Latest Post

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) देशात निदर्शने सुरूच असून, केंद्र व राज्य सरकारांमधील संघर्षही वाढत चालला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भाजपचे शीर्ष नेतृत्व प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. निदर्शकांना एकटे पाडण्यासाठी विविध पर्यायांवर विचार केला जात आहे.निदर्शने निष्प्रभ करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्याच वेळी सीएए विरोधी प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी मोदी सरकार जागतिक पातळीवर मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून काम करीत आहे.सीएए विरोधी आंदोलकांनी आपला पवित्रा बदलल्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. सुरुवातीला हिंसक असलेले आंदोलन आता शांततापूर्ण मार्गाने सुरू आहे. अल्पसंख्याक समुदायातील लोक हातात तिरंगा झेंडे घेऊन ‘जन गन मन’ म्हणत आहेत. बिगर-भाजप पक्षांची सरकारे असलेल्या सुमारे ११ राज्यांत विशाल निदर्शने होत आहेत. ईशान्य भारतातही हीच स्थिती आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा हे सीएए समर्थनार्थ आक्रमक वक्तव्ये करीत असले तरी गृह मंत्रालयाने अद्याप या कायद्याचे नियम जारी केलेले नाहीत. कदाचित सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असावे. मुद्या चिघळावा अशी मंत्रालयाची इच्छा नाही. त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आसामात भाजपची अधिक कोंडी झाली आहे. कारण तेथे आसामी संस्कृती आणि ओळख यांचे संरक्षण करण्याचे आश्वासन भाजपने दिलेले आहे.दरम्यान, गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना गंभीर इशारा दिला आहे. सीएए आणि एप्रिलपासून सुरू होणाऱ्या एनपीआरची अंमलबजावणी न केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर खटले भरले जातील, तसेच घटनात्मक तरतुदींचा वापर करून राज्य सरकारे बरखास्त केली जातील, असे राज्यांना अनौपचारिकरीत्या कळविण्यात आले आहे.केरळ, प. बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांनी सीएएची अंमलबजावणी न करण्याचे घोषित केले आहे.चिंताजनकदोन दिवसांपूर्वी भाजप नेतृत्वाने यावर बैठक घेतली. सीएएची अंमलबजावणी न करण्याच्या केरळ विधानसभेच्या ठरावावर बैठकीत चर्चा झाली. हा ठराव घटनाविरोधी आणि राज्य सरकारच्या अधिकाराबाहेरील असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले असले तरी हा पायंडा चिंताजनक आहे. असा ठराव संमत करण्यासाठी आसाम सरकारवर दबाव वाढत आहे.

सिन्नर | प्रतिनिधी-सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रिकेटचे सामने खेळात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संदीप वसंत सानप असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत होते.गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात आज क्रिकेटचे सामने घेण्यात आले.त्यावेळी मैदानात खेळत असताना सपोनि सानप यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी ): कामधेनु पतसंस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे व्यक्तीना देण्यात येणारा या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे श्रीरामपूर अध्यक्ष तथा,श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील पत्रकार संदिप वसंतराव जगताप यांना ६ जाने. रोजी ( कामधेनु सभागृह ) भातकुडगाव फाटा ता. शेवगांव येथे प्रदान करण्यात येणार आहे.
    शेवगाव तालुक्यातील बक्तरपुर येथील कामधेनु दुग्ध व्यावसायीक ग्रामीण बीगर शेती सहकारी पतसंस्था बक्तरपुर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तीना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते व पत्रकार क्षेत्रातील एका जेष्ठ व्यक्तीला पत्रकारीता जीवनगौरव  देऊन गौरवण्यात येते. या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असुन त्यांचे वितरण ६ जानेवारी रोजी संस्थेच्या भातकुडगाव फाटा सभागृहात ह.भ.प. महत देविदास महाराज म्हस्के, माजी आमदार चंदशेखर घुले, उपपोलिस अधिक्षक मंदार जवळे, पोलीस निरिक्षक रामराव ढिकले, शेवगावचे तहसिलदार विनोद भामरे,लोकमंथन चे संपादक अशोक सोनवणे,जेष्ठ विचारवंत कॉ.बाबा अरगडे,जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भातकुडगाव फाटा येथील सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे यांनी दिली.
              संस्थेच्या माध्यमातुन गेल्या आनेक वर्षापासुन पत्रकार दिनी विविध क्षेत्रातील व्यक्ती सह पत्रकाराचा गौरव सोहळा आयोजीत केला जातो. यापुर्वी जेष्ठ पत्रकार आर. आर.माने याना जीवनगौरव देऊन गौरवण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातुन नेहमीच सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन पत्रकार दिनी माजी अप्पर पोलिस अधिक्षक अॅण्टी करप्शन ब्युरो ज्ञानदेव गवारे ( शहर टाकळी ) यांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार २०२०, गुन्हे अन्वेषण जिल्हा प्रमुख दिलीप पवार ( अहमदनगर ) यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार, गुन्हे अन्वेषण विभागाचे रविंद कडिले( शेवगाव ), उत्कृष्ट पत्रकरिता पुरस्कार तुलसीदास मुखेकर (करंजी पाथर्डी ) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - संदिप जगताप ( श्रीरामपुर ), दुग्ध व्यावसायिकांना उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र उगार (पाथर्डी ), उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार
संदिप गाडेकर ( नेवासा ), यांना जाहीर करण्यात आले आहे. याचे वितरण पत्रकार दिनी होणार आहे
या निवडीचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.

शिर्डी नगरपंचायत मध्ये कायम चर्चेत असणार आण्टिकरप्शन फेम मुरलीधर देसले यांना राज्य माहिती आयुक्त यांनी तब्बल चार लाख पंचवीस हजार दंड का करण्यात येऊ नये  बाबत नोटीस पाठवली असल्याने माहिती अधिकार कायद्याला न जुमान्नार्याचे धाबे दणावलेले आहेत  शिर्डी येथील माहितीअधिकारचे कार्यकर्ता व वकील अविनाश शेजवळ यांनी शिर्डीत झालेल्या 2016 निवडणुकीत रातोरात झालेल्या मतदार आदला बदल बाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती     शिर्डी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये वार्ड क्रमांक 1 ते 17 मध्ये मतदार अदला बदलची महिती 19/8/2017 ला माहिती अधिकारात अंतिम यादी अचानक पणे रातोरात मतदार कमी जास्त झाल्याचा शंका आल्याने मागवली असता माहिती अधिकारी यांनी माहिती देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली होती तेव्हा 16/2/2017 ला ऐकून 16 अपील करण्यात आले अपीलीय अधिकारी यांनी माहिती द्यावी असा आदेश असतांना देखील अपीलातही माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयुक्तांना दुत्तीय अपील करण्यात आले राज्य माहिती अधिकार आयुक्तांनी वकील अविनाश शेजवळ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्यलिपिक देसले यांना तब्बल चार लाख पंचवीस हजार रुपए दंड का करण्यात येऊ नये असे माहिती आयुक्तांनी देसले यांना नोटीस पाठवल्यानें अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणावलेले आहेत

बक्तरपूर (वार्ताहर) :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अकरा व्यक्तीना  जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले.पत्रकार दिनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिली.

 दि.६ जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस.या दिवशी राज्यभर पत्रकार दिन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता,धार्मिक, प्रशासकीय, हस्तकला,राजकीय, प्रगतशील शेतकरी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.त्याची निवड समितीने छाननी करून पुरस्कार कर्त्यांचे नाव जाहीर करण्यात आले.

सामाजिक - मनिषा मच्छिंद्र लहारे ( केडगाव, अहमदनर ), दिव्यांग चोंद कादर शेख ( पिंगेवाडी ),शैक्षणिक शिक्षक सविता विठ्ठलराव साळुंके ( गोंडेगाव,श्रीरामपूर ), शिक्षकेत्तर सुनिता एकनाथ पालवे ( पाथर्डि),पत्रकारिता- साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण ( कोल्हार, राहाता),धार्मिक - माऊली महाराज मोरे ( ब्राम्हणी, राहुरी ),समाजप्रबोधन - महंत बाबागिरी महाराज (श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थान नागलवाडी ),प्रशासकीय - भैय्यालाल टेकाम ( प्रसारण मंत्रालय भारत सरकार,आकाशवाणी अ.नगर ),हस्तकला - अशोक महादेव तरसे ( शेवगाव ),राजकीय -  दादासाहेब लक्ष्मण दळवी (भातकुडगाव ),प्रगतशील शेतकरी - रोहिदास लक्ष्मण ईसारवाडे ( जोहरापुर ) यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारानी सन्मानित करणारांची नावे गुरुवारी ( दि.२ ) जाहीर करण्यात आले.दि.६ जानेवारीला ढोरजळगाव ( ता. शेवगाव )  येथील श्रीराम विद्यालयाच्या भव्य प्रांगणात पुरस्कार वितरण व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.या समारंभाचे अध्यक्षस्थान शिवाजीराव काकडे भूषविणार आहेत. बक्षीस वितरण जि.प.अध्यक्षा नामदार राजश्री घुले, सदस्या हर्षदाताई  काकडे, प्रांताधिकारी देवदत्त केकान,पोलिस उपाधीक्षक मंदार जावळे याच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी जेष्ठ नेते दिलीपराव लांडे, शिवसेना नेता रामदास गोल्हार, तहसिलदार विनोद भामरे,पोलीस निरीक्षक रामराव ढीकले, शिवशाहीर कल्याण महाराज  काळे,भारुड सम्राट हमीद सय्यद,उद्धवराव सोनवणे,सुनिल दानवे,याच्यासह परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तरी पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींनी व तालुक्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्खेने उपस्थित रहावे असे आवाहन अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, सरचिटणीस शंकर मरकड, कार्याध्यक्ष दिपक खोसे, संपर्क प्रमुख भाऊ कदम, तालुका अध्यक्ष उध्दव देशमुख, इसाक शेख, रमेश खैरे,सलीम शेख,ईश्वर वाघमारे, संजय सुपेकर, रामनाथ रूईकर,राजेंद्र मराठे, किरण तहकिक,संजय भालेकर, सोपान जाधव,शिवाजी खरड, अशोक वाघ,सुनिल रनमले,गणेश शिंदे,बाळासाहेब वाघ यांनी केले आहे.

नाशिकरोड । प्रतिनिधी-सोन्याचे दागिने तसेच विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करून रोख पैसे न देता बनावट धनादेश देऊन ८ ते ९ व्यापार्‍यांना सुमारे २७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण दत्तात्रय उदावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे टागोरनगर येथे ईश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आपल्या परिचयातील महावीर एन्टरप्रायजेस सर्व्हिसचे मालक यशवंत मोरे हे संजय माहेश्वरी नावाच्या इसमाला माझ्याकडे घेऊन आले. त्यांना ३ लाख ७ हजार रुपयांचे सोने खरेदीची मागणी केली. ही रक्कम सोने खरेदीच्या वेळी देण्याचे त्यांनी सांगितले. ठरल्याप्रमाणे दि. २८ डिसेंबर रोजी संजय माहेश्वरी व मोरे हे आपल्या दुकानात आले व त्यांनी वरील रकमेचे सोने खरेदी केली.या बदल्यात रोख रकमेऐवजी त्यांनी धनादेश दिला. त्यानंतर दि. ३० डिसेंबर रोजी मोरे पुन्हा दुकानात आले व त्यांनी सांगितले की, सोने खरेदीचे पैसे ३१ रोजी देतो. धनादेश बँकेत जमा करू नका. सर्व रक्कम रोख देण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर माहेश्वरी यांना फोन केला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान वसंत मोरे यांच्या दुकानात अनेक व्यक्ती आल्या व त्यांनी महावीर एन्टरप्रायजेसच्या मालकाने आमच्याकडून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करून आम्हाला बनावट धनादेश दिले.त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. माहेश्वरी यांनी अनेक व्यापार्‍यांकडून साहित्य खरेदी करून सुमारे २७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पुढील तपास वपोनि सुनील लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जी.एन. जाधव हे करीत आहेत.

भोकर (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती भागवताचार्य सेवानाथ महाराज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून ‘तुझ्या मालकीची खोली फिर्यादीला दे नाही तर तीन लाख रुपये दे अन्यथा आणखी विनयभंगाचा गुन्हा दाखल करू’ असे धमकावण्याचा प्रकार आळंदी येथे घडला. याप्रकरणी आळंदी येथील चौघांविरुद्ध आळंदी पोलिसांत दमदाटी केल्याचा व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरख महाराज आहेर यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य तिघांचा शोध सुरू आहे.खोकर येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती म्हणून सेवेत असलेले भागवताचार्य सेवानाथ महाराज यांचे आध्यात्मीक शिक्षण आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत झाले. त्यानंतर ते सहा वर्षे भंडारा डोंगरावर एकांतात राहिले. नंतर तेथून आल्यानंतर भजन, किर्तन व प्रवचन अशी अध्यात्मीक सेवा सुरू झाली. त्यातून त्यांनी आळंदी जवळील केळगाव येथे एका जोडीदारासोबत एक गुंठा जागा घेतली. त्यावर बांधकाम केले. पण काही वर्षानंतर खोकर येथील चौरंगीनाथ महाराज यांचे देहावसान झाले. त्यानंतर तुकाराम महाराज बोडखे यांचे नामकरण वै. चौरंगीनाथ महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून सेवानाथ महाराज असे नामकरण झाले तेव्हापासून महाराजांचे वास्तव्य खोकर येथे आहे.या दरम्यान त्यांचे खोलीत काही दिवस त्यांचे बंधु सोमनाथ यांचे वास्तव्य होते. परंतु शेजार्‍यांच्या त्रासाला कटाळून ते तेथून निघून आले आणि शेजार्‍यांना रान मोकळे झाले. त्यांनी महाराजांच्या खोलीत असलेले एक लाख रूपये किंमतीचे ग्रंथ, पाच पक्वाज, पाच होर्मोनियम व नित्य उपायोगाच्या वस्तू असे मिळून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास करत खोलीचा ताबा घेतला. दरम्यानच्या काळात यातील एका महिलेने सेवानाथ महाराजांविरूद्ध दि.4 जुलै 2019 रोजी आळंदी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना धमकाविण्यास सुरूवात झाली.त्यानंतर दि.1 डिसेंबर रोजी सेवानाथ महाराज हे आळंदी येथे गेले असता तेथे यातील गोरख महाराज आहेर याने सर्वांसमक्ष ‘तुझ्या मालकीची रूम एका महिलेस देऊन टाक, तुला खोली द्यायची नसेल तर त्या बदल्यात आम्हाला तीन लाख रूपये देऊन टाक, मी त्या महिलेला तुझ्या विरूद्धची विनयभंगाची दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास सांगतो’ असे म्हणाला.त्यावर महाराजांनी ‘मी त्या महिलेचा विनयभंग केला नसून न्यायालयात जो न्याय होईल तो मला मान्य असेल असे’ असे सुनावले. एकंदरीत ‘तुमची रूम द्या अन्यथा तीन लाख रूपये द्या’ आम्ही विनयभंगाचा गुन्हा मागे घेवू असे धमकावत महाराजांना खंडणी मागितली. याप्रकरणी आळंदी पोलिसात आळंदी येथील दोन महिला व अंबादास लक्ष्मण येल्हांडे व गोरख महाराज आहेर या चौघाविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आळंदी पोलिसांत वरील चौघाविरूद्ध भादंवि कलम 448, 384, 506 व 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वरील पैकी गोरख महाराज आहेर यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बापू जोंधळे करत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget