Latest Post

राहुरी तालूक्यातील खडांबे येथील साळवे कुटूंबावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार करण्यात आला. त्या साळवे कुटूंबाला न्याय न मिळाल्यास तसेच आरोपीला पाठीशी घालणारे राहुरी येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे निलंबन झाले नाहीतर येत्या अधिवशनात काळे झेंडे दाखवण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी आज दिनांक २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी दिला. 

      राहुरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. न्याय व्यवस्था दलित व अदिवासी समाजाला न्याय देण्यात कमी पडत आहे. तालूक्यातील खडांबे येथे अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. येत्या आठ दिवसांत पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निलंबित केले नाहीतर अहमदनगर येथील पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा तालूकाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला. या प्रसंगी डाॅ. जालिंदर घिगे यांनी सांगितले कि, कायद्याचे पालन करणारेच कायदा मानत नसेल तर अंदोलन करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना पाठिशा घालणाऱ्या अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करावे. तालुक्यातील खंडाबे व कुरणवाडी येथील दोन्ही घटना अत्यंत गंभिर आहेत. छत्रपतीच्या राज्यात शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही. ते अन्यायाच्या विरोधात लढत राहिले. आम्ही त्यांच्याच मार्गावर चालत आहोत. 

        यावेळी बोलताना ॲड. भाऊसाहेब पवार म्हणाले कि, राहुरी पंचायत समितिचा सदस्य बाळासाहेब लटके यासह त्याच्या कुटूंबियाने साळवे कुटूंबियांना मारहाण करुन जातिवाचक शिविगाळ केली होती. मात्र राहुरीचे पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी साळवे कुटूंबाची खरी तक्रार न घेता चुकीची फिर्याद घेतली. त्याचवेळी ॲट्रोसिटी का दाखल केली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन मोर्चा काढण्याचे निवेदन दिले. तेव्हा तब्बल पंधरा दिवसाने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल. निवेदन देताच का लगेच आरोपींना अटक केली? याचा अर्थ काय? की पोलिस या आरोपींना पाठिशी घालत होते?

        यावेळी बौध्द महासभेचे गौतम पगारे, बाबुराव मकासरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून राहुरी पोलिस ठाण्याच्या कारभारा बाबत नाराजगी व्यक्त केली. या अंदोलनात पिंटूनाना साळवे, सलिम शेख, बाळासाहेब बर्डे, ईश्वर खिलारी, सुनिल ब्राम्हणे, रविंद्र गायकवाड, गोरख थोरात, खडांबे येथिल पिडीत कुटूंबातील महिला, मुलगा व मुलगी यासह अनेक कार्यकर्ते अंदोलनात सामिल झाले होते.

         यावेळी निवेदन स्विकरतांना पोलिस उपधिक्षक राहुल मदने यांनी अंदोलनकांना सांगितले की, तुम्हाला पुन्हा अंदोलन करण्याची गरज पडणार नाही. यावेळी अंदोलकांनी प्रश्न केला की पोलिस निरिक्षक दुधाळ यांना निलंबित कधी करणार? तेव्हा संबधित घटने बाबत चौकशी करून जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे सर्व अहवाल पाठवण्यात येईल व न्याय दिला जाईल. असे मदने यांनी सांगितले.

दिनांक २५ रोजी मौजे टाकळीमियाँ येथे कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गास मंडळ.कृषि अधिकारी राहुरी प्रशांत डहाळे, कृषि पर्यवेक्षक तुळशिराम पवार, कृषि सहायक शिवप्रसाद कोहकडे ,कृषि भिमराज गडधे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते .

या प्रशिक्षण वर्गात भिमराज गडधे यांनी कापुस लागवड व एकात्मिक खत व्यवस्थापन तसेच किड व रोग नियंत्रण या बाबत मार्गदर्शन केले .कृषि पर्यवेक्षक तुळशिराम पवार यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करणे व त्याचा वापर कसा करावा या बाबत मार्गदर्शन केले. कृषि सहायक शिवप्रसाद कोहकडे यांनी सोयाबीन पिकावर येणारी किड व रोग यांची ओळख व नियंत्रण करण्यासाठी उपाय योजनांची माहीती दिली तसेच या वेळी निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्याक्षीक दाखविण्यात आले ,

या वेळी साहेबराव निमसे, संजय तोडमल, बाबासाहेब करपे, साहेबराव गायकवाड, दत्तात्रय नलावडे, बाबासाहेब ढोबळे, अजित करपे, दादासाहेब जाधव, गणेश तोडमल, गणेश निमसे, अक्षय करपे, अक्षय घोडके, सोमनाध सगळगिळे,  ऋषिकेश घोडके उपस्थित होते.



