Latest Post

छत्तीसगढ : नारायणपूर येथील इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) शिबिरात धक्कादायक घटना घडली असून घटना घडली. जवानांमधील परस्पर वादानंतर झालेल्या गोळीबारात तब्बल सहा सैनिकांचा मृत्यू झाला असून २ जवान जखमी आहेत. बुधवारी (दि. ०४) सकाळच्या सुमारास हि घटना घडली. सुट्टीच्या वादानंतर ही सनसनाटी घटना घडली आहे.दरम्यान नारायणपूर या ठिकाणी इंडो-तिबेट सीमा पोलीस कॅम्प चालू असतांना हि घटना घडली. सुट्टीच्या कारणावरून हि घटना घडल्याचे प्राथमिक माहिती आहे. जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरने रायपूर येथे हलविण्यात आले आहे.बस्तर जिल्ह्याचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यातील काडेनर गावात आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमधील सैनिकांमध्ये गोळीबार झाला. एका कॉन्स्टेबलने या गोळ्या घातल्या असून हल्ल्यानंतर स्वतःही गोळी मारल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर आर्मी कॅम्पमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे (प्रतिनिधि ) - सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विभागिय कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांनी तत्कालीन अधिक्षक अभियंता नानासाहेब (एन.एम) पवार  यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर  बसवुन भ्रष्टाचाराचा अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.
           या मंडळ कार्यालया अंतर्गत १) सा.बां.विभाग क्र १. २)सा.बां. विभाग क्र.२ ३) सा.बां. विभाग पालघर ४) सा.बां. विभाग जव्हार ५) सा.बां.विभाग (आदिवासी) इ. विभागिय कार्यालय कार्यरत असुन या कार्यालया मार्फत झालेल्या डांबराच्या कामात जवळपास ५०% कामे फक्त कागदोपत्री  केल्याचे दाखवुन कामे न करताच देयके काढुन घेऊन महाराष्ट्र शासनाची फसवणुक केली आहे. व या कामांच्या   देयकांना दुस-या जिल्यातील खोटे डांबराचे चलन जोडुन देयके काढण्यात आली आहेत. या प्रकारात तत्का. अधिक्षक अभियंता नाना पवार यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. कारण त्यांनी महाराष्ट्र शासना चे सर्व नियम फाट्यावर मारुन अनाधिकृत रित्या देयके काढणा-या कार्यकारी अभियंता   सर्वश्री -  दिनेश यु. महाजन, जी.एस.गांगुर्डे, राहुल वसईकर , आर.एस. पवार., श्रीमती अनिता परदेशी , प्रदिप दळवी, बि.टि.बडे. यांना पाठिशी घालुन त्यांना भ्रष्टाचारात अनमोल सहकार्य केले. व महाराष्ट्र शासनाला अक्षरश: लुबाडले. सा.बां. मंडळ कार्यालयात नव्याने दाखल झालेले अधिक्षक अभियंता आर.टी . पाटिल यांनी हि तसाच मागिल कित्ता पुढे गिरऊन येरे माझ्या मागल्या करुन भ्रष्टाचाराचा धुव्वा उडवुन टाकला.... महत्वाची गोष्ट म्हणजे आर.टी.पाटिल नाशिक ला कार्यरत आसताना लाचखोरी प्रकरणी चुकिचे काम करून शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार धरुन जिल्हाधिकारी कार्यालय नासिक यांनी नेमलेल्या समिति ने या महाशयांना दंड ठोठविला आहे. हि दंडाची रक्कम शासनाला जमा न करता शासनाला खोटेनाटे पत्रव्यवहार करुण शासना ला अंधारात ठेऊन बढत्यावर-बढत्या घेऊन अधिक्षक अभियंता म्हणुन मिरवतात तो भाग वेगळा आहे. तत्कालीन अधिक्षक अभियंता नानासाहेब पवार व सध्या कार्यरत अधिक्षक अभियंता आर.टी .पाटिल यांनी मिळुन सा.बां मंडळ ठाणे ची भ्रष्टाचाररुपी वाट लावली आहे. या मंडळ कार्यालयाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणा-या अनेक तक्रारी या विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तपास कामी पडुन आहे. त्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही म्हणुन भ्रष्टाचार बोकाळला  आहे. या भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्या हेतुने? सा.बां. विभाग क्र.२ ठाणे  या कार्यालयास आग लागली हि आग शाॅट सर्किटने लागली असे बोलले जाते. मात्र आग लावली काय?  याचे पुरावे पोलिसांना उपोषण कर्ते देणार आहेत. या आगित सर्व काढलेले देयके ? जळुन खाक झाल्याची चर्चा आहे..? हि आग सोमवारी दि.९/९/२०१९ पहाटे ४ ते ५  च्या दरम्यान लागली. यात कार्यालयातील सर्व कागदपत्र जळुन खाक झाली अस कार्यकारी अभियंता प्रदिप दळवी यांनी ठाणे नगर पोलिसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे. मात्र कोण कोणती कागदपत्र जळाली हे मात्र पोलिसांना सांगण्याचे हे महाशय  विसरले ? मात्र भ्रष्टाचाराचे पुरावे जाळुन नष्ट करण्याच्या हेतुने  हे कार्यालय जाळल्याचा  संशय पत्रकार अनंत पटेकर यांना  असुन या मंडळ कार्यालयातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी सह शासकिय कार्यालयास लागलेल्या आगिची त्वरित चौकशी करुन दोषी असणा-या अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्या साठी अनंत पटेकर (संपादक बहुजन शासन ) व त्यांचे असंख्य सहकारी यांचे वतीने दि. ४/४/२०१९ पासुन जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालया समोर  १७ दिवस अखंड साखळी उपोषण सुरु केले होते. पण सा.बां. विभागाचे  भ्रष्टबुडाचे वरिष्ठ अधिकारी साखर झोपेत ? असल्याने फक्त कागदोपत्री खेळ सुरु करुन चौकशी करण्यास मुद्दाम विलंब करत असल्याने त्यांच्या कासवगती कामकाज पध्दतिमुळे  उपोषण करत्यांचा दिशाभुल करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. या *भिकारचोट* कार्यप्रणाली मुळे चौकशी होणार नाही. म्हणुन काल दि. ३/१२/२०१९ पासुन मा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठाणे कोर्ट नाका या ठिकाणी आमरण उपोषणास  सुरुवात केली आहे. आता भ्रष्टाचाराच्या"" फाटक्यात पाय "" घातलाचं आहे त्या मुळे जो पर्यंत ठोस कार्यवाही होउन भ्रष्ट अधिकारी निलंबीत होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु राहिल असं पत्रकार अनंत पटेकर व  उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी ) व्यापारी व ट्रन्सपोर्ट मालकाची मध्येच ९ लाख ७१७ रुपये किंमतीची २३० क्किंटल सोयाबीन स्वतः च्या फायद्यासाठी उतरून फसवणूक करणारे दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी मध्यप्रदेश मध्ये जाऊन अटक केली आहे. ट्रक मालक बबलू उर्फ काशिद रसिद शेख (रा.सेंधवा, जि.बडवाणी राज्य मध्यप्रदेश) व रियाज रज्जक लोहार अशी पकडण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ट्रक (एपी ९, एम एच ९९१९) चा चालक मुकेश कुमार याचा मध्यप्रदेश मध्ये जाऊन तपास केला असता, तो मिळून आला नाही. परंतु येथे ट्रक मालक हा बबलू उर्फ काशिद रसिद शेख हा असल्याची माहिती मिळाली, त्याचा शोध घेऊन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच, सदर गुन्हा हा मी व चालक मुकेश कुमार मिळून केल्याची कबुली दिली. ट्रक व सोयाबीन बाबत विचारले असता, ट्रक च्या बाँडीमध्ये बदल करण्यासाठी गँरेजमध्ये लावल्याची माहिती दिली. गँरेजमधून ट्रक जप्त करून आरोपी काशिद शेख व रियाज रज्जक लोहार याना अटक करण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता, ५ दिवसाची पोलीस कस्टडी दिली. तसेच आरोपींना तात्काळ तपासकामी घेऊन मध्यप्रदेश आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार नेवली (रा.मध्यप्रदेश) येथे रियाज लोहार यांच्या मार्फत रियाज शेख यांना पैसे घेऊन त्याच्या मदतीने मनोज रमेशचंद वाणी यांच्या गोडवूनमध्ये ठेवलेला ६ टन ६८० किलो माल जप्त केला. ट्रक मालक काशिद शेख यांनी सेंदवा (मध्यप्रदेश) येथील ओम ट्रेडसचे मालक दिलीप राठोड यांना सचिन बडवाणी (रा.सेंदवा) यांच्या मार्फत विकलेली सोयाबीन जप्त केली. असा एकूण १५ टन सोयाबीन जप्त केली, असून पुढील तपास चालू आहे. या कारवाईत १५ टन सोयाबीन ६ लाख रुपये तर ट्रक १२ लाख रुपये अशी एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधु, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. विकास वाघ, पो.उ.नि. सतिश शिरसाट यांच्या सह पोना आण्णा बर्डे, पोकाँ राहुल शेळके, राजु शेख आदींनी केली आहे.

बुलढाणा जिले में एक बाप ने अपनी 16 वर्षीय बेटी को बेहोशी की गोली खिलाकर कई बार
बाप बेटी के पवित्र रिश्ते को कलंकित किया है.ये घटना उजागर होने के बाद अंढेरा पुलिस थाने में आरोपी पिता के खिलाफ  बलात्कार,पोक्सो कानून के तहत अपराध दर्ज करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है.
पुलिस से मिली जानकारी के अनुसार चिखली तहसील अंतर्गत के ग्राम देवलगांव घुबे निवासी एक 16 वर्षीय किशोरी ने अपनी शिकायत में बताया कि,वे जब सवा माह की थी तब उसकी माँ की मौत हो गई थी.बाप ने दूसरा ब्याह किया किंतु बाप की शराब की लत के कारण सौतेली मां भी छोडकर चली गई और अब दादी,पिता के साथ रहती है.आर्थिके स्थिति ठीक नही होने से शिक्षा भी छोडना पडी. पीड़िता ने आगे अपनी रिपोर्ट में बताया है कि,2 माह पूर्व बाप ने सिर दर्द की गोली खिलाई जिस से उसे चक्कर आ कर गिरने लगी तब पिता ने पकड़ कर अपनी खटिया पर ले जा कर कपडे उतारकर गंदी हरकत करने लगा और पीडिता को नींद लग गई.अगले दिन पीडिता ने अपनी दादी को पेट में दर्द होने की बात कही किंतु दादी ने ध्यान नही दिया.इसके बाद पिता ने कई बार गोली खिलाकर यही हरकत की.आखिर एक दिन पीडिता ने अपनी दादी और परिजन को ये घटना बता दी तब आरोपी पिता को समझाया भी गया.इसके बाद पिता ने पीडिता की पिटाई करते हुए आगे से किसी को कुछ बताया तो जान से मारने की धमकी दी.1 दिसंबर को फिर से पिता ने पीडिता को गोली खाने को कहा तो पीडिता ने मना कर दिया,उसे जबरदस्ती गोली खिलाकर बाप ने फिर से वही हरकत की.बाप की इन करतूतों से तंग आ कर अगले दिन यानी 2 दिसंबर को पीडिता बाप के खिलाफ पुलिस में शिकायत देने के लिए चिखली शहर पहोंची किंतु वे घबरा गई जिसे ईस हालत में देख कर कुछ लोगों ने स्थानिक पुलिस को बताया तब पुलिस वहां पहोंची और पीडिता की आपबीती सुनकर उसे अंढेरा पुलिस थाने ले जाया गया जहां पीडिता की शिकायत पर आरोपी पिता के खिलाफ बलात्कार व पोस्को कानून के तहत अपराध दर्ज कर पुलिस ने आरोपी पिता को गिरफ्तार कर लिया है.मामले की अधिक जांच थानेदार नरेंद्र ठाकरे कर रहे है.

अहमदनगर (प्रतिनिधी ) राहाता तालुक्यातील लोणी येथील हत्येतील आरोपी 24 तासांच्या आत पकडण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश आले आहे. सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (वय 24, रा.बीफ मार्केटजवळ, वार्ड नं.2, श्रीरामपूर), संतोष सुरेश कांबळे (वय 28, रा. मुन्नाभाई वखारीचे बाजूला, बीफ मार्केटजवळ, वार्ड नं.2, श्रीरामपूर), गाठण उर्फ शाहरूख उस्मान शहा (वय 20, रा.बीफ मार्केटजवळ, वार्ड नं.2, श्रीरामपूर), अरुण भास्कर चौधरी (वय 23, रा. सोनगांवरोड, खंडोबा मंदिराजवळ, लोणी प्रवरा ता. राहाता) आदी चार आरोपींना पकडण्यात आले आहेत.
 याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर येथील आशा आब्बू कुरेशी यांचा मुलगा फरदीन कुरेशी याला नाशिक येथे सोबत येण्यासाठी आरोपी सिराज शेख, संतोष कांबळे, शाहरूख शहा या सर्वांनी जबरदस्तीने नाशिकला नेले. यानंतर पुन्हा लोणी येथे आणून आब्बू कुरेशी यांच्या साथीदार उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी ता.राहाता) आदींमध्ये भांडणे झाली. या भांडणात गावठी कट्ट्यातून गोळीबार करून फरीद कुरेशी यांची हत्या झाली होती. या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र पथके नेमण्यात येऊन सदर आरोपींचा शोध घेऊन पोहेकॉ दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, आण्णा पवार, शंकर चौधरी, रविंद्र कर्डिले, विजय वेठेकर, संदीप घोडके, संतोष लोढे, संदीप दरंदले, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, रवि सोनटक्के, मेघराज कोल्हे, सचिन आडबल, विजय ठोंबरे, मयूर गायकवाड, चालक पोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने पकडण्यात यशस्वी  कामगिरी केली.

बुलडाणा- 2 डिसेंबर
अवैध पद्धतीने गुटखा विक्री व साठवणूक केली जात आहे. गुटखा तस्करांचे हे कृत्य सर्रास शासकीय नियमाची पायमल्ली करणारे आहे अवैध गुटखा विक्री थांबवावी याबाबत प्रशासनाला निवेदन देवून ही कारवाई झाली नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवून बुलडाणा जिल्ह्यातील गुटखा तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी ही मागणी घेऊन आज सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अन्न व औषध प्रशासनाच्या बुलडाणा कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
     
 बुलडाणा जिल्ह्यात प्रशासनाच्या नजरेखाली पानटपऱ्या,शाळा,कॉलेज परिसर,सार्वजनिक स्थळ,किराणा दुकान तथा हॉटेलसह आदी ठिकाणी सर्रासपणे राज्यात प्रतिबंधित नजर,विमल,गोवा सह सुगंधित तंबाखू व गुटख्याची सरर्स विक्री सुरू आहे.बुलडाणा जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्कर खामगाव,मलकापुर,डोणगांव,मेहकर, चिखली येथून संपूर्ण जिल्ह्यात गुटखा सर्व ठिकाणी पोहचुन देत आहे त्या मुळेच बुलडाणा जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर खुलेआम गुटखा विक्री होत आहे. गुटख्यामुळे अनेक नागरिकांचे कर्करोगाचा आजार होऊन जीव गेलेला आहे व त्यांचे संसार उघड्यावर आले आहे.तर नवीन पिढी गुटक्याच्या आहारी जात आहे. काही अवैद्य गुटखा तस्करी करणाऱ्यांची नावे अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असूनही त्यांचे विरुद्ध कोणती ही कारवाई करण्यात आली नाही.खामगावातील मुख्य गुटखा तस्करावर अन्न व औषध कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. तसेच बुलडाणा शहरातला अवैध गुटखा बंद करण्यात यावी, या मागणीसाठी आज सोमवारी सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एक दिवसीय धरणे आंदोलन केले व निवेदन देण्यासाठी अन्ना व औषध प्रशासनाचे कार्याल्यात गेले तर तिथे संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते. यावेळी कार्यालयात घोषणा देत अधिकाऱ्याच्या रिकामी खुर्चीला निवेदन सादर करण्यात आले.दोन दिवसात अवैध गुटख्या वर कार्रवाई नाही केली तर अन्न व औषध प्रशासन कार्यालयच्या समोर गुटखा जाळुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.

बुलडाणा- 2 डिसेंबर
बुलडाणा अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या निवासस्थानातील प्रवेशद्वार समोरील दोन नाम फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान तर केलेच आहे पण हा प्रकार म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांना रेत माफियाकडून असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना 1 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी या घटनेची लेखी तक्रार आज 2 डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.या घटनेनंतर अप्पर जिल्हाधिकारी दुबे आपली सरकारी कारने कार्यालयात ना जाता ते सायकल ने जावून रेत माफियांना हे दाखवन्याचा प्रयत्न केला की मी अश्या धमक्याने घाबरणार नाही.
       
बुलडाणा येथे कार्यरत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे हे बुलडाणा येथे कार्यरत झाल्या पासून त्यांनी वाळू माफिया विरोधात मोठ-मोठे करवाया करुण शासनाला मोठा महसूल मिळवून दिला आहे.रेत व गौणखनिज तस्करा मध्ये त्यांचा दरारा कायम आहे.ते कोणत्याही आमिष व दबावाला बळी ना पडता रात्री बे रात्री जिल्ह्यात फिरून विना रॉयल्टीचे वाळू घेऊन जाणारे वाहन पकडत असतात.बुलडाणा येथील सरकारी तलाव रोडवर संत चोखामेळा नावाचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे सरकारी निवासस्थान आहे. या निवास स्थानासमोरील प्रवेशद्वारावर त्यांच्या नावाचा व निवासस्थानाचा फलक होता. दोन दिवसापुर्वीच त्यांनी बुलडाणा तालुक्यातील चांडोळ व बुलडाणा शहर येथे अवैधरित्य साठवणुक केलेली रेतीवर कारवाई केली होती. याच कारवाईचा धसका घेत काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दोन्ही नाम फलकाची तोडफोड केली. ही घटना आज सकाळी उघडकीस येताच त्यांनी या घटनेची तक्रार शहर पोलिसांत दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे मागील वर्षी 28 डिसेंबर 2018 रोजी सुध्दा त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशव्दाराची कडी बाहेरून बंद करण्यात आली होती.दरम्यान आज अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी शासकिय वाहन न वापरता ते चक्क सायकलने व विना आपले अधिकृत शस्त्रचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रेत माफियांना हे दाखवून दिला की ते अश्या धमक्याने घाबरणार नाही.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget