बेलापूर (प्रतिनिधी )- कोरोनाचा रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर तो बरा होवुन घरी जातो तो क्षण वैद्यकीय अधिकार्याच्या आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया कोरोना रुग्णांची सेवा करुन घरी आलेला करोना योध्दा डाँक्टर सुनिल चव्हाण यांनी दिली संक्रापूर तालुका राहुरी येथील डाँक्टर सुनिल चव्हाण हे शिर्डी येथील दवाखान्यात करोना योध्दा म्हणून सेवा देत होते नुकतेच ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले असता ग्रामस्थांच्या वतीने करोना योध्दा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी काही कडू गोड आठवणी सांगतांना डाँक्टर चव्हाण म्हणाले की करोना झालेल्या रुग्णाना मानसिक आधाराची जास्त गरज असते रुग्णाची सेवा करताना मनात भिती असतेच परंतु सेवाभाव हा महत्वाचा असतो रुग्ण बरा होवुन घरी निघाला की आम्हा सर्व डाँक्टर मंडळींना फार आनंद होतो हे संकट केव्हा जाईल त्याची वाट पाहु नका ज्या सुचना दिलेल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करा सँनिटायझरचा वापर करा सोशल डिस्टन्स ठेवा मास्क वापरा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा असेही ते म्हणाले या वेळी ग्रामस्थांच्या वतीने जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते डाँक्टर सुनिल चव्हाण यांंचा गौरव करण्यात आला या वेळी पत्रकार देविदास देसाई माजी सरपंच संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी संक्रापूरचे माजी सरपंच संजय जगताप सेवा संस्थेचे चेअरमन नबाजी जगताप कल्याणराव जगताप डाँक्टर सुरेश जगताप आनंदा बर्डे दावल शेख मच्छिंद्र चव्हाण प्रभाकर चव्हाण द्वारकनाथ चव्हाण आदि उपस्थित होते प्रास्ताविक रामराव होन यांनी केले तर मेजर सुधाकर चव्हाण यांनी आभार मानले.
Post a Comment