राहुरी-(प्रतिनिधी मिनाष पटेकर)-दिनांक २४ जून रोजी मौजे वळण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत बोलताना तज्ञ कृषी पर्यवेक्षक श्री शिवाजी कोरडे म्हणाले की कापूस लागवड करताना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी शेतकऱ्यांना शेतीशाळा, शेतीचे नियोजन व खर्चात बचत याबाबत खेळाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे यांनी खताची बचत, सोयाबीन पिक व्यवस्थापन व शासनाच्या विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर, सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गडधे,मंगेश बनकर, आकाश गोरे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे,सदस्य अशोकराव खुळे,अशोकराव कुलट,माजी सरपंच बाबासाहेब खुळे,दत्तात्रय खुळे,ज्ञानेश्वर खुळे, युनुस शेख,सारंगधर खुळे,अर्जुन आढाव,बाळासाहेब खुळे, बाबासाहेब मकासरे, अशोक काळे, षकीरचंद फुणगे,गोविंद फुणगे उपस्थित होते. हरिभाऊ डमाळे यांनी आभार प्रदर्शन केले. किसान कृषी सेवा केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.


राहुरी-(प्रतिनिधी मिनाष पटेकर)-दिनांक २३ जून रोजी मौजे मानोरी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे ,कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर ,तुळशीराम पवार ,कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे,भिमराज गडदे ,श्रीमती दुर्गा सहाने उपस्थित होते .सदर कार्यक्रमात श्री तुळशीराम पवार कृषी पर्यवेक्षक यांनी एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भिमराज गडधे यांनी कापूस पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले .तसेच चंद्रकांत म्हसे कृषी विभागाच्या विविध योजना व मका पिकावर अमेरिकन लष्करी आळी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास बापूसाहेब चोथे, शिवाजी पोटे, गणेश चोथे ,दत्तात्रय आढाव ,सचिन साबळे, नानासाहेब आढाव ,बन्सी शेख, पंढरीनाथ चौथे ,अशोक वाघ, बापूसाहेब वाघ,अभिषेक आढाव, नितीन चोथे ,विकास वाघ, बाळासाहेब राठोड ,दत्तात्रय आढाव ,सचिन साबळे ,शिवाजी पोटे व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.


श्रीरामपूर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने डाॅ,  शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले 

यावेळी बोलताना भाजपा शहरअध्यक्ष मारूतीभाऊ बिंगले म्हणाले एक देशमे   दो निशान दो प्रधान दो संविधान नही चलेगे.असा त्यांचा मुल मंत्र होता. 

तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश  राठी यांनी सांगितले की 1951 साली भारतीय जनसंघाची स्थापना केली आज काश्मिर जो आपल्या भारतात आहे याचे सर्व श्रेय डाॅ, शामा प्रसाद मुखर्जी यांना जाते, घटनेच्या 370 या कलमास त्यांचा सक्त विरोध होता आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या कालखंडात कलम 370 रद्द करण्यात आला आहे..

यावेळी मिलींदकुमार साळवे यांनी डाॅ,  शामा प्रसाद मुखर्जी यांच्या विषयी माहिती विशद केली. 

यावेळी शहरअध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले जिल्हा उपाध्यक्ष गणेश  राठी, सतिश सौदागर, जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक सेल बंडुकूमार शिंदे, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव उपाध्यक्ष रूपेश हरकल सचिव अक्षय नगारे, राहुल आठवल,अक्षय वर्पे, राजेंद्र कांबळे, अजित बाबेल, मिलींदकुमार साळवे, रवी पंडित, गणेश अभंग, डाॅ ललित सावज, बाळु आहिरे, विजय आखाडे, विशाल अंभोरे, संदिप रणनवरे,दत्तु देवकाते, पंकज करमासे, ललित गाडेकर, विशाल साबळे ,रोहित मिसाळ,गणेश कुर्हे, गजानन आढाव, व भारतीय जनता पार्टी च कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.


.

बेलापूर (प्रतिनिधी  )-: जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी याची पुण्यतिथी बेलापूरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली  . याप्रसंगी श्यामाप्रसाद मुखर्जी च्या प्रतिमेला गावातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.शरद देशपांडे व श्री.रमेश कुलथे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले. दिवंगत श्यामाप्रसाद यांनी त्यांच्या कार्यकाळात कायम काश्मीरच्या विषेश राज्याच्या संकल्पनेला व कलम ३७० ला वेळोवेळी विरोध केला याच आंदोलनात अटक झालेली असताना तुरुंगातच त्यांना वीरमरण आले ,असे शेवटपर्यंत कलम ३७० ला विरोध करणार्या या व्यक्तीमत्वाने कॉंग्रेस विरूध्द संपूर्ण विरोधी पक्षाला एकत्र आणण्याची जबाबदारी उचलून "जनसंघा"ची स्थापना करून जनसंघाचे सरकार प्रस्थापित केले. अशा धुरंधर नेत्याला म्हणावी तशी प्रसिद्धी त्या काळी मिळाली नाही. कारण श्यामाप्रसादजी हे प्रसिद्धी पासून फार दूर राहीले .मोदी सरकारने मात्र ३७० कलम रद्द करुन खर्या अर्थाने श्यामाप्रसाद मुखर्जीच्या विचारांचा मानसन्मान वृद्धिंगत केला.बेलापूर मधील या कार्यक्रमास भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पुरूषोत्तम भराटे, राकेश कुंभकर्ण, सागर ढवळे,राजेंद्र राशीनकर,किशोर खरोटे,गजानन डावरे,विशाल मेहेत्रे, भुषण चंगेडे,राजेंद्र गाडेकर,प्रशांत ढवळे,सागर हुडे,योगेश सोनवणे, दादा कुताळ,सुभाष मोहिते आदि उपस्थित होते

.

श्रीरामपुर (वीशेष प्रतिनिधी  )-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहीतीच्या अधारे छापा टाकून बनावट दारु बनविणार्या रँकेटचा पर्दाफाश केला असुन यात साडे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन  दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त खबर मिळाली की  श्रीरामपुर येथील संजयनगर ईदगाह मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात

बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप संचालक  अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे गणेश पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक एस बी शेंडे एस एम सराफ उपआधिक्षक अ विभाग ऐ बी बनकर निरीक्षक ब विभाग एस के कोल्हे निरीक्षक कोपरगाव बी बी हुलगे निरीक्षक श्रीरामपुर  ऐ व्ही पाटील निरीक्षक  पी व्ही अहीरराव एम डी कोडे व्ही एम बारवकर एम एस धोका एस बी भगत जगताप के यु छत्रे कुमारी घोडे नम्रता वाघ आदिंनी आपल्या सहकार्या समवेत ईदगाह मैदान संजयनगर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारु तयार केली जात असल्याचे आढळून आले या ठिकाणी बनावट दारु तयार करण्याकरीता लागणारे स्पिरीट २०० लिटर  बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे ३०लिटर विदेशी मद्य १८०मिली क्षमतेच्या ४४० बनावट ब्रँण्डच्या बाटल्या बनावट देशी मद्याच्या १८०मिलीच्या ३८४बाटल्या तसेच देशी भिंगरी व संत्रा  लेबलच्या बाटल्या बनावट देशी व विदेशी दारुची बुच नामांकिता कंपनी इम्पेरियल ब्लू व मेक्डाल न. १ विस्की राँयल स्टग कंपनीचे व भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्या कृत्रीम स्वाद पदार्थ  इसेन्स व फ्लेवर बँरल ड्रम एम एच ०६ बी जी ०८५२ क्रमांकाची पिकअप वाहन असा सहा लाख एकुण पन्नास हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन मोहन यशवंत काळे रा दत्तनगर राकेशकुमार केवलप्रसाद दहीया उर्फ मुन्ना राहणार ईटामा कोठार तालुका अमरपाटण जिल्हा सतना मध्य प्रदेश ह मु संगमनेर चंद्रकांत शाम पवार यांचे विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पवार हा फरार झालेला आहे या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नागरीकांना अवाहन करण्यात आले आहै की अशा प्रकारे अवैध बनावट देशी विदेशी दारु निर्मीती खरेदी विक्री वहातुक करत असेल तर अशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी आपले नाव गुप्त ठेवले जाईल असे अवाहन करण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget