Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) नागरिकांना सेतू कार्यालयामधून करावयाचे प्रतिज्ञापत्र सहीसाठी तहसील कार्यालयात आल्यानंतर त्याठिकाणी संबंधित नागरिकांकडून पैसे उकळण्याचा गंभीर प्रकार एका व्हिडिओद्वारे समोर आला आहे . दैनंदिन गरजेच्या अनेक कामासाठी सेतू कार्यालयामध्ये प्रतिज्ञापत्र करावे लागते . सेतू कार्यालयामध्ये नोंदणी केल्यानंतर सदरची कागदपत्रे सहीसाठी तहसील कार्यालयात जातात . तेथे तहसीलदाराची सही अपेक्षित असताना त्यांच्या अनुपस्थिती मध्ये नायब तहसीलदार सही करतात . परंतु सध्या हे अधिकार कार्यालयातील लिपिकांना सुद्धा दिले गेले असून त्या दर्जाचे लोक त्या ठिकाणी सह्या करतात . मात्र तालुका भरातून येणाऱ्या नागरिकांना परत जाण्याची घाई असल्याने ते लवकर सहीसाठी आग्रही असतात . अशा वेळी पैसे दिल्यास लगेच सही केली जाते . त्यासाठी शंभर दोनशे रुपयांचा आग्रह केला जातो . पैसे न दिल्यास नंतर या, उद्याया, संध्याकाळी या अशा प्रकारची उत्तरे दिली जातात . याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये संबंधित नागरिक हा पैसे दिल्यानंतर लिपिकाकडे पावतीची मागणी करीत आहे . पावती सध्या माझ्याकडे नसून नंतर देतो असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला जात आहे . मात्र संबंधित नागरिकांनी पावतीचा आग्रह धरल्याने पावती नाही म्हणून त्याचे पैसे परत देण्याचा प्रकारही दिसून येत आहे 
वास्तविक पाहता सेतू कार्यालयामध्ये ज्यावेळी एखादा नागरिक प्रतिज्ञापत्र करण्यासाठी जातो . त्यावेळी त्याच्याकडून तेथे फी घेतली जाते आणि या फी मध्येच तहसीलदाराच्या सहीचे प्रतिज्ञापत्र द्यावयाचे असते . परंतु सेतू कार्यालय वेगवेगळ्या भागात असल्यामुळे सहीसाठी तहसील मध्ये यावे लागते . सेतू मध्ये कागदपत्र एकत्र झाल्यानंतर एकत्रित रजिस्टरमध्ये नोंद करून सहीसाठी ती तहसीलदाराकडे पाठवली जातात .त्यामध्ये बराच वेळ खर्ची पडतो म्हणून नागरिक स्वतः सदरची कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात येतात . त्या ठिकाणी शिक्का लावलेला असतो .त्यावर फक्त सही घ्यायची असते . या सहीसाठी संबंधीत टेबलावर नेमलेले लोक पैसे मागत असल्याने लोकांना हा भुर्दंड कशासाठी आणि तहसीलदारांना याची कल्पना आहे का असे प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत . श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांत अनिल पवार सध्या कोरोणाच्या मुकाबल्यासाठी आपल्या टीमसह रात्रंदिवस कार्यरत आहेत . अशा वेळी त्यांच्या कार्यालयातील अनुपस्थिती चा गैरफायदा घेऊन तहसील कार्यालयातील काही कर्मचारी या पद्धतीने राजरोसपणे कार्यालयातच लाच घेत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेने पैसे तरी कुठे कुठे खर्च करायचे असा प्रश्न समाजातून विचारला जात आहे . यासाठी सेतू कार्यालयातील सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांची साक्षांकनाची अट रद्द करून स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र स्वीकारले जावेत अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान वायरल झालेल्या व्हिडिओमधील कर्मचाऱ्या बाबत तहसीलदार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे .

बेलापूर  (प्रतिनिधी )- कोरोनाचा रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर तो बरा होवुन घरी जातो तो क्षण वैद्यकीय अधिकार्याच्या आनंदाचा    क्षण असल्याची प्रतिक्रिया कोरोना रुग्णांची सेवा करुन घरी आलेला करोना योध्दा डाँक्टर सुनिल चव्हाण यांनी दिली संक्रापूर तालुका राहुरी येथील डाँक्टर सुनिल चव्हाण हे शिर्डी येथील दवाखान्यात करोना योध्दा म्हणून सेवा देत होते नुकतेच ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले असता ग्रामस्थांच्या वतीने करोना योध्दा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी काही कडू गोड आठवणी सांगतांना डाँक्टर चव्हाण म्हणाले की करोना झालेल्या रुग्णाना मानसिक आधाराची जास्त गरज असते रुग्णाची सेवा करताना मनात भिती असतेच परंतु सेवाभाव हा महत्वाचा असतो रुग्ण बरा होवुन घरी निघाला की आम्हा सर्व डाँक्टर मंडळींना फार आनंद होतो हे संकट केव्हा जाईल त्याची वाट पाहु नका ज्या सुचना दिलेल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करा सँनिटायझरचा वापर करा सोशल डिस्टन्स ठेवा मास्क वापरा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा असेही ते म्हणाले या वेळी ग्रामस्थांच्या वतीने जेष्ठ पत्रकार देविदास देसाई  यांच्या हस्ते डाँक्टर सुनिल चव्हाण यांंचा गौरव करण्यात आला    या वेळी पत्रकार देविदास देसाई  माजी सरपंच संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी संक्रापूरचे माजी सरपंच संजय जगताप सेवा संस्थेचे चेअरमन  नबाजी जगताप कल्याणराव जगताप डाँक्टर सुरेश जगताप आनंदा बर्डे दावल शेख मच्छिंद्र चव्हाण प्रभाकर चव्हाण द्वारकनाथ चव्हाण आदि उपस्थित होते प्रास्ताविक रामराव होन यांनी केले तर मेजर सुधाकर चव्हाण यांनी आभार मानले.

श्रीरामपूर (प्रतिनीधी).१६/०६/२०२० रोजी दुपारी ३/४५ वा.चे सुमारास फिर्यादी सौ.पुष्पा मच्छिद्र हिरे रा. मोरगेवस्ती, सुवर्णपिंपळ
रोड, बॉर्ड नं.७.श्रीरामपूर जि. अहमदनगर या अक्षय कॉर्नर ते सिद्धीविनायक चौक जाणारे रोडवर स्कुटी मोटारसायकलवरुन एकट्या जात असतांना राहिज हॉस्पीटलचे पुढे पाठीमागुन एका काळे रंगाचे मोटारसायकलवर काळपट रंगाचे कपडे घातलेल्या दोन अज्ञात इसमांनी येवून त्यांचे गळ्यातील वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने ओढुन तोडुन चोरुन नेले आहे वगैरे फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोस्टेला गु.र.नं. १ १०४६/२०२० भादविक ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास केला असता तो श्रीरामपुर शहरातील सराईत व तडीपार गुंड आनंद
यशवंत काळे याने त्याचा साथीदार सनि भोसले याचेसह केला असुन त्यांनी गुन्ह्यात एक अपाचे मोटारसायकल
वापरलेली असुन तीसह ते पुन्हा शहरात येणार आहेत अशी बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने डी.बी.पथकाचे पोसई
संतोष बहाकर, पोहेकॉ/जे.के.लोंढे, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ/पंकज गोसावी, पोकॉ सुनिल दिघे,
पोकॉ/गणेश गावडे,पोकॉ/महेंद्र पवार यांचे पथकाने नॉर्दन बेंच परिसरात सापळा लावुन तडीपार आरोपी नामे १) आनंद
यशवंत काळे रा. सुतगिरणी परिसर,दत्तनगर ता.श्रीरामपुर (२) सनि विजय भोसले रा. दत्तनगर ता.श्रीरामपुर यांना ताब्यात
घेतले असता त्यांचेकडे एक गुन्ह्यात वापरलेली अपाचे मोटारसायकल नं. एमएच १७ एटी ४६१२ अशी जप्त केली
असुन चोरीचे सोन्याबाबत अधिक तपास करत आहोत.
१) आनंद यशवंत काळे रा. सुतगिरणी परिसर,दत्तनगर ता.श्रीरामपुर (२) सनि विजय भोसले रा. दत्तनगर
ता.श्रीरामपुर यांचेवर यापुर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई मा.श्री.अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे, अपर
पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा. श्री. राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह पोसई/ संतोष बहाकर, पोसई समाधान
सुरवाडे ,तपास पथकाचे पोहेकॉ/ जे.के.लोंढे, पोकों किशोर जाधव, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ। सुनिल दिघे, पोका
पंकज गोसावी, पोकॉ/ महेंद्र पवार, पोकॉ/ गणेश गावडे, मपोकॉ/ शितल कांबळे यांनी केली आहे.

श्रीरामपूर(प्रतिनिधी) - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोविड १९ साठी येथील तत्काळ निदान तपासणी शिबीरात ७८ जणांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये तिघेजण करोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही याठिकाणीच तत्काळ तपासणी करण्यात आली. त्यामुळे आता करोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने येथील वार्ड क्र. ७ मध्ये सोशल क्लबच्या सभागृहात तत्काळ तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबीरात सहा आरोग्य कर्मचारी व दहा आशा सेविकांनी शिबीराला उपस्थित असलेल्या व्यक्तींची तपासणी केली. यावेळी नॉद्रर्न ब्रॅच ते सरस्वती कॉलनीपर्यंतच्या व्यक्तींनी हजेरी लावली. यातील ७८ व्यक्तींची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यात तिघेजण करोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यांच्यावर येथील संत लूक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहते. याशिबीरासाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिबीर पार पडल्यानंतर याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांना देण्यात आली. त्यांनी आणखी रॅपिड टेस्टींगसाठी आणखी किट पाठविण्याची ग्वाही दिली आहे. अशाप्रकारे शहरातील इतर भागातही शिबीरे आयोजित केली जाणार आहे. त्यास नागरिकांनी उपस्थित राहून तपासणी करावी व आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.

श्रीरामपूर   (प्रतिनिधी   )-पंतप्रधान गरीब कल्याण  अन्न योजनेंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार्या पाच किलो तांदूळ ऐवजी आता माणसी तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याचे परिपत्रक शासनाचे सहसचिव मनोजकुमार सुर्यवंशी यांनी काढले आहे. केंद्र शासनाच्या संदर्भाधीन दिनांक ८ जुलैच्या पत्रान्वये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी माहे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी मोफत वितरीत करावयाच्या अन्नधान्याचे नियतन प्राप्त झाले असुन अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना आता मोफत अन्नधान्य प्रति माणसी तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ  मोफत देण्यात येणार आहे माहे एप्रिल मे व जुन या महीन्यासाठी प्रति माणसी पाच किलो तांदूळ मोफत देण्यात आलेला होता कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य योजना माहे नोव्हेंबर पर्यत वाढविण्याचा निर्णय घेतला होता त्या नुसार आता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्रधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति माणसी पाच किलो धान्य मोफत देण्यात येणार असुन त्यात माणसी  तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय अन्नधान्या व्यतिरीक्त उपलब्ध करुन दैण्यात येत असुन कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे केंद्र शासनाच्या सूचना नुसार कोविड -१९ आजारामुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे भारतीय अन्न महामंंडळाच्या गोदामातुन एकाच वेळी दोन महीन्याच्या अन्न धान्याची उचल करावी तसेच लाभार्थ्यांना दोन महीन्याचे अन्न धान्य एकाच वेळेस वितरीत करावे असेही परिपत्रकात म्हटले आहे जुलै ते संप्टेंबर या कालावधीसाठी आंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी करीता अतिरीक्त नियतना नुसार अन्नधान्याचा साठा मूक्त करण्याच्या सूचना भारतीय अन्न महामंडळास स्वतंत्रपणे देण्यात आलेल्या आहे अहमदनगर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी ४२९३४९ आहे तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे लाभार्थी २६४०१६४ आहे दोन्ही योजनांचे मिळून एकुण लाभार्थी  ३०६९५१३ आहेत त्या नुसार जिल्ह्याला ९२०९ गहु व ६१३७ टन तांदूळ दिला जाणार आहे.

बेलापूरात जि प सदस्य शरद नवलेंच्या वतीने आर्सेनिक गोळ्यांचे वाटप
बेलापूर : - वाढता कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागाकडे हातपाय पसरवत आहे. त्यातच कोरोना विषाणूवर कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूर गावातील सुमारे साडेतीन ते चार हजार  कुटुंबांना अर्सेनिक अल्बम - 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे जिप सदस्य शरद नवले यांनी सांगितले .
     सदर गोळ्यांचे वाटप  बेलापूर येथील लोकमान्य फाऊंडेशन , डॉ.रविंद्र गंगवाल , व बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने होणार आहे. त्याची सुरुवात  रविवार दिनांक 12 रोजी जिप सदस्य शरद नवले , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देविदास चोखर , डॉ.रविंद्र गंगवाल , रणजीत श्रीगोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते  करण्यात आली.
      या वेळी बोलताना शरद नवले म्हणाले की , बेलापूर गावामध्ये एक कोरोना रुग्ण सापडल्याणे गावाची धास्ती वाढली होती .पण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स , आरोग्य कर्मचारी यांचे प्रयत्न व सर्व संस्था , सामाजिक कार्यकर्ते  गावातील सुज्ञ  नागरिक यांच्या दक्षतेमुळे एकापेक्षा जास्त रुग्ण वाढले नाही या बद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर पुढील खबरदारी म्हणून  लोकमान्य फाऊंडेशन , डॉ.रविंद्र गंगवाल व प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापूर यांचे वतीने गावातील साडेतीन ते चार हजार कुटुंबांना आर्सेनिक अल्बम - 30 या रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले . कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे.राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये देखील त्याचा शिरकाव होत आहे . त्यातच कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नाही. स्वयंशिस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे एवढेच पर्याय असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चोखर यांनी सांगितले.
      या प्रसंगी जिप सदस्य शरद नवले , टॕक्सी युनियनचे अध्यक्ष सुनिल मुथ्था , प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड , पत्रकार देविदास देसाई , डॉ.रविंद्र गंगवाल , डॉ.देविदास चोखर , अजय डाकले , अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे , प्रफुल्ल डावरे , पप्पू खरात , दादा कुताळ , पत्रकार सुहास शेलार , अशोक शेलार , दीपक क्षत्रिय , किशोर कदम , दिलीप दायमा यांचेसह ग्रामस्थ  उपस्थित होते .

श्रीरामपूर (प्रतिनिधी) इंडियन होमिओपॅथिक फोरम तर्फे शहरातील वार्ड नंबर दोन या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप तसेच रुग्णांची तपासणी शिबीर नगरपालिका शाळा क्रमांक पाच येथे संपन्न झाले . शिबिराचे उद्घाटन तहसीलदार प्रशांत पाटील व तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . होमिओपॅथिक फोरमचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र श्रीमाळी, सचिव डॉ.प्रशांत गंगवाल, सदस्य डॉ. रियाज पटेल, डॉ.सचिन मुसमाडे, डॉ. सोमनाथ गोपाळ घरे, डॉ. सुनिता व्यवहारे, डॉ. सुरज थोरात, डॉ.हीना पटेल, डॉ. जितेश बोरा, डॉ. आशिष जयस्वाल, डॉ . भूषण गंगवाल, डॉ. भारती पांडे, डॉ. अरबाज पठाण, डॉ. मंगेश चौधरीआदींनी रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे दिली .त्यानंतर सर्व आशा सेविकांनी वार्ड नंबर 2 मधील घरोघरी जाऊन साडेचार हजार लोकांना औषधांचे वाटप केले .
 सदर शिबिरासाठी उम्मती फाऊंडेशनचे सोहेल बारूद वाला, डॉ. मुजाहिद सय्यद, डॉ.शफी शेख, अॅड समीन बागवान, शरीफ शेख, डॉक्टर सुदर्शन, अश्फाक शेख, जावेद शेख आदींनी स्वयंसेवकांची सेवा उपलब्ध करून दिली. मुख्याध्यापक सलीमखान पठाण, परवीन शेख, शिक्षक अलताफ शाह, आसिफ मुर्तुजा, निशात पठाण,एजाज चौधरी यांनी शाळेतर्फे सुविधा उपलब्ध करून दिल्या .शिबिरास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
सरकारी दवाखान्याच्या सिस्टर एस के त्रिभुवन, सीमा भोसले, छाया चित्ते, सीमा भोसले,आयेशा पठाण, जया धीवर, एस वाय त्रिभुवन, रेणुका गायकवाड, बुगदे मॅडम, आशा सेविका अनिता साळुंखे, मुक्ता गवळी, ज्योती बिडवे,शहनाज मिर्झा, समीना शेख, रुबीना शेख, हिना पठाण, तरन्नुम खान, किशोर बत्तीसे आदींनी या शिबिरासाठी मोलाचे योगदान दिले. इंडियन होमिओपॅथिक फोरमने सदरचे औषध वाटप शिबीर आयोजित करून या भागातील नागरिकांना covid-19 औषध उपलब्ध करून मोफत तपासणी करून दिल्याबद्दल नगरसेवक अंजुमभाई शेख, मुजफ्फर शेख, मुक्तार शाह, रईस जहागीरदार, अल्तमश पटेल ,कलीम कुरेशी आदींनी होमिओपॅथिक फोरमला धन्यवाद दिले .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget