Latest Post

कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते  -
उजनी उपसा जलसिंचन योजनेकडे  दुर्लक्ष झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आशुतोष  काळे यांनी आमदार झाल्यानंतर लगेच सदर योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला तसेच सर्व दुरुस्त्या करून घेतल्याने उजनी उपसा जलसिंचन योजना सुरू झाली असून पाझर तलावांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. 
उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या पाझर तलावातील पाण्याचे आ . आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, बाबुराव थोरात, रोहिदास होन, किसन पाडेकर, के.डी. खालकर,अॅड. योगेश खालकर,  सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, अनिल खालकर, अरुण कोल्हे, लक्ष्मण थोरात, नाना नेहे, ज्ञानदेव नेहे, प्रभाकर गुंजाळ, युवराज गांगवे, सिकंदर इनामदार, अशोक नेहे, वाल्मिक वाकचौरे, निळवंडे लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री. संघांनी, श्री. लव्हाटे, श्री. ढिकले आदी उपस्थित होते.
निवडणूक कालावधीत दिलेला शब्द खरा करून हा प्रश्न तातडीने सोडवल्याबद्दल लाभार्थी शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते - कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गवारे नगरमधील अतिशय महत्वाच्या असलेल्या पुलावरून परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात नियमितपणे ये-जा असते. मात्र या पुलाची व रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे गवारे नगरमधील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळयाचे दिवस सुरु आहेत. रस्त्यावर व पुलावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असल्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना लहान मोठ्या इजा होत आहेत. याची गांभीर्याने दखल घेवून गवारे नगरमधील या पूल व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, कार्याध्यक्ष संदीप कपिले, दत्तात्रय गवारे, मारुती जपे, सचिन गवारे, सागर लकारे, धीरज कोठारी, स्वप्नील गवारे, धीरज आंबोरे आदी उपस्थित होते.

कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते-आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांच्या वतीने २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
     आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राहुल चांदगुडे व संदीप कुटे हे नेहमीच रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना मदत करीत असतात. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या चासनळी येथील मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक विद्यालयाला ५ लाख रुपये खर्च करून भव्य-दिव्य व्यासपीठ बांधून देण्यात आले आहे. या व्यासपीठाचे कर्मवीर शंकरराव काळे व्यासपीठ अये नामकरण देखील करण्यात आले आहे. यावर्षी देखील समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासत राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांनी राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास २५ हजार रुपयाची देणगी देण्याचा निर्णय घेऊन या रक्कमेचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्राचार्या सौ.छाया काकडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचून गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने काळे परिवाराची तिसरी पिढी या शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आहे. त्यांच्या कार्याला अल्पशी मदत म्हणून रयत शिक्षण संस्थेला मदत करीत असल्याचे राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव काळे, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिराच्या प्राचार्या सौ.छाया काकडे व त्यांचे सहकारी शिक्षक यावेळी उपस्थित होते.आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास मदतीचा धनादेश देतांना राहुल चांदगुडे व संदीप कुटे समवेत प्राचार्या सौ.छाया काकडे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या सुरु असलेला पावसाळ, लाकडावून व कोविड१९ ची भिती या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सभासद पत्रकार व प्रेस फोटोग्राफर यांना संघटनेच्या वतीने नुकत्याच विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. लवकरच संघटनेतील सर्व सभासद बांधवांचा ग्रुप विमा व मेडिक्लेम पॉलीसी उतरविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.
  मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर  तालुक्यातील सभासद पत्रकार व प्रेसफोटोग्राफर यांना विविध वस्तूंचा वितरण समारंभ नुकताच सोशल डिस्टन्सींग व मास्कचा वापर करत श्रीरामपूर येथे संपन्न झाला. अध्यक्ष स्थांनी जेष्ठ पत्रकार देवीदास देसाई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून  जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे हे उपस्थित  होते.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सचिव विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली हि संघटना नेहमीच  विविध सामाजीक उपक्रम राबवत असते  संघटनेतील सभासदांसाठी संघटना नेहमीच मदतीचा हात देत आली आहे.
  दरवर्षीच राज्यस्तरीय अधिवेशना निमित्ताने  पत्रकारांना  भेट वस्तू, दिनदर्शिका, हेल्मेट, डायरी, टि शर्ट व पेन आदी वस्तू भेट दिलेल्या आहेत. त्यात मागील वर्षी श्रीरामपूर येथील परिवहन कार्यालय येथे वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त  पत्रकारांना  हेल्मेट वितरीत करण्यात आले होते या वेळी पत्रकारांना रेनकोट पेन डायरी बँग भेट देण्यात आली त्या वेळी बोलताना जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे म्हणाले की आपल्या जिवाची पर्वा न करता पत्रकार काम करत असातो हे करत असताना त्याला काही अपघात त्याचे कुटूंब उघड्यावर पडते त्यामुळे संघटनेच्या वतीने पत्रकारांचा विमा काढण्यात येणार आहे सभासदांच्या हिताकरीता संघटना काम करते आपणही संघटना वाढीसाठी  प्रयत्न करावे असे आवाहन या वेळी जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे यांनी केले.
   यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण थोरात, शहराध्यक्ष अमोल कदम, शहर उपाध्यक्ष सल्लाउद्दीन शेख, शरद पुजारी आदिंनी मनोगतं व्यक्त केले
   यावेळी उपस्थीत असलेले संघटनेचे सभासद पत्रकार व प्रेस फोटोग्राफर यांना मोफत बॅग, दिनदर्शिका, रेनकोट, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर स्प्रे, पेन व ओळख पत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत झुरंगे, देवीदास देसाई, लक्ष्मण थोरात, दिलीप दायमा, राजेंद्र देसाई, अमोल कदम, सल्लाउद्दीन शेख, शरद पुजारी, भानुदास बेरड, बाबा अमोलीक, राजेश गागरे व गौरव शेटे आदिसह पत्रकार व प्रेस फोटोग्राफर उपस्थीत होते....

मधुकर वक्ते कोपरगाव प्रतिनिधी-धामोरी येथील युवक कार्यकर्ते विलासराव भाकरे यांची अमृत संजीवनी शुगर केन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थाच्या संचालकपदी निवड करण्यात आली. कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते श्री भाकरे यांचा सत्कार करण्यात आला. माजी मंत्री शकररावजी कोल्हे साहेब आणि संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेवर काम करण्याची संधी दिल्याबददल श्री भाकरे यांनी आभार व्यक्त केले.
श्री भाकरे हे धामोरी येथील प्रगतीशील शेतकरी असून सामाजिक,राजकीय क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असतात. त्यांचे वडील भाउसाहेब गणपत भाकरे हे सहकारमहर्पी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते, त्यांच्या समाजसेवेचा वारसा ते पुढे चालवत असून त्यांच्या अनुभवाचा संस्थेला निश्चित फायदा होईल. औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेकभैया कोल्हे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी पराग संधान, कार्यकारी संचालक शीवाजीराव दिवटे, राहुल वाणी, विजय साळुंके, सतीष भाकरे आदी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबददल माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी अभिनंदन केले.

श्रीरामपूर : राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. येथील बसस्थानकावर आघाडीच्या वतीने बुधवारी डफली बजाव आंदोलन करण्यात आले.     कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली. त्यामुळे चार महिन्यांपासून बससेवा बंद आहे. बससेवा बंद झाल्यामुळे गोरगरिब व कष्टकरी जनतेला प्रवासासाठी अडचणी येत आहेत. त्यांच्या उपजिवीकेवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. सरकारने किमान ५० टक्के वाहतूक व्यवस्था सुरू करावी अन्यथा राज्यभर डफली बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख, गौतम राऊत, अमोल सोनवणे यांनी दिला आहे.

ज्युनिअर कॉलेजचा ऑनलाईन पालक मेळावा संपन्न.
श्रीरामपूर(प्रतिनिधी)कोरोनाची पार्श्वभूमी आणि लॉकडाऊच्या कारणाने निर्माण झालेल्या  विविध समस्यांवर मार्ग काढुन  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा तसेच गुणवत्ता जोपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही सी. डी. जैन कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर यांनी पालकांना दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी कॉलेज घेत आहे.सर्व विद्यार्थ्यांना बुक बँकेमार्फत घरपोच पाठ्यपुस्तके देण्याचे काम सुरू आहे.ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देऊन विद्यार्थ्यांना झूम अँपद्वारे अध्यापन सुरु आहे पालकांनी मेळाव्यात केलेल्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल.तसेच सप्टेंबरमध्ये पुन्हा ऑनलाइन पालक मेळावा घेऊन आढावा घेतला जाईल. असेही प्राचार्य डॉ. भोर यांनी सांगितले.यावेळी ऑनलाइनवर उपस्थित पालक सर्वश्री प्रा. ज्ञानेश गवले, रविंद्र बिडवे, श्रीमती चोपडा, श्रीमती भिंगारे, श्री. वधवा,गाढे आदींनी सहभागी होऊन कॉलेजने या काळातही राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून काही सूचना मांडल्या.त्यात प्रामुख्याने ऑनलाईन तासिकांची वेळ वाढविण्याची मागणी होती.
विभाग प्रमुख प्रा. आर. डी. पटारे यांनी प्रास्ताविक केले.शेवटी प्रा. टी. जे. शेख यांनी आभार मानले.प्रा. आर.जे. मते यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा.पी. बी. राऊत,एम. डी. बोरसे, के. ए. रुपवते, ए. डी. हरदास, एस.एन. तांबे, एस. डी. ससाणे आदी प्राध्यापकांनी सहभागी होऊन मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget