जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी रुबाब पटेल यांची एकमताने निवड.
श्रीरामपूर - ग्रामिण भागातील समस्थ ग्रामस्थांच्या समस्यांना समजून घेणे तथा त्यांच्या आडीआडचणींना शासन दरबारी पाठपूरावा करण्याकामी योग्य मार्गदर्शन करणे यासोबतच निरपेक्षतेने आपली शासकीय सेवा करणे आणि शासनाच्या सेवेला केवळ शासकीय सेवाच न समजता भक्ती म्हणून त्यात स्वतःस वाहून घेणे असे असे परोपकारी व्यक्तीमत्व असलेले तालूक्यातील सरला गोवर्धनपूर येथील आदर्श ग्रामसेवक श्री.रुबाब पटेल यांची श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याने जि.प.कर्मचार्यांबरोबर त्यांच्या मित्र परीवारांकडून देखील त्यांचयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,
आज शुक्रवार दिनांक 08/10/2020रोजी पंचायत समिती श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.श्री.एकनाथराव ढाकणे यांचे हस्ते व अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनीलजी नांगरे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.त्यात सरला, गोवर्धनपूर ता.श्रीरामपूर येथील ग्रामसेवक श्री.रुबाब पटेल यांची श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली,
या निवडीबद्दल ग्रामसेवक रुबाब पटेल यांचा ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.एकनाथराव ढाकणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला तथा त्यांनी श्री.पटेल यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छाही दिल्या.