यांचे घराचे मागील बाजुस झाडे लावण्यासाठी खड्डा खोदत असताना एक तांब्याचा हंडा सापडला त्यात वर चांदी व खाली सोने होते हंडा पुर्णपणे भरलेला होत खड्डा खोदताना हंड्याला धक्का लागला त्यामुळे त्यातील नाणी खाली पडली त्या नाण्यांना हात न लावता ती फावड्याच्या सहाय्याने पुन्हा हंड्यात टाकली त्या नंतर राजेश व हनुमंत खटोड यांना सांगितले की खोदकाम करताना हंडा सापडला आहे ते दोघेही तेथे आहे त्यातील सोने व चांदीची नाणी पाहून राजेश व हनुमंत खटोड यांनी सांगितले की तुला सदरील हंडा सापडल्याचे कुणालाही सांगु नको तुला अकरा लाख रुपये दैतो पैकी एक लाख २८ हजार रुपये रोख दिले या घटने नंतर माझे पती सुनील गायकवाड हे त्यांनी दिलेल्या अश्वासनामुळे राहीलेले दहा लाख रुपये मागण्यासाठी वेळोवेळी राजेश व हनुमंत खटोड यांचेकडे गेले त्या त्या वेळेस राजेश व हनुमंत खटोड यांनी माझे पतीला पैसे न देता शिवीगाळ करुन मारहाण केली हा प्रकार पतीने घरी आल्यानंतर मला सांगीतला त्या नंतरही त्या दोघांना वेळोवेळी पैसे मागीतले असता त्यांनी माझे पतीला धमकी दिली की आमचेकडे भरपुर पैसे आहेततुला कोठेही कामधंदा करु देणार नाही तुला काम मिळू देणार नाही तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणून भिक मागायला लावू असे म्हणून पतीला धमकी दिली त्या नंतर पतीने घरी आल्यानंतर सर्व काही सांगितले तेव्हापासून माझे पती घरी कुणा सोबतही बोलत नसत सदरील लोकांना घाबरुन घरातच बसुन रहात असे सदरील गुप्त धनाचा गावभर बोभाटा झाल्याने तहसीलदार यांनी त्या गुप्तधनाचा पंचनामा करुन ते जप्त केले त्या नंतर जेव्हा जेव्हा राजेश खटोड व माझे पतीची भेट झाली त्या त्या वेळेस राजेश खटोड माझे पतीला म्हणायचा तुझ्यामुळे आम्हाला आमचे वडीलोपार्जित धन शासनाला जमा करावे लागले तुच ही बातमी सर्वांना सांगीतली तुला आता तुझी अवकात दाखवीतो असे म्हणून पतीला शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिला होता सदरील बाब ही माझे पती घरी आल्यानंतर मला सांगीतली तेव्हापासून माझे पती खूप मानसिक तणावाखाली जिवन जगत होते त्यांना खटोड यांची खुप भिती वाटत होती त्याच भितीपोटी व त्यांचे मानसिक शारिरीक छळाला कंटाळून माझे पती सुनिल गायकवाड यांनी आत्महत्या केली असुन माझ्या पतीच्या मृत्यूस खटोड हेच जबाबदार असल्याचे वंदना गायकवाड हीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे तिच्या तक्रारीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला राजेश व हनुमंत खटोड यां दोघावर भादवि कलम ३०६ ,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यत आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हे करतआहे.

शिर्डी ( प्रतिनिधी) येथील श्री साईनाथ रुग्णालय येथे सेवेत असताना आपल्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्या खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या येथील  डॉक्टर अमित नाईकवाडी यांचा भांडाफोड दैनिक साई दर्शन च्या टीमने स्टिंग ऑपरेशन करून केला आहे, श्री साईबाबा संस्थान व खुद्द साईबाबानाही आर्थिक फायद्यासाठी फसवणाऱ्या या डॉक्टरांवर श्री साई संस्थान प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे , अशा मागणीचे सर्व पुराव्यानिशी निवेदन दैनिक साई दर्शन च्या वतीने श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व श्री साईबाबा संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे,
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,शिर्डीत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे दोन अद्ययावत रुग्णालये, नागरिक आणि साई भक्तांच्या सेवेसाठी सुसज्ज आहेत. परंतु या रुग्णालयातील काही डॉक्टर मंडळींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रुग्णांच्या जीवाशी अत्यंत बेजबाबदारपणे खेळ चालविला असून त्याबाबत असंख्य तक्रारी दैनिक साईदर्शन कडे प्राप्त होत असतानाही  श्री साईबाबा संस्थानची बदनामी होईल अथवा चुकीचा संदेश बाहेर भक्तांना अथवा नागरिकांना जाईल या एकाच कारणामुळे  आजवर त्या तक्रारींकडे दैनिक साई दर्शन कडून कानाडोळा करण्यात आला. मात्र हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला आहे, एका डॉक्टरांनी तर मोठा कळसच केला आहे,
 अश्या या डॉक्टरच्या  एकाच दिवसात दोन तक्रारी साई दर्शन कडे येऊन संबंधित रुग्णाची नातेवाईक असलेली व्यक्ती न्यायाची अपेक्षा दैनिक साई दर्शन कडे करत होती, त्या अनुषंगाने सदर प्रकरणी खरे काय ते शोधण्याचा प्रयत्न दैनिक साईदर्शनने केला असता धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्याने या संपूर्ण प्रकरणी दैनिक साईदर्शनच्या टीम सह स्टिंग ऑपरेशन करत सदर प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
संबंधित डॉक्टर अमित नाईकवाडी हे येथील साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ म्हणून म्हणून सेवा बजावतात, त्याबद्दल मानधनही घेतात,आणि या रुग्णालयात कोणतेही वैद्यकीय उपकरणे व साधनांची कमी नसतांनाही या रुग्णालयात ऑपरेशन साठी आलेल्या रुग्णांना  मात्र कोपरगाव हद्दीत नवीन झालेल्या हॉस्पिटलला ऑपरेशन करा , मी स्वतः ऑपरेशन तेथे करतो,असे हे डॉक्टर सांगत असल्याचे निदर्शनास आले, म्हणजे हे महाशय डॉक्टर साईबाबा संस्थान मध्ये मानधन घेऊन  अस्थिरोग तज्ञ म्हणून काम करतात, मात्र येथे काही रुग्णांची शस्त्रक्रिया संस्थांनच्या रुग्णालयात करण्याऐवजी कोपरगाव येथील एका नवीन हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करून देतो, असे सुचवतात, हे साईबाबांना किंवा साई संस्थानला फसवण्याचा प्रकार नाही का? असा सवाल करण्यात येत आहे, यासंदर्भात साईनाथ रुग्णालयात चौकशी केली असता येथील वैद्यकीय अधीक्षकाकडून  काल दिनांक१३ सप्टेंबर 20 21 सोमवार रोजी डॉक्टर नाईकवाडी हे वैद्यकीय कारणाने एक दिवसीय रजेवर असल्याचे कळाले , त्यांनी तसा मोबाईलवर सकाळी मेसेज केल्याचेही सांगण्यात आले,त्यानंतर आम्ही  डॉक्टर नाईकवाडे यांना कॉल केला असता त्यांनी मात्र मी 8 दिवस रजेवर असून संस्थान रुग्णालयात कोणतेही ऑपरेशन करू शकत नाही, असे स्पष्ट सांगितले. मग आम्ही स्वतः आम्हाला माहिती मिळाल्या नुसार हे खरच आजारी आहेत की दुसऱ्या दवाखान्यात रुग्णांची शस्त्रक्रिया करत ,काम करत आहेत हे तपासण्या साठी कोपरगाव येथील त्या हॉस्पिटल मध्ये खात्री करण्यास गेलो असता हे डॉक्टर नाईक वाडी त्या हॉस्पिटल मधेच एका रुग्णाचे ऑपरेशन करत असल्याचे आम्हाला दिसून आले, येथे केसपेपर वर औषधे सुद्धा त्यांनी स्वहस्ताक्षरात ऑपरेशन थेटर मधून बाहेर येऊनत्यांच्या सही निशी लिहून दिली आणि आम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केली आहे, त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितले की, मला सर्दी असल्याने साईनाथ रुग्णालयात ऑपरेशन करू दिले जात नाही म्हणून मी इथे शस्त्रक्रियेसाठीआलो आहे, याचा अर्थ साई संस्थानच्या रुग्णालय प्रशासनालाही फसवुन हे डॉक्टर महाशय येथे शस्त्रक्रिया करत होते, हे उघड झाले आहे,अश्या पद्धतीने रुग्णांच्या ऑपरेशनची तारीख  साईनाथ रुग्णालयात असताना हे महाशय दुसऱ्या खाजगी रुग्णालयात त्या रुग्णाला बोलावत असतील, आपल्या आर्थिक फायद्यासाठी जर संस्थान रुग्णालय सोडून इतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतील, तेथे शस्त्रक्रिया करीत असतील तर या डॉक्टरांच्या वतीने श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात सेवेवर येतांना जे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे ,त्याचे उल्लंघन होत नाही का? कारण संस्थान रुग्णालय प्रशासनाच्या नियमाप्रमाणे जर डॉक्टर साई संस्थान रुग्णालयात काम करत असेल तर इतर दवाखान्यात त्यांना काम करण्यास मनाई आहे असे असताना या डॉक्टर महाशयांनी मात्र ते तर केलेच आहे ,पण संस्थान रुग्णालयातील रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात बोलावुन तेथे शस्त्रक्रिया करतो असे सांगणे म्हणजे साई संस्थान प्रशासनाला फसवण्याचा प्रकार हा नाही का? या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अश्या डॉक्टर पेशाला काळीमा फासणाऱ्या पांढऱ्या कपड्यातील काळा हेतू ठेऊन काम करणाऱ्या लोकांना योग्य आणि कठोर शासन झाले पाहिजे अशी दैनिक साईदर्शन प्रमाणेच असंख्य साईभक्त, ग्रामस्थ, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांची मागणी असून  सदर प्रकरणी संस्थान प्रशासनाने  लक्ष घालून डॉक्टर अमित नाईकवाडे यांना कठोर शासन करून सेवेतून बडतर्फ करावे, जेणेकरून अश्या प्रकारे श्री साईबाबा संस्थान प्रशासनाची आणि पर्यायाने साईबाबांची पैशांच्या लालसेपोटी फसवणूक करणाऱ्या लोकांना चाप बसविणे अत्यंत गरजेचे झाले आहे, ह्या डॉक्टरांना तातडीने कठोरात कठोर शासन करून सेवेतून बडतर्फ करावे, साईंच्या रुग्णालयात होणाऱ्या ह्या अशा डॉक्टरांच्या अनागोंदीला आळा बसवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे दैनिक साई दर्शन च्या वतीने श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व श्री साईबाबा संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत यांना ही प्रत्यक्ष भेटून केली  आहे, त्यांनीही या निवेदनानंतर यासंदर्भात लवकरच लवकर चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन यावेळी दिले आहे, दरम्यान या प्रकरणामुळे या डॉक्टर महाशया बद्दल शिर्डी व परिसरातील ग्रामस्थ व संपूर्ण साई भक्तांमध्ये मोठी चर्चा होत आहे व या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी ही साई भक्त व ग्रामस्थांनी केली  आहे,

श्रीरामपूर - तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पोलीस उपनिरीक्षक अधिकारी संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली, गणेशोत्सवा निमित्त राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गतील, त्याच बरोबर पोलीस निरीक्षक साळवे यांना ,मिळालेल्या गुप्ता माहितीच्या आधारे, आरोपी दत्तु सावळेराव पवार वय वर्षे २९ यास, राहता तालुक्यातील रांजणगाव या ठिकाणाहून, सापळा रचून ताब्यात घेतले असता, आरोपी दत्तु पवार याच्या कडून बजाज कंपनीच्या ३, हिरो होंडा कंपनीच्या ८, टिव्हीएस स्टार कंपनीची १, अशा एकूण ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आल्या असून. यापूर्वी आरोपी दत्तु पवार याच्या विरुद्ध राहता पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल असून, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १२ गाड्यांसह एकूण १८ गुन्हे उघडकीस येणार असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. दुचाकीतील सराईत गुन्हेगारा विरुद्ध, करण्यात आलेली कारवाई, पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे पोलीस उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे,सहायक फौजदार ए बी आढागळे, एस आर गोरे, पोलीस कॉन्स्टेबल आयुबब शेख, अली हबीब, पोलीस नाईक अनिल शेंगाळे,आबासाहेब गोरे, दादासाहेब लोढे, दादासाहेब गुंड, साजीद पठाण, चांदभाई पठाण, प्रशांत रणनवरे आदींच्या पथकाने केली असून. आरोपी दत्तू पवार याच्या विरुद्ध ,तालुका पोलीस ठाण्यात,भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक आढागळे हे करीत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget