श्रीरामपूर(प्रतिनिधी)कोरोनाची पार्श्वभूमी आणि लॉकडाऊच्या कारणाने निर्माण झालेल्या विविध समस्यांवर मार्ग काढुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा तसेच गुणवत्ता जोपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही सी. डी. जैन कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर यांनी पालकांना दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी कॉलेज घेत आहे.सर्व विद्यार्थ्यांना बुक बँकेमार्फत घरपोच पाठ्यपुस्तके देण्याचे काम सुरू आहे.ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देऊन विद्यार्थ्यांना झूम अँपद्वारे अध्यापन सुरु आहे पालकांनी मेळाव्यात केलेल्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल.तसेच सप्टेंबरमध्ये पुन्हा ऑनलाइन पालक मेळावा घेऊन आढावा घेतला जाईल. असेही प्राचार्य डॉ. भोर यांनी सांगितले.यावेळी ऑनलाइनवर उपस्थित पालक सर्वश्री प्रा. ज्ञानेश गवले, रविंद्र बिडवे, श्रीमती चोपडा, श्रीमती भिंगारे, श्री. वधवा,गाढे आदींनी सहभागी होऊन कॉलेजने या काळातही राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून काही सूचना मांडल्या.त्यात प्रामुख्याने ऑनलाईन तासिकांची वेळ वाढविण्याची मागणी होती.
विभाग प्रमुख प्रा. आर. डी. पटारे यांनी प्रास्ताविक केले.शेवटी प्रा. टी. जे. शेख यांनी आभार मानले.प्रा. आर.जे. मते यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा.पी. बी. राऊत,एम. डी. बोरसे, के. ए. रुपवते, ए. डी. हरदास, एस.एन. तांबे, एस. डी. ससाणे आदी प्राध्यापकांनी सहभागी होऊन मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Post a Comment