संविधान बचाव समिती,श्रीरामपूर यांचे वतीने आज मोर्चा दि.६/1/2020 रोजी सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात येणाऱ्या सर्व धर्मीय,सर्व पक्षीय प्रचंड मोर्चा मध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन आ.कानडे यांनी केले आहे,भारत देशात संविधानाची पायमल्ली करण्याचे प्रकार सुरू असून
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेऊन केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग सध्याचे केंद्रातले सरकार करत आहे,त्याचाच एक भाग म्हणजे एन आर सी,सी ए ए व एन पी आर सारख्या संविधान विरोधी तरतुदी.
या सारख्या समाजविरोधी कायद्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने शांतता मय मार्गाने विरोध दर्शविणे काळाची गरज बनली आहे.
तेव्हा आजच्या होणाऱ्या मोर्चा मध्ये सर्व नागरीकांनी सामील होऊन शांततामय मार्गाने सदर मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन आ.कानडे यांनी केले आहे.
Post a Comment