श्रीरामपूर (प्रतिनिधी ): कामधेनु पतसंस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे व्यक्तीना देण्यात येणारा या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे श्रीरामपूर अध्यक्ष तथा,श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील पत्रकार संदिप वसंतराव जगताप यांना ६ जाने. रोजी ( कामधेनु सभागृह ) भातकुडगाव फाटा ता. शेवगांव येथे प्रदान करण्यात येणार आहे.
शेवगाव तालुक्यातील बक्तरपुर येथील कामधेनु दुग्ध व्यावसायीक ग्रामीण बीगर शेती सहकारी पतसंस्था बक्तरपुर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तीना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते व पत्रकार क्षेत्रातील एका जेष्ठ व्यक्तीला पत्रकारीता जीवनगौरव देऊन गौरवण्यात येते. या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असुन त्यांचे वितरण ६ जानेवारी रोजी संस्थेच्या भातकुडगाव फाटा सभागृहात ह.भ.प. महत देविदास महाराज म्हस्के, माजी आमदार चंदशेखर घुले, उपपोलिस अधिक्षक मंदार जवळे, पोलीस निरिक्षक रामराव ढिकले, शेवगावचे तहसिलदार विनोद भामरे,लोकमंथन चे संपादक अशोक सोनवणे,जेष्ठ विचारवंत कॉ.बाबा अरगडे,जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भातकुडगाव फाटा येथील सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे यांनी दिली.
संस्थेच्या माध्यमातुन गेल्या आनेक वर्षापासुन पत्रकार दिनी विविध क्षेत्रातील व्यक्ती सह पत्रकाराचा गौरव सोहळा आयोजीत केला जातो. यापुर्वी जेष्ठ पत्रकार आर. आर.माने याना जीवनगौरव देऊन गौरवण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातुन नेहमीच सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन पत्रकार दिनी माजी अप्पर पोलिस अधिक्षक अॅण्टी करप्शन ब्युरो ज्ञानदेव गवारे ( शहर टाकळी ) यांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार २०२०, गुन्हे अन्वेषण जिल्हा प्रमुख दिलीप पवार ( अहमदनगर ) यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार, गुन्हे अन्वेषण विभागाचे रविंद कडिले( शेवगाव ), उत्कृष्ट पत्रकरिता पुरस्कार तुलसीदास मुखेकर (करंजी पाथर्डी ) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - संदिप जगताप ( श्रीरामपुर ), दुग्ध व्यावसायिकांना उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र उगार (पाथर्डी ), उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार
संदिप गाडेकर ( नेवासा ), यांना जाहीर करण्यात आले आहे. याचे वितरण पत्रकार दिनी होणार आहे
या निवडीचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